सोलापूर / बळीराम सर्वगोड
सोलापूर जिल्ह्यात अंगणवाडी कर्मचार्यांच्या 581 जागा रिक्त झाल्या असून यातील बहुतेक जागा या गेल्या तीन वर्षापासून रिक्त आहेत. रिक्त जागा अद्याप भरण्यात आलेल्या नाहीत. या प्रकारामुळे शिक्षणांची सुरूवात करण्यापूर्वीच बालकांचे भवितव्य मात्र कर्मचार्याविना अंधकारमय होण्याच्या मार्गावर आहेत. 581 vacancies of Anganwadi employees in Solapur district
अंगणवाडीकडे पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया म्हणून पाहिले जाते. बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी शासन त्यांच्या आहारासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करत असताना ज्याच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उध्दारी असा प्रसार करणार्या शासनाला मात्र या विभागाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. केवळ रिक्त जागामुळे अंगणवाडीतील बालकांचे भवितव्य अंधारात सापडण्याची चिन्हे आहेत.
अनेक नजीकच्या अंगणवाडी सेविकांना रिक्त पदावरील अंगणवाडीचा प्रभारी चार्ज देण्यात जिल्ह्यात आजपर्यत 581 कर्मचार्यांच्या जागा या रिक्त आहेत. येत्या काळात लवकर या जागा न भरल्यास कुपोषणाचे प्रमाण वाढणार आहे. फक्त सोलापुरात ही परिस्थिती नसून ती संपूर्ण राज्यभरात आहे. अंगणवाडीत काम करणारे हे कर्मचारी कमी मानधमनावर आपली प्रामाणिकपणे सेवा बजावत असतात. तीन – तीन महिने वेळेवर मानधन दिले जात नाही. त्यासाठी त्यांना अनेकवेळा आंदोलने करण्याची वेळ येते. त्यावेळी त्याना कुठेतरी एक महिन्याचे मानधन दिले.
यातील बहुतेक या विधवा, परितक्त्या, गरीब, मागासवर्गीय प्रवर्गातील आहेत. अनेकवेळा या कर्मचार्यांच्या कुटुंबाची उपासमार होत असते. तेव्हा शासनाने या सर्व रिक्त जागा तातडीने भराव्यात व बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण रोखावे अशी मागणी जोर धरत आहे. तीन-तीन महिने वेळेवर मानधन दिले जात नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/585983536412713/
त्यासाठी त्याना अनेकवेळा आंदोलने करण्याची वेळ येते. त्यावेळी त्यांना कुठेतरी एक महिन्याचे किंवा दोन महिन्याचे मानधन दिले जाते. कर्मचार्यांच्या कुटुंबाची उपासमार होत असते. तेव्हा शासनाने या सर्व रिक्त जागा तातडीने भराव्यात व बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण रोखावे, अशी मागणी जोर धरत आहे.
□ तालुकानिहाय रिक्त जागा पुढीलप्रमाणे
अक्कलकोट : सेविका 16, मिनी सेविका 03, मदतनीस 55 बार्शी ः सेविका 12, मिनी सेविका 01, मदतनीस 30, वैराग ः सेविका 08, मदतनीस 20 करमाळा ः सेविका 17, मिनी सेविका 01, मदतनीस 25 माढा ः सेविका 02, मिनी सेविका 01, मदतनीस 22 कुडू&वाडी टेंभुर्णी ः सेविका 06, मदतनीस 11 माळशिरस ः सेविका 18, मिनी सेविका 01, मदतनीस 19 अकलूज ः सेविका 17, मदतनीस 31 मंगळवेढा ः सेविका 01, मिनी सेविका 01, मदतनीस 26 मोहोळ ः सेविका 13, मिनी सेविका 05, मदतनीस 29 उत्तर सोलापूर ः सेविका 13, मदतनीस 20 पंढरपूर 1 ः सेविका 09, मदतनीस 36 पंढरपूर 2 ः सेविका 09, मदतनीस 24 सांगोला ः सेविका 03, मिनी सेविका 01, मदतनीस 10 कोळा ः सेविका 11, मिनी सेविका 02, मदतनीस 09 दक्षिण सोलापूर ः 09, मदतनीस 34-
□ रिक्त जागांची माहिती आयुक्तांनी मागविली
आयुक्तानी राज्यातील अंगणवाडी केंद्राताल रिक्त जागांची माहिती मागविली आहे. राज्यात अद्यापही सुपरवायझर, सेविका, मिनी सेविका, मदतनीस यांची पदे मोठ्या प्रमाणावर अद्यापहि रिक्त आहेत. आम्ही अनेकवेळा संघटनेच्या मार्फत सरकारकडे हि रिक्त पदे भरण्यासाठी मागणी केलेली आहे. अंगणवीडीतील कर्मचार्यांना केंद्र सरकार 60 टक्के तर राज्य सरकार 40 टक्के मानधन देते. त्यामुळे केंद्राचीही मान्यता घ्यावी लागते म्हणून विलंब होत असल्याचे सुर्यमणी गायकवाड (राज्य कार्याध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघटना) यांनी सांगितले.
□ शासनाचा आदेश होताच उर्वरित पदे भरणार
शासनाच्या परवानगीने नोव्हेंबर 2019 पर्यतची जी रिक्त पदे होती, त्यातील 50 टक्के पदाची भरती करण्याचा शासनाचा आदेश होता. त्यानुसार सर्व पदे भरण्यात आली आहेत. काही कोर्ट मॅटर व हरकतीमुळे दोन चार पदे राहिली आहेत. तीही लवकरच पूर्ण होतील. आता जानेवारी 2020 पासूनची रिक्त पदे शिल्लक आहेत. शासनाचा आदेश होताच तीही लवकरच भरली जातील.
जावेद शेख – जिल्हा कार्यक्रम अधिकारी जि.प. सोलापूर
https://www.facebook.com/109399567404448/posts/585949029749497/