□ उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांची माहिती
□ १ ऑगस्टपासून सोलापूर शहर जिल्ह्यात मोहिमेस प्रारंभ
□ २,६०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती, बीएलओकडून घरोघरी जाऊन करणार आधार जोडणी
सोलापूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये १ ऑगस्ट ते २३ मार्च च्या दरम्यान मतदान ओळखपत्रास आधार जोडणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. आधार कार्ड जोडणी ऐच्छिक असल्याने जास्तीत जास्त मतदारांनी या मोहीमेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी केले. Campaign to link Aadhaar to Voter ID Card in Solapur district
मतदाराकडून आधार संकलनाचा उद्देश मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखणे आहे. आधार लिंकिंग हे मतदारांच्या ऐच्छिक असणार आहे. मतदार यादीत डबल आणि बोगस मतदान रोखण्यासाठी मतदार कार्ड, आधार कार्डशी लिंक करण्यात येणार आहे.
प्रत्येक मतदाराकडून आधार क्रमांक विहित स्वरूपात मिळवण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे. ऑनलाइन पध्दतीने आधार जोडणी होणार आहे त्याचबरोबर बीएलओमार्फत ही परोघरी जाऊन आधार जोडणीचे काम करणार आहेत. यासाठी जिल्ह्यात ३५०० बूथवर २६०० लोकांची टीम करण्यात आली असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. जिल्ह्यातील मतदारांची संख्या ही ३५ लाख ६२ हजार ५६ असून त्यापैकी २१५ हे तृतीयपंथी मतदार आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/589619436049123/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/589435176067549/
□ असे जोडा आधार कार्ड
मतदान ओळखपत्र आदर्श लिंक करण्यासाठी सर्वप्रथम वोटर पोर्टल इएसआय गव्हर्मेंट डॉट इन या लिंकवर जाऊन वोटर पोर्टल ओपन करा आणि आपली सविस्तर माहिती भरावी. बीएलओमार्फत गरुड ॲपद्वारे आधार जोडणी होणार. वोटर आयडी कार्ड नंबर आधार कार्ड नंबर या फॉरमॅटमध्ये १६६ किंवा ५१९६९ या नंबर वर एसएमएस करून आधार लिंक करता येते.
□ तालुकानहाय मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे :
उत्तर सोलापूर (३,०५,०९३), दक्षिण सोलापूर (३,३०, ४१९), शहर मध्य (३, ११, ५६२), करमाळा (३,१७००५), माढा (३३० ६३३), बार्शी (३,२०४८०), मोहोळ (३,१२,०२९), अक्कलकोट (३,५०,३९८), पंढरपूर (३,५०,३६८), सांगोला (३,०५,६५८), माळशिरस (३, २८, ४११ )
“एक ऑगस्ट २०२२ पासून मतदान ओळखपत्रास आधार कार्ड जोडणी ही मोहीम सुरू होणार आहे. या उपक्रमाचा जास्तीत मतदारांनी लाभ घ्यावा. मतदान ओळखपत्रास आधार कार्ड जोडणी ऐच्छिक असल्याने जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करावी. त्यामुळे दुबार नावे कमी होतील. बोगस मतदानाला ही आळा बसेल. आधार जोडणी करून प्रशासनास सहकार्य करावे”
भारत वाघमारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर
https://www.facebook.com/109399567404448/posts/589569722720761/