अक्कलकोट : येथील अक्कलकोट गाणगापूर- रोडवर एमआयडीसी च्या पुढे बाह्य वळणावर आज सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर आगाराची सोलापूर गाणगापूर ही एस टी बस बाह्य वळणावर चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने अचानकपणे वळण घेतल्याने बस पलटी झाली. यात 35 हून अधिक जखमी झाले असून सहाजणांना फ्रक्चर झाले आहे. Akkalkot ST accident more than 35 injured, 6 fractured
शासकीय रूग्णालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दाखल होऊन पाहणी करून विचारपूस केली. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यात सहाजणांना फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले.
बस क्रमांक एम एच झिरो सात सी ९१८४ ही बस सकाळी सोलापूर बसस्थानकावरुन गाणगापूर कडे जाण्यास निघाली. अक्कलकोटच्या पुढे वळणावर पलटी झाली. बसमधीला ३७ प्रवासी व वाहक चालक असे मिळुन ३९ जण होते. सर्व प्रवाशी जखमी झाले असुन त्यापैकी सात प्रवाशी गंभीर जखमी होते. रुग्णांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवले, तर इतर रुग्णांवर अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात, तर दोघांवर अक्कलकोटच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात बसचे अंदाजे एक लाख रूपयाचे नुकसान झाले. बस चालक अमोल इंद्रजीत भोसले, वाहक मीना मुकुंद गायकवाड हेही जखमी आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर ते गाणगापूर अशी अक्कलकोट ते गाणगापूर जाताना एमआयडीसीच्या पुढे बाह्य वळणावर चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने चालकाने अचानकपणे वळण घेतल्याने बस नियंत्रित झाली नाही. त्यामुळे बस चालक बाजूस झुकून पलटी झाली. प्रथम दर्शनी चालक दोषी दिसत आहे.
उत्तर पोलीस ठाणे अक्कलकोट येथे नोंद करण्याचे काम सुरू होते. विलास राठोड विभाग नियंत्रक सोलापूरचे विलास राठोड, यंत्र अभियंता विवेक लोंढे यांनी भेट दिली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/588416736169393/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनाला तातडीचे आदेश दिले आहेत . याप्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने जखमींना जवळपासच्या रुग्णालयांमध्ये हलवण्याचे आदेश दिले. योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन करून अपघाताची माहिती दिली. अपघातात जखमींना मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांना देखील तात्काळ जखमींची भेट घेऊन माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या. सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी माहिती समजताच ग्रामीण रूग्णालयात (अक्कलकोट) जाऊन जखमी नागरिकांचे भेट घेऊन दवाखान्यात जाऊन विचारपूस केली.
□ अपघातातील जखमींची नावे
या अपघातामध्ये सुजाता पोपट पेडगावकर (वय- ४५), जामखेड , गुरुराज लक्ष्मीकांत कलबुर्गी (४५), सोलापूर , आनंदीबाई घाडगे (५६), सोलापूर, महादेवी बिराजदार (५६),सोलापूर, वर्षा वडगावकर (३५),सोलापूर, शेखर संजय वडगावकर (४७) सोलापूर, ओंकार पेडगावकर (१६), जामखेड, जावेद भगवान (३३) मैंदर्गी, मल्लाप्पा हिरेमठ (६०)अक्कलकोट, मंगल इरप्पा देशमुख (७६) सोलापूर, वीरप्पा शरणप्पा देशमुख (४०) सोलापूर, शंकर राठोड (३५) सोलापूर, शोभा रमेश जाधव (५५) मुंबई, राहुल रमेश जाधव (३५)मुंबई, रत्नादबाई मडेप्पा मडचणे (६०) नावदगी, समीक्षा संगमेश्वर पाटील (१४) सोलापूर, भाऊसाहेब यादवराव पाटील (५०)सोलापूर, वाहक मीना मुकुंद गायकवाड (४८)सोलापूर, देविदास परदेशी (५०) आळंद, शशिकांत गांदोडगी (७०) अक्कलकोट, गणेश भैरप्पा (१९) सोलापूर, संगीता संगमेश्वर पाटील (३६) जेऊर, शिवशरण बिराजदार (५८) सोलापूर, सलीम हसन कंडोगी (४५) अक्कलकोट, सुयोग साळुंखे (२७) सांगली, शशिकांत कटारे (५५) हसापूर, मंजुषा सूर्यकांत गण्यार (४०) नागणसूर, मंगल रेशमी (६०)सोलापूर, अमृता तानवडे (३३) पुणे अशी जख्मीची नांवे आहेत.
□ ट्रामा केअर सेंटरचे काम मार्गी लावणार
अक्कलकोट येथे मैंदर्गी रोडवरील बायपास मार्गावर बस पलटी झाल्याचे कळताच घटनास्थळी भेट देऊन जखमी प्रवाशांना उपचारासाठी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. गंभीर जखमींना सोलापूर सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सदरची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना कळवली. प्रसंगाची दखल घेत एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्तांना तातडीने ५० हजार रुपयांची मदत जाहीर करून प्रशासनाला सुचना दिल्या.
अक्कलकोट येथे अनेक वर्षापासून रखडलेले ट्रामा केअर सेंटर लवकरात लवकर चालू करण्याची मागणी केली असता मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शवून बैठक घेऊन समस्या मार्गी लावण्याचे आश्वस्त केल्याचे आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/588337859510614/