मंगळवेढा : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य असून कर्जावरील आकड्यावरून आमच्यावर चुकीचे आरोप करण्यात आले. याबाबतची सत्यता येणाऱ्या अहवालातून समोर येणार असल्याचे समाधान आवताडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. The defeat in Damaji Sugar Factory was accepted by MLA Saadhan Awatade with the Lokmangal Teacher Ratna Award
यावेळी भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, माजी संचालक सुरेश भाकरे,भारत निकम, विनोद लटके, अविनाश मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार आवताडे म्हणाले, की पोटनिवडणुकीनंतर आमदार झाल्यानंतर काही दिवस कोरोनाचा सामना करावा लागल्यामुळे तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात अडचणी आल्या, मात्र सत्ता बदलामुळे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण गती घेतली आहे.
दामाजी कारखान्याचा कारभार हातात घेतल्यानंतर 137 कोटी मुद्दल व त्यावरील व्याजासहित 145 कोटी रुपये देणे होते. त्या अवस्थेत कारभार घेतला. कर्जापेक्षा व्याज जास्त असल्यामुळे बहुतांश बँकांनी कर्ज देण्यास टाळाटाळ केली होती. परंतु आम्ही न घाबरता संचालक मंडळाच्या नावे कर्ज घेऊन सहा वर्ष कारखाना चालवून दाखविला. कारखाना ताब्यात घेतल्यावर एफआरपीप्रमाणे दर देऊन दाखवला कर्जातील आकडेवारीचा अहवाल येत्या दोन महिनाभरात समोर येईल चुकीची आकडेवारी मांडून सभासदांची दिशाभूल करू नये. टेक्समो कंपनीच्या न्यायालयीन दाव्यासाठी 29 कोटींचा खर्च केला केल्याचे म्हटले.
आमच्या कार्यकाळात इतर प्रकल्प नसल्याने तालुक्यातील परिस्थिती, कोरोना आणि साखरेचे घसरलेले दर याचा सामना करावा लागला. सहा वर्षात एकाचाही धनादेश बाऊन्स होऊ दिला नाही. येत्या काळात दामाजी कारखान्यावर इतर प्रकल्प चालू केल्यास कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर येईल तसे आम्ही प्रयत्न केले होते. मंगळवेढ्याचा हा राजवाडा अबाधित राखण्यासाठी संचालक मंडळाने कारखाना योग्य वेळेत चालू करावा, असे आवाहन केले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/591581782519555/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
नगरपालिकेच्या राजकारणाबद्दल बोलताना समाधान आवताडे म्हणाले, की नगरपालिकेच्या राजकारणात करंगळीला धरून पालिकेत गेलेल्यांनीच कारभाऱ्यालाच नगरपालिकेकडून बाहेर काढले असून त्यांच्या भ्रष्टाचाराचे उत्तर जनता पालिका निवडणुकीत दाखवून देईल. नगर पालिका निवडणूक पक्षीय चिन्हावर लढविली जाणार असून त्याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून होणार आहे.
16 तास काम करणारा मी लोकप्रतिनिधी असून प्रलंबित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेमध्ये त्रुटी राहिल्या आहेत. त्यामध्ये गावातील क्षेत्र कमी गृहीत धरले आहे त्या गावात असणारे पाझर तलावाचा समावेश व क्षेत्र वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून महात्मा बसवेश्वर व संत चोखामेळा स्मारकासाठी आमदार झाल्यावर प्रश्न उपस्थित केला. आता सत्ता बदलाने हे मार्गी लावणार असल्याचे समाधान आवतडे यांनी सांगितले.
■ शिक्षक रत्न पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे लोकमंगल फाउंडेशनचे आवाहन
सोलापूर : लोकमंगल फाऊडेशन आणि लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या शिक्षकरत्न पुरस्कारासाठी सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व स्तरावरील शिक्षकाकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुकांनी पुरस्कारासाठी अर्ज करावेत असे आवाहन लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
पुरस्कारासाठी किमान 12 वर्षे सेवा झालेल्या प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन वरिष्ठ महाविद्यालयीन क्रीडा आणि कलाशिक्षकांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे. उपलब्ध प्रवेशिकातून प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातल्या प्रत्येकी दोघाना पुरस्कार दिले जातील. वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, कला शिक्षक आणि कीडा शिक्षक प्रत्येकी एक अशा नऊ शिक्षकाना पुरस्कार दिले जाणार आहेत.
शिक्षक म्हणून सेवा करताना ज्यांनी विशेष उल्लेखनीय उपक्रम राबविले असतील किवा अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर केला असेल अशा एका शिक्षकालाही पुरस्कार दिला जातो. शिवाय एखाद्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातल्या गुणवंत विद्यार्थ्याच्या शिक्षकाला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. असे शिक्षकरत्न पुरस्कार योजनेत 11 शिक्षकांना पुरस्कार दिले जातात. अडीच हजार रूपयाची पुस्तके आणि सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सोलापूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या एका प्राथमिक शाळेला आणि महानगरपालिकेच्या एका शाळेला अशा दोन शाळानाही पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
विहित नमुन्यातले अर्ज खालील दिलेल्या गुगल फॉर्म वर https://drive.google.com/drive/folders/18n2I5FxVkRd5Y_HXgbg3VMlYo4iBO0YH उपलब्ध असतील.
अधिक माहितीसाठी कार्यालयाचा पत्ता अन्नपूर्णा 13 / अ, सह्याद्री नगर, जुना होटगी नाका, सोलापूर संपर्कासाठी फोन क्रमांक 0217-2322480 आणि 9657709710 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑगष्टपर्यंत असून तसेच प्रस्ताव फाईल ऑफिसला आणून द्यावेत असे कळवण्यात आले आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/591377935873273/