□ पण पांडे म्हणतात, त्यात कोणतेही तथ्य नाही
सोलापूर : महापालिका आयुक्तांची बदली होणार असल्याची चर्चा असतानाच आता त्यांच्या जागी माजी उपायुक्त धनराज पांडे यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा शनिवारी दिवसभर पालिका वर्तुळात आणि सोशल मिडीयावर होती. मात्र यात काही तथ्य नसल्याचे पांडे यांनी सांगितले. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केंद्राकडे आंध्रप्रदेश या मूळ केडरमध्ये बदली मागितली आहे. Discussion of Dhanraj Pandey’s name for the post of Solapur Municipal Commissioner
ही प्रक्रिया पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. शिवशंकर यांचा महाराष्ट्रातील दहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे ते केडर बदलास पात्र आहेत. यासंदर्भातील त्यांनी केंद्र सरकारला अॅप्लीकेशन सादर केले आहे. सोलापुरात त्यांचा आयुक्तपदाचा दोन वर्षांचा कालवधीही पूर्ण झाला आहे. अधूनमधून त्यांच्या बदलीची चर्चा पालिका वर्तुळात सुरू असते. ही चर्चा असतानाच आता शनिवारी पालिका वर्तुळात आणि सोशल मिडीयावर होती.
महापालिकेचे उपायुक्त म्हणून काम पाहतानाधनराज पांडे यांनी आपल्या कार्यशैलीने सोलापूरकरांवर चांगलीच छाप पाडली होती. राज्य वित्त व लेखा सेवा विभागातील असलेले धनराज पांडे यांची कोविड काळात सोलापूर महानगरपालिके तील उपायुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती. महापालिकेत उपायुक्तपद रिक्त असल्याने त्यांच्या नियुक्तीने कोविडच्या कामासाठी त्यांचा चांगला फायदा झाला होता.
https://www.facebook.com/109399567404448/posts/588308476180219/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आयुक्त पी शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दोन वर्षे या पदावर विविध विभागांची जबाबदारी घेऊन उत्कृष्टरित्या काम पाहिले होते. मात्र त्यानंतर त्यांची मार्च महिन्यात स पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झाली.
आता पुन्हा त्यांची सोलापूरच्या पालिका आयुक्तपदी नियुक्ती होणार अशी चर्चा रंगली आहे. मात्र या गोष्टीत काही तथ्य नसल्याचे त्यांनी दें. सुराज्यशी बोलताना सांगितले. आपण सोलापूरच्या आयुक्तपदावर येण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याचे ते म्हणाले.
□ भाटेवाडी येथे पालिका कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
https://www.facebook.com/109399567404448/posts/588294222848311/