मुंबई / साेलापूर – सर्वोच्च न्यायालयातून ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण सोडत नव्याने निघणार आहे. यासंबंधीची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. याआधीचे आरक्षण सोडत निवडणूक आयोगाने रद्द केले आहे. The Election Commission will leave the reservation in the local self-government bodies
येत्या काळात राज्यामध्ये मुंबईसह 13 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषद व 284 पंचायत समित्यांची निवडणूक होणार आहे. 5 ते 8 ऑगस्ट दरम्यान आरक्षणाची अंतिम सोडत निघणार आहे. राज्यातील १४ महानगरपालिका, २५ जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या २८४ पंचायत समित्यांमध्ये नव्याने आरक्षण सोडत होणार आहे.
आज राज्य निवडणूक आयोगाने या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार २९ जुलै रोजी सोडत होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची परवानगी दिल्यानंतर आयोगाकडून याबाबतचा कार्यक्रम नव्याने जाहीर करण्यात आला आहे.
बांठीया आयोगाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत २७ टक्के ओबीसी आरक्षण लागू राहणार आहे. (म्हणजे ३४ प्रभाग). ठाणे शहरांत १०.०४ टक्के म्हणजे १५ प्रभागांसाठी हे आरक्षण राहील. अमरावती,अकोला, सोलापूर पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, मालेगाव, वसई-विरार, भिवंडी येथे २७ टक्के आरक्षण ओबीसींसाठी राहील. नागपूरमध्ये २२.०७, कोल्हापूर २३.०९, नवी मुंबई २०.०५ येथे ओबीसींचे आरक्षण घटले आहे.
आयोगाच्या आरक्षण सोडतीच्या आदेशान्वये सध्या अस्तित्वात असलेले सर्वसाधारण महिलांचे आरक्षण, नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग आणि नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग (महिला) या तीन विभागातील आरक्षण सोडत नव्याने करण्यात येणार आहे. एससी आणि एसटी यांचे आरक्षण हे त्यांच्या लोकसंख्येनुसार झालेले असल्याने ते वगळून आता नव्याने सोडत निघणार आहे. ओबीसींसाठीचे आरक्षण असले तरी एससी आणि एसटी प्रभाग वगळून सर्वच प्रभाग या सोडतीत घेतले जाणार आहेत. त्यामुळे अनेक महापालिकांत पुन्हा नव्याने प्रभागांतील समीकरणे बदलणार आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/587285149615885/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/587259546285112/
यापूर्वी राज्यात निवडणुका होणार असलेल्या १४ महापालिकांची आरक्षण सोडत ३१ मे रोजी जाहीर करण्यात आली होती. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी १३ जुलै रोजी आरक्षण सोडत होणार होती. मात्र ती रद्द करण्यात आली होती. आता या सर्वच ठिकाणची आरक्षण सोडत २९ जुलैरोजी नव्याने करण्यात येणार आहे.
ओबीसी आरक्षणाच्या निर्णयामुळे महापालिकेने यापूर्वी काढलेले सर्वसाधारण महिला आरक्षण रद्द करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयाेगाने शुक्रवारी दिले. सर्वसाधारण महिला, ओबीसी, ओबीसी महिलांसाठी २९ जुलै राेजी नव्याने आरक्षण साेडत काढण्यात यावी, असे आदेशही आयाेगाने दिले.
महापालिकेची निवडणूक त्रिसदस्यीय पध्दतीने हाेणार आहे. आयाेगाच्या आदेशानुसार ३१ मे राेजी ओबीसींना वगळून सर्वसाधारण महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या जागांसाठी आरक्षण साेडत काढण्यात आली हाेती.
पालिकेत एकूण ३८ प्रभाग असून ११३ सदस्य आहेत. यापैकी १६ जागा अनुसूचित जाती तर दाेन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव हाेत्या. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील महिला आणि सर्वसाधारण महिला अशा एकूण ५७ जागा महिलांसाठी आरक्षित हाेत्या.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या महिलांचे आरक्षण कायम ठेवून सर्वसाधारण महिलांचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. आता ओबीसी, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी २९ जुलै राेजी साेडत काढण्यात येईल.
https://www.facebook.com/109399567404448/posts/587126076298459/