सोलापूर : विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेल्या तिघांपैकी दोन तरुणांचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू झाला. दोन्ही युवक नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील होते. जलालखेडा व नारसिंगी येथील तीन युवक आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे गेले होते. अंघोळीसाठी गेले असता ते बुडून मृत झाले. Two youths drown in Chandrabhaga river
रविवारी सकाळी ते रेल्वेने पंढरपुरात पोहचले. नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा व भारसिंगी येथील तीन युवक आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे गेले होते. रविवारी सकाळी ते रेल्वेने पंढरपुरात पोहचले. आंघोळ करुन विठ्ठलाचे दर्शन घ्यावे, असे त्यांनी ठरवले. त्याच्या मनी ना ध्यानी आपला पुढे मृत्यू होणार आहे.
सचिन आंघोळीसाठी नदीपात्रात उतरला, पण चंद्रभागा नदीला पाणी जास्त असल्यामुळे सचिनला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी विजयने नदीत उडी घेतली. त्यालाही पोहणे येत नसल्याने तोही पाण्यात बुडू लागला. सचिन शिवाजी कुंभारे ( 28, रा. जलालखेडा) आणि विजय सिद्धार्थ सरदार ( 27, रा. भारसिंगी ) मृत तरुणांची नावे आहेत. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/580081433669590/
□ 19 जण बुडाले, 100 पेक्षा जास्त भाविकांना वाचवले
पावसामुळं चंद्रभागेच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली होती. दरम्यान, यंदाच्या आषाढी यात्रेत 19 भाविकांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर 100 पेक्षा जास्त भाविकांना बुडताना वाचवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यंदा चंद्रभागा नदीत असलेल्या मुबलक पाण्यामुळं अनेक भाविक बुडाल्याच्या घटना समोर येत आहेत. 19 भाविकांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. तर 100 पेक्षा जास्त भाविकांना वाचवण्याचे काम प्रशासनानं नेमलेल्या रेस्क्यू टीमने केलं आहे. पावसाची संततधार आणि मोठी गर्दी अशा परिस्थितीत तब्बल 13 भाविकांचा पंढरपूर शहरात मृत्यू झाल्याच्या नोंदी पोलिसात दाखल झाल्या आहेत.
जवळपास 12 लाखापेक्षा जास्त भाविक यावर्षी यात्रेला आले होते. काल एका दिवसात प्रशासनानं तब्बल 500 टन कचरा गोळा केला आहे. यावेळी चंद्रभागा वाळवंटात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. स्नानासाठी वारकऱ्यांची झुंबड उडत असल्याचे चित्र होते. तसेच भक्त पुंडलिकांच्या दर्शनासाठीही रांगा लागल्या होत्या. नदीच्या पैलतिरावर साकारण्यात आलेल्या भक्तिसागरातील 65 एकरातील सर्व प्लॉट दिंड्यांना देण्यात आले होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/579705690373831/