सोलापूर : शहराचा कारभार जिथून चालतो त्या सोलापूर महापालिकेतील काही अग्निशमन यंत्र (सिलिंडर) निकामी झाल्याची गंभीर बाब निदर्शनास आणल्यानंतर अखेर कौन्सिल हॉल येथील काही अग्निशमन सिलेंडर तातडीने बदलण्यात आले आहेत. Solapur Municipal Council will install 50 fire cylinders in two phases
दुर्दैवाने एखादी आगीची घटना झाली तर या क्षणाला आग विझविण्यासाठी ही यंत्रणा अत्यावश्यक आहे. मात्र महापालिका कौन्सिल हॉल येथील काही अग्निविमोचन यंत्र (सिलिंडर) नाकाम झाल्याचे निदर्शनास आले आहेत. शहरात इतर ठिकाणी महापालिका प्रशासन कारवाई करते मात्र पालिकेतच असा प्रकार घडत असेल तर कारवाई कोण कोणावर करणार, असा प्रश्न उपस्थित झाला.
दरम्यान, कौन्सिल हॉलमध्ये चार वर्षापूर्वी महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे कार्यालय आणि यशवंतराव चव्हाण सभागृहासह नऊ ठिकाणी अग्निरोधक यंत्रणा बसवण्यात आली होती. त्यापैकी प्रवेश करताना कौन्सिल हॉलच्या डाव्या बाजूकडील कोपऱ्यात एक , सध्याचे अतिरिक्त आयुक्त यांचे कार्यालय समोरील एक व वरच्या मजल्यावरील एक अग्निविमोचन यंत्र नाकाम (बंद) झाले असल्याचे दिसून आले होते. गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने ही यंत्रणा बदलण्यात आली आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या आदेशानुसार अग्निशामन दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी तातडीने
कार्यवाही हाती घेतली आहे.
□ 50 अग्निशमन सिलेंडर बदलणार ; 3 महिन्यांपूर्वी बसविले 250 फायर बॉण्ड
महापालिकेच्या कौन्सिल हॉल परिसर व प्रशासकीय इमारतीमध्ये दोन टप्प्यात सुमारे 50 अग्निशमन सिलिंडर बदलण्यात येणार आहेत. दरम्यान, तीन महिन्यापूर्वीच कौन्सिल हॉल , प्रशासकीय इमारत विविध कार्यालयात , इतर कार्यालय व महापालिका दवाखान्यात सुमारे 250 फायर बॉण्ड बसविण्यात आले आहेत. ऑटोमॅटिक असलेल्या या फायर बॉण्ड सिलेंडर पाच वर्ष कालावधीत चालू शकतो , अशी माहिती अग्निशमन दल प्रमुख केदार आवटे यांनी दिली.
महापालिका आयुक्त कार्यालय येथील तसेच कौन्सिल हॉल जवळील काही अग्निशमन यंत्र सिलेंडर बदलण्यात आले आहेत. नाकाम अग्निशमन यंत्र बदलण्याची कार्यवाही अग्निशमन दलाच्या मार्फत सुरू असल्याचे दिसून आले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/583063236704743/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)