पंढरपूर : कार्तिकी एकादशीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यापूर्वी पंढरपूर शहर आणि तालुक्यातून सुरू असणारा अवैध वाळू उपसा महसूल प्रशासनाने वाळू वाहणाऱ्या 11 होड्या कटरच्या सहाय्याने फोडून बंद केला आहे. Before Deputy Chief Minister Devendra Fadnavis came on tour, 11 boats were broken in the riverbed, but the action was limited to Kartiki Vari.
तहसीलदार सुशील बेलेकर यांच्या सूचनेवरून महसूल विभागाच्या टीमने आज भीमा नदी पात्रातील वाळू वाहणाऱ्या 11 होड्या कटरच्या सहाय्याने फोडले आहेत. या दौऱ्यात देवेंद्र फडणवीस महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करतील या भीतीने महसूल विभागाने ही कारवाई केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी वाळूबाबत कडक जाहीर भूमिका घेतली होती. वाळूमध्ये सामील अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा त्यांनी वापरली होती. त्या भीतीपोटी महसूल विभागाने दौऱ्याच्या तोंडावर वाळू बंद केली आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळूबंदीच्या सूचना दिल्यानंतर सुद्धा पंढरपुरात वाळू उपसा सुरूच होता. महसूल मंत्र्यांच्या सूचना महसूल विभागाने गांभीर्याने घेतल्या नसल्याचे समोर आले होते. दररोज 70-80 वाहनांतून वाळू वाहतूक केली जाते. प्रत्येक वारीला चंद्रभागा नदीतील वाळू उपसा केलेली खड्डे प्रशासनाला बुजवावी लागतात.
पंढरपूर शहर आणि तालुक्यातून राजरोसपणे वाळू उपसा सुरू असतो. मात्र, त्याकडे महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर दौऱ्यावर येणार असल्यामुळे पंढरपूर शहरालगतच्या नदीपात्रातून 11 होड्या महसूल प्रशासनाने कटरच्या सहाय्याने फोडले आहेत. ती कारवाई तहसीलदार सुशील बेलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी विजय शिवशरण, तलाठी राजेंद्र वाघमारे, प्रशांत शिंदे, दत्ता कोताळकर यांच्या पथकाने केली आहे.
□ महसूल मंत्र्याच्या आदेशाला टोपली
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पंढरपूर दौऱ्यावर आले असताना वाळूचे लाभार्थी असणाऱ्या तहसीलदार तलाठ्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र महसूल प्रशासनाने त्या आदेशांना केराची टोपली दाखवली. पंढरपुरातून राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे. पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर मुंडेवाडी चळे आंबे सरकोली या गावात वाळू माफियाशी लागेबांधे असल्यामुळे कधीच वाळू बंदी होत नाही. रविवारी पंढरपूर तालुका पोलिसांनी तीन वाहनावर कारवाई करत 18 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे मात्र महसूल प्रशासन बघायचे भूमिका घेत आहे
□ वारी झाल्यावर पुन्हा वाळूमाफियांची दहशत सुरू होते
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी आल्यानंतर वारी कालावधीतच केवळ वाळू उपसा हा बंद असतो. त्यानंतर वाळू माफिया यांची प्रचंड दहशत असते. वारी झाल्यानंतर सुद्धा वाळू माफिया वर अशाच पद्धतीची महसूल प्रशासनाने करावी अशी अपेक्षा असल्याचे तेथील नागरिक शाम गोगाव यांनी व्यक्त केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच गुरूवारी सोलापूर दौ-यावर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी गुरूवारी ( ३ नोव्हेंबर) सोलापूर जिल्ह्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच ते जिल्ह्यात येणार असल्याचे भाजप नेत्यांकडून स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.
पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होते. शुक्रवारी (४ नोव्हेंबर) कार्तिकी एकादशीचा सोहळा होणार आहे. शुक्रवारी मध्यरात्री शासकीय महापूजा होईल. देवेंद्र फडणवीस यांचे गुरूवारी रात्री पंढरपुरात आगमन होईल.
शासकीय महापूजा झाल्यानंतर नोव्हेंबर रोजी ते तालुक्यात आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या मंगळवेढा तालुक्यातील आवताडे शुगर्सच्या मोळी पूजनाचा कार्यक्रम दुपारी १२ वाजता होणार आहे. आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी येथे दोन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
दुपारी अडीच वाजता एका खासगी सोयाबीन प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून कार्यान्वित झालेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.