पुणे : महाराष्ट्रातील राजकारणात दररोज नवीन घडामोडी घडत आहेत. आता पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील एका शाळेच्या शिक्षकाने उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. Teacher hastily resigned to support Uddhav Thackeray Indapur
२७ जुलै २०२२ रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवत “शिवसेना” या पक्ष संघटनेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे खरात यांनी राजीनाम्यात म्हटले आहे. दीपक पोपट खरात असे शिक्षकाचं नाव आहे. पक्ष संघटनेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटलं. त्यांच्या राजीनाम्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
एका राजकारणाबाहेरील व्यक्तीने ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. दीपक खरात हे वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित संस्थेच्या प्राथमिक शिक्षण विभागात फेब्रुवारी २००२ पासून सेवेत आहेत. सुमारे २० वर्षे नोकरी झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांचे हे राजीनामा पत्र सध्या व्हायरल होत आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/591552695855797/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यापुढे शिवसेना पक्षाचे पूर्णवेळ काम करणार असल्याची घोषणाही या शिक्षकाने करुन टाकली आहे. त्यांच्या राजीनाम्याचे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होते आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला किती पाठिंबा मिळतो आहे, हे यातून स्पष्ट दिसते आहे. आता शिवसेनेच्या संघर्षाच्या काळात उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी खरात यांनी नोकरी सोडली आहे. शिवसेना संघटनेचे पूर्णवेळ काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
दीपक खरात हे वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित संस्थेच्या प्राथमिक शिक्षण विभागात ते कार्यरत होते. ०१ फेब्रुवारी २००२ पासून ते सेवेत आहेत. सध्या वालचंदनगर येथील पाठशाळा क्र. ३ येथे प्राथमिक शिक्षक म्हणून उपशिक्षक पदावर ते कार्यरत आहेत. त्यांची आतापर्यंतची सेवा २० वर्ष सहा महिने इतकी झालेली आहे. उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी राजीनामा देणारा बहुधा राज्यतील हा पहिलाच शिक्षक असावा. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची सध्या एकाच चर्चा सुरू आहे.
□ टेबलावरून उभं राहून स्वागत – आठवले
एकनाथ शिंदेंनी बंड केले त्यानंतर ते नेमके कोणत्या पक्षात आहेत हे त्यांनाही कळत नसेल. शिवसेना माझीच जरी ते म्हणत असले तरी कोर्टाने अजून काही तसा निकाल दिला नाहीये. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिंदेंना माझ्या पक्षात यायचे असेल तर मी विचार करेल असे विधान केले आहे.
आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांना पक्षप्रवेशाचे आमंत्रण दिले आहे. “मुख्यमंत्री माझ्या पक्षात येत असतील तर मला आनंद होईल. शिवसैनिक माझ्या पक्षात आले तर टेबलवर उभं राहून मी त्यांचं स्वागत करेन. पण शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता मिळेल. खरी शिवसेना शिंदेंची आहे, बरी शिवसेना ठाकरेंची आहे”, असे विधान त्यांनी केले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/591546995856367/