मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल 40 आमदार आहेत. आता शिंदे यांना ठाकरे घरातूनही पाठिंबा मिळत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे यांनी शिंदे यांची भेट घेतली. तसेच त्यांना पाठिंबा दिला. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान याआधी बाळासाहेब ठाकरे यांची सून स्मिता ठाकरे यांनी शिंदे यांची भेट घेतली होती. Thackeray’s grandson Nihar Thackeray’s support to Shinde, another Thackeray’s entry into the state
एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्या विरोधात बंडखोरी केल्यानंतर ठाकरे सरकार पडले. यानंतर, राज ठाकरे यांनी वेळोवेळी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना पाठिंबा दिला. स्मिता ठाकरे देखील शिंदे यांना भेटल्या. त्यांनी एकनाथ शिंदे जुने शिवसैनिक असल्याचे म्हणून तेच खरे शिवसैनिक असल्याचे म्हटले आहे.
या सगळ्या प्रकारात ठाकरे यांचे निकटवर्तीय शिंदेंच्या गटाला पाठिंबा देताना दिसत आहेत. कारण ठाकरे घराण्याचे वंशज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. निहार ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे पुतणे आणि हर्षवर्धन पाटील यांचे जावई आहेत. ते बिंदू माधव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. ते शिंदे यांना भेटले असल्याचा फोटो समोर आला आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांकडून निष्ठेची शपथपत्र घेत पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. आता तर थेट ठाकरे घराण्यातील सदस्यच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/591670049177395/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ आणखीन एका ठाकरेंची राजकारणात एंट्री
दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा दिला आहे. तसंच शिंदे यांच्या नेतृत्वात निहार ठाकरे आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे.
निहार ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नातू आणि बिंदूमाधव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जयदेव ठाकरे हे निहार ठाकरे यांचे सख्खे काका तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चुलत काका आहेत. गेल्याच वर्षी निहार ठाकरे यांचा विवाह हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील हिच्यासोबत झाला आहे.
अंकिता पाटील यांनी अलीकडेच राजकारणात प्रवेश केला असून बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला आहे. हर्षवर्धन पाटील हे भाजपत असले तरी त्यांच्या कन्या अद्याप काँग्रेसमध्येच आहेत. आता निहार ठाकरे यांनी थेट एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत राजकारणात एन्ट्री घेतली आहे.
शिवसेनेतील फुटीचा प्रश्न कोर्टात असल्यामुळे दोन्ही बाजूनं आता पक्षावरील वर्चस्व कुणाचं हे दाखवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच ज्येष्ठ शिवसैनिकांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. तसंच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ शिवसैनिक मनोहर जोशी यांचीही एकनाथ शिंदेंनी नुकतीच भेट घेतली होती.
□ मुंबईत सिनेमाच्या सेटला आग
मुंबईच्या अंधेरीत सिनेमा सेटला आग लागली आहे. चित्रकूट मैदानातील ही घटना आहे. या सिनेमा सेटमध्ये चित्रपटाचे शुटिंग सुरु होते. तेव्हा मागच्या बाजूने पेट धरला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी बंब घेऊन घटनास्थळी पोहोचले आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/591651095845957/