सोलापूर : शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले आहे. आमच्या गावरान भाषेवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. उद्धव ठाकरेंसारख्या व्यक्तीने कोणताही विचार न करता टीका केली. आज आसामवर टीका केली, उद्या काश्मीर, परवा राजस्थानवर कराल. रागीट आणि चिडखोर स्वभावामुळे नेमकं काय बोलायचे, सांगायचे याचे भान उद्धव ठाकरेंना राहिलेले नाही, असेही पाटील म्हणाले. Uddhav Thackeray has no right to criticize Gavran language, Shahjibapu criticizes Thackeray
उद्धव ठाकरेंचं हे विधान आपल्याला काळजाला लागलं असल्याचं शहाजीबापू पाटील यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मुलाखतीत केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल’ या डायलॉगमुळे प्रसिद्ध झाल्या शहाजीबापू पाटील यांना उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही कसे काय जन्माला आलात? अशी विचारणा केली होती. यावर आमच्या गावरान भाषेवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही असं ठाकरे यांना सुनावलं आहे.
पुढे बापू म्हणाले, संजय राऊतांचं शरीर, मन आणि बुद्धी कुचकं आहे. ते कधी जनतेसमोर गेलेच नाहीत. तेच आदित्य ठाकरेंना काय बोलायचं शिकवत असतात. पण दुर्दैवाने उद्धव ठाकरेंनीही तशा पद्धतीने बोलणं हा महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेचा अपमान आहे. आमच्या गावरान भाषेवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. त्यांचं महाराष्ट्रात जन्माला का आलात हे विधान माझ्या काळजाला लागलं. महाराष्ट्राबद्दल मी काही बोललोच नव्हतो. आसाममधील निसर्ग सौदर्याचं कौतुक करणं काही चूक नाही. ही राष्ट्रीय एकात्मकता असल्याचे म्हटले.
उद्धव ठाकरेंसारख्या व्यक्तीने कोणताही विचार न करता टीका केलीय, आज आसामवर टीका केली, उद्या काश्मीर, परवा राजस्थानवर कराल. रागीट आणि चिडखोर स्वभावामुळे नेमकं काय बोलायचं, सांगायचं याचं भान राहिलेलं नसल्याचे शहाजीबापूंनी म्हटले.
शिवसेनेचे प्रमुख तुम्ही होतात की शरद पवार होतात? तुम्ही मुख्यमंत्री झालात याचं दु:ख नाही, पण शिवसेनेच्या आमदारांना, नेत्यांना एकत्र घेऊन निर्णय घ्यायला हवा होता. तसं न केल्याने राष्ट्रवादी सतत आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केल्याचं सांगत राहिले. सत्ता, विकास हा राष्ट्रवादीच्या मालकीचा झाला. आम्ही आमदार फक्त लेटरपॅड घेऊन फिरत होतो, अशी खंतही शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/591687635842303/
》 धार्मिकविधी केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निशाण्यावर, तक्रार दाखल
मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन वेगळी भूमिका घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात धार्मिकविधी केल्याप्रकरणी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्याने ही तक्रार केली. मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर 7 जुलैला मंत्रालयात सत्यनारायण कथा, पूजन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवर सोमवारी सुनावणी होणार आहे.
भाजपाच्या पाठिंब्यावर आणि बंडखोरांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करत एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांनी 30 जून 2022 रोजी सायंकाळी राजभवनात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर दिनांक 7 जुलै 2022 रोजी मंत्रालयातील आपल्या दालनात सत्यनारायणाची पूजा करत शिंदेंनी कारभाराला सुरूवात केली.
मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रालयातील दालनात केलेली सत्यनारायणाची महापूजा ही घटनेच्या विरोधात असल्याचा आरोप करत ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते धनाजी सुरोसे यांनी ठाणे न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी ठाणे न्यायालयाने याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पहिली सुनावणी ही येत्या 1 ऑगस्ट रोजी होणार आहे. भादवी कलम 406 प्रमाणे एकनाथ शिंदे शिक्षेस पात्र आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
तक्रारदार धनाजी सुरोसे यांच्या तक्रारीनुसार, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर 7 जुलै रोजी मंत्रालयातील कार्यालयात सत्यनारायण कथा, पूजन केले होते. त्यांचे हे कृत्य राज्यघटनेच्या विरुद्ध आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात शासकीय कार्यालयात कोणत्याही प्रकारची धार्मिक पूजा केली जाऊ शकत नाही. त्यांची ही पूजा घटनाबाह्य आहे, असा दावा धनाजी सुरोसे यांनी केला आहे.
दरम्यान, शासकीय नियम आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचेही यात उल्लंघन आहे, असे सुरोसे यांनी तक्रारीत म्हटले आहे. धनाजी सुरोसे यांनी यामुळे ठाणे न्यायालयात धाव घेतली आहे. मंत्रालयातील आपल्या दालनात सत्यनारायणाची पूजा केल्या प्रकरणी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम होत असल्याच सांगत भादवी कलम ४०६ प्रमाणे ठाणे न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
येत्या १ ऑगस्ट रोजी या याचिकेवर पहिली सुनावणी होणार आहे. या प्रकरणी ठाणे न्यायालयातून न्याय न मिळाल्यास मुंबई सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा धनाजी सुरोसे यांनी दिला आहे. एखाद्या शासकीय कार्यालयात सत्यनारायण पूजा करणे हे शासनाने केलेल्या नियमांचे उल्लंघन आहे. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे ही उल्लंघन केले आहे. या कृतीमुळे धर्मनिरपेक्षित असलेल्या नागरिकांच्या भावना दुखावल्यात तसेच समाजात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम केले गेले असल्याचा आरोप याचिकाकर्ते सामाजिक कार्यकर्ते धनाजी सुरोसे यांनी केला आहे.
□ सरकार, सरकारी कार्यालये धर्मनिरपेक्ष हवी
मुख्यमंत्री पद हे संविधानिक आहे. त्यांनी कोणत्याही धर्माची, पंथाची बाजू न घेता, कोणत्याही धार्मिक वादाला अनुसरून काम करू नये असे असताना त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा कारभार सुरू करताना आपल्याच दालनात सत्यनारायण पूजन केली. हे कृत्य भारतीय राज्यघटनेच्या विरुद्ध, अवमान, करणारे आहे.
भारतीय राज्यघटनेने मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्यामध्ये धार्मिक पूजा करता येत नाही. संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत तत्त्वानुसार भारतातील सरकार, सरकारी कार्यालये धर्मनिरपेक्ष असली पाहिजेत. त्या ठिकाणी कोणत्याही धर्माचे आचरण कोणालाही करता येत नाही. याप्रकरणी भादवि कलम ४०६ प्रमाणे एकनाथ शिंदे शिक्षेस पात्र आहेत. शासनाने केलेल्या नियमांचे उल्लंघन आहे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे ही उल्लंघन केले आहे. तरी त्यांच्या विरोधात तक्रार क्रमांक १६७६/२०२२ प्रमाणे न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी ठाणे यांच्या न्यायालयात सुरोसे यांनी तक्रार केली आहे.
महाराष्ट्र शासनाने याच मुद्यावर काही वर्षापूर्वी एक परिपत्रक काढून महाराष्ट्रातील सर्व सरकारी व निमसरकारी कार्यालय, शिक्षण संस्थांमध्ये आणि परिसरात कोणत्याही प्रकारचा धार्मिक विधी, पूजा (कोणत्याही धर्माचा) करण्यास मनाई केली असून, सरकारी, निमसरकारी कार्यालये यामध्ये देवीदेवतांचे फोटो लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. कार्यालयात लावण्यात आलेले धार्मिक फोटो सन्मानाने लवकरात लवकर काढून टाकण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/591667339177666/