□ देवेंद्र फडणवीस यांनी पालकत्व स्वीकारलेल्या सोलापूर जिल्ह्यात भाजपात अंतर्गत कलह
पंढरपूर / सूरज सरवदे – विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आणि भाजपने उमेदवारी समाधान अवताडे यांना जाहीर केली. परीचारकांच्या सहकाऱ्यांने समाधान अवताडे यांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता. मात्र माजी आमदार प्रशांत परिचारकांना उमेदवारी डावलल्याची सल बोचत होती. प्रशांत परिचारक तिडा टाकण्याची योग्य संधीची वाट पाहत होते. दामाजी सहकारी साखर करण्याच्या निमित्ताने त्यांना संधी मिळाली आणि परिचारकांच्या तिड्यात आमदार अवताडे अलगत अडकले. Former MLA caught in the clutches of attendants MLA Avatade Damaji Sugar Factory Pandharpur Mangalvedha
पंढरपूर मतदारसंघात विजय संपादन करायचा असेल तर भाजपला मराठा उमेदवार देण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे समाधान अवताडे यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. मात्र त्यामुळे परिचारक हे अस्वस्थ झाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळे त्यांना समाधान अवताडे यांच्या सोबत काम करावं लागलं. त्या पोटनिवडणुकीत दामाजी चालला की परिचारकांची जादू हा संशोधनाचा विषय आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने प्रशांत परीचारक यांनी समाधान अवताडे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली खरी मात्र त्यांना उमेदवारी न देण्याची सल त्यांना बोचत होती. समाधान अवताडे आमदार झाल्यापासून त्यांना पंढरपूर नगरपालिकेच्या शासकीय कार्यक्रमांना बोलवले जात नव्हते. अशी परिस्थिती होती. मात्र दुसरीकडे आमदार समाधान अवताडे प्रत्येक वेळी प्रशांत परिचारक यांच्या सहकार्यांने आमदार झालो असे जाहीर सांगत असत. आमदार समाधान अवताडे नेहमीच प्रशांत परिचारक यांच्याबाबत सकारात्मक असायचे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/582904146720652/
दरम्यानच्या काळात आमदार अवताडे यांच्यावर कुरघोडी करण्याची संधी प्रशांत परिचारक शोधत होते. पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखाना, मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखाना आणि मंगळवेढा तालुक्यातील दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आणि सर्वत्र प्रशांत परिचारक यांनी आपले समर्थकांना उमेदवारी दाखल करण्यास सांगितले.
विठ्ठल कारखान्यामध्ये युवराज पाटील यांना सर्वकाही मदत केली होती. तर दामाजी कारखान्यात परिचारक गटाची भाजपाचं भाजपच्या आमदार समाधान अवताडे यांच्या विरुद्ध उभा केली. मंगळवेढा भाजपात फूट पाडण्यात परिचारक यशस्वी झाले. त्यामुळेच दामाजी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार समाधान अवताडे यांना पराभव चाखावा लागला. भाजपच्या तालुकाध्यक्षाने भाजपच्या आमदाराचा पराभव करणे ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना घडली.
सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आहे. असे असताना मंगळवेढा तालुक्यात परिचारक भाजपा विरुद्ध भाजप आमदार अवताडे अशी लढत झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असणारे जिल्ह्याचे नेते भाजपचे पंढरपूर विभासभा मतदारसंघातून कधी पानिपत करतील सांगता येणार नाही.
येणाऱ्या काळात पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान अवताडे एकत्र येतात की एकमेकांविरोधात लढतात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/582620873415646/