सोलापूर : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीकरीता आरक्षण जाहीर करण्यात आले असून यात अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सातही गटात महिला आरक्षण पडले आहे. त्यामुळे येथून इच्छुक असलेले माजी सदस्य सुरेश हसापुरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या उत्साहावर पाणी पडले आहे. ‘Kahi Khushi, Kahi Gum’ with Zilla Parishad reservation; ‘Mahilaraj’ to run in South Solapur
जिल्हा परिषदेच्या 77 जागेसाठीची आरक्षण सोडत आज गुरुवारी (दि. 28) जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. महसूल उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार अंजली कुलकर्णी, तुकाराम गायकवाड, कन्याकुमारी भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रणिती नामदेव गायकवाड या चिमुकलीच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
आरक्षण सोडतीत अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या सोईचे आरक्षण पडले नाही. त्यामुळे त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सातच्या सात जागा महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्या. त्यामुळे त्या ठिकाणी अनेक इच्छुकांच्या आनंदावर विरजण पडलंय.
पंढरपूर तालुक्यात दहापैकी पाच जागांवर नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. त्यामुळे येथील इच्छुकांची मोठी गोची झाली आहे. एकूणच आरक्षण सोडतीनंतर कही खुशी, कही गमची स्थिती निर्माण झाली आहे. या आरक्षणामुळे अनेकांची गोची झाली असून अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलणार आहेत. काही नवख्यांना मिनी मंत्रालयात येण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
जिल्हा परिषदेत 77 जागांपैकी 44 जागा या खुल्या प्रवर्गासाठी आहेत. उर्वरित 20 जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी), 12 जागा अनुसूचित जातीसाठी (एससी) आणि 1 जागा अनुसूचित जमातीसाठी (एसटी) प्रवर्गासाठी राखीव आहे. यात प्रत्येक प्रवर्गात 50 टक्के म्हणजेच एकूण 39 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. यानुसार आरक्षण काढण्यात आले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/591105845900482/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/591069322570801/
दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी गट अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाला आहे. पोखरापूर, मोडनिंब, तांदुळवाडी, संत चोखामेळा नगर, संत दामाजीनगर, शेळगाव आर, कुर्डू, वांगी, कोर्टी, चिखलठाण, आष्टी आणि भोसरे हे बारा गट अनुसूचित जातीठी राखीव झाले आहेत. दहिगाव, पुळूज, वळसंग, मंद्रूप, कडलास, वेळापूर, जेऊर, करकंब, उपळाई ठोंगे, कुरुल हे गट ओबीसी महिलांसाठी तर उपळाई बुद्रुक, गोपाळपूर, गुरसाळे, कासेगाव, फोंडशिरस, वाडेगाव, नागणसूर, हुलजंती, चपळगाव, कण्हेर हे गट ओबीसी सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहेत.
केम, म्हैसगाव, रांझणी, टेंभूर्णी, पांगरी, नान्नज, बीबी दारफळ, नरखेड, कामती बु., भाळवणी, वाखरी, टाकळी, अकोला, चोपडी, कोळा, नंदेश्वर, बोरामणी, कुंभारी, हत्तूर, भंडारकवठे, वागदरी, मंगरूळ हे गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहेत.
□ तालुकानिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे
करमाळा – एकूण जागा 6
एससी- कोर्टी, चिखलठाण, वांगी.
खुला- पांडे आणि वीट
खुला महिला
——–‐—-
– माढा- एकूण जागा 8
एससी महिला- भोसरे आणि कुर्डू
खुला महिला- म्हैसगाव, रांझणी, टेंभुर्णी ओबीसी- उपळाई बु.
खुला- लऊळ
एससी- मोडनिंब
………………………
बार्शी- एकूण जागा 6
खुला- उपळे दुमाला, पानगाव, मालवंडी
ओबीसी- उपळाई ठोंगे
खुला महिला- पांगरी
एससी महिला- शेळगाव आर.
………………..
उत्तर सोलापूर- एकूण जागा 3
खुला महिला- नान्नज आणि बीबी दारफळ
खुला- कोंडी
…………………..
मोहोळ- एकूण जागा 6
खुला महिला- नरखेड, कामती बु.
एससी महिला- आष्टी
एससी- पोखरापूर
खुला- पेनूर
ओबीसी- कुरुल
……………………
पंढरपूर- एकूण जागा 10
ओबीसी- गोपाळपूर, गुरसाळे, कासेगाव
ओबीसी महिला- करकंब, पुळूज
खुला- भोसे, रोपळे
खुला महिला- भाळवणी, वाखरी आणि टाकळी
……………….
माळशिरस- एकूण जागा 11
खुला- संग्रामनगर, यशवंत नगर, माळीनगर, बोरगाव, पिलीव अणि मांडवे
ओबीसी महिला- दहिगांव आणि वेळापूर
ओबीसी- कन्हेर आणि फोंडशिरस
एससी- तांदुळवाडी
……………………
सांगोला- एकूण जागा 8
खुला- महुद बु, घेरडी आणि एखतपूर, ओबीसी महिला- वाढेगाव, कडलास
खुला महिला- अकोला, चोपडी, कोळा
……………………
मंगळवेढा- एकूण जागा 5
एससी- संत दामाजीनगर आणि संत चोखामेळा नगर
ओबीसी- हुलजंती
खुला महिला- नंदेश्वर
खुला- भोसे
……………………
दक्षिण सोलापूर- एकूण जागा 7
खुला महिला- बोरामणी, कुंभारी, हत्तुर, भंडारकवठे
ओबीसी महिला- वळसंग
एसटी महिला- होटगी
ओबीसी महिला- मंद्रुप
…………………………….
अक्कलकोट- एकूण जागा 7
ओबीसी- चपळगांव, नागणसूर
ओबीसी महिला- जेऊर
खुला महिला- वागदरी, मंगरुळ
खुला- सलगर आणि तोळणूर
□ उद्या अंतिम प्रसिध्दी; 2 ऑगस्टपर्यंत हरकती
जिल्हा परिषदेच्या 77 गटासाठी आणि 154 पंचायत समिती गणासाठी काढलेल्या आरक्षणाला उद्या (शुक्रवारी) अंतिम प्रसिध्दी देण्यात येणार आहे. यानंतर या आरक्षणावर 2 ऑगस्टपर्यंत हरकती मागविण्यात येणार आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/590997359244664/