सोलापूर – श्रीराम फायनान्समधील जुन्या गाड्या घेऊन त्या जास्त रकमेने विक्री करुन मोबदला देतो, अशी बतावणी करुन फसवणूक करणारा आरोपी सचिन रामचंद्र गडदे (रा. दमाणी नगर, लक्ष्मी पेठ, सोलापूर) यास सात वर्षे सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी ठोठावली. Fraud of crores by showing the lure of payment by buying and selling old cars, the accused will be jailed
आरोपी सचिन गडदे याने यातील फिर्यादी अनिल भाकरे (रा. सोलापूर) यांच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुध्द सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली होती. या खटल्यामध्ये फिर्यादी व इतर साक्षीदारांची मिळून आरोपीने एकूण एक कोटी २१ लाख ४२ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली आहे.
याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व इतर तीन तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाने फिर्यादी व साक्षीदारांच्या साक्षी या खटल्यात घेण्यात येत आहेत. यामध्ये आरोपींनी फिर्यादीस व साक्षीदारास दिलेल्या रकमेवर चांगल्या परताव्याची रक्कम देण्याचे आमिष दाखवले होते. त्यांनी फिर्यादीस व साक्षीदारास श्रीराम फायनान्स सोलापूरमध्ये कर्ज न फेडलेल्या दुचाकी व चारचाकी गाड्या ओढून आल्यानंतर त्यांचा ज्यावेळी लिलाव होतो. त्यावेळी सदर गाड्या कमी किमतीत घेऊन मी जास्त किमतीत विकतो व त्यातून मला भरपूर नफा मिळत असल्याचे सांगितले.
यासाठी त्यांच्याकडून गुंतवणूक ‘करण्यासाठी रक्कम घेतली. सदर जुनी वाहने घेण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे, असे कारण सांगून त्यांनी फिर्यादी व साक्षीदाराकडून मोठी रक्कम घेतली होती. सदर रक्कम अगर त्यावरील मोबदला फिर्यादीस व साक्षीदारांना परत केला नाही व त्यांची फसवणूक केली. सरकारतर्फे फिर्यादी, तपास अधिकारी यांच्यासह १७ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या होत्या.
मुख्य न्यायदंडाधिकारी भंडारी यांनी आरोपीस सात वर्षे सश्रम कारावासाची व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. यात सरकारतर्फे अमर डोके व आरोपीतर्फे ॲड. श्रीकांत गडदे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस अंमलदार ज्योती बेटकर व अमर शेळके यांनी काम पाहिले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/591471912530542/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ श्रीकांत देशमुख दुष्कर्म प्रकरण पुढील सुनावणी एक ऑगस्टला
सोलापूर : महिलेवर केलेल्या दुष्कर्म प्रकरणी माजी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी सोलापूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश के. डी. शिरभाते यांच्यासमोर झाली असून, सरकारी पक्षाने म्हणणे सादर केले नसल्याने पुढील सुनावणी एक ऑगस्ट रोजी देण्यात आली आहे.
हकिकत अशी की, मुंबई येथील एका महिलेने अर्जदार श्रीकांत देशमुख यांनी त्यांना लग्नाचे अमिष दाखवून मुंबई, सोलापूर, पुणे, सांगली इत्यादी ठिकाणी त्यांच्यावर दुष्कर्म केले, मात्र लग्न केले नाही. अशा आशयाची फिर्याद प्रथमतः पुणे येथील डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र पोलिसांनी ती सोलापूरच्या सदर बझार पोलीस ठाण्यात वर्ग केली. व पोलीस श्रीकांत देशमुख यांना अटक करण्यासाठी त्यांच्या मागावर होते.
त्यामुळे आपणास त्याप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर करावा, असा अर्ज अॅड. मिलिंद थोबडे यांच्यामार्फत दाखल केला. सुनावणीच्यावेळी अॅड. मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात सकृतदर्शनी दुष्कर्माचा गुन्हा आकर्षित होत नाही. अर्जदार हा कोठेही पळून जाणार नाही व तो न्यायालयाचे आदेशाचे पालन करेल, असा युक्तिवाद केला. त्यावरून न्यायाधीशांनी श्रीकांत देशमुख यांना अटक न करण्याचे आदेश पारित केले होते. मात्र पोलीस ठाण्यात दि. २६ व २७ जुलै रोजी हजेरी देण्याचा आदेश केले होते.
दरम्यान गुरुवारी आरोपींच्या जामीन अर्जावर न्यायालयात पुन्हा सुनावणी घेण्यात आली. यावेळी मूळ फिर्यादीच्या वतीने अॅड विद्यावंत पांढरे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांनी आरोपीच्या जामिनाला कडाडून विरोध केला. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याला जामिनावर सोडल्यास तो मूळ फिर्यादीवर दबाव आणण्याची शक्यता आहे. शिवाय आरोपी हा राजकारणी असल्यामुळे फिर्यादी आणि फिर्यादीच्या आईच्या जिवाला धोका निर्माण करण्याची शक्यता आहे, असे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
या प्रकरणात मूळ फिर्यादीतर्फे ॲड. विद्यावंत पांढरे व ॲड. विश्वनाथ वलशेट्टी, आरोपीतर्फे अॅड. मिलिंद थोबडे, ॲड. आकाश गायकवाड (मुंबई), ॲड. बाबासाहेब जाधव, अॅड. विनोद सूर्यवंशी, अॅड. निशांत लोंढे हे काम पाहत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/591377935873273/