सोलापूर : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या एनएचएमने नौकर भर्तीचा सपाटा लावून धरला आहे तर याच विभागातील ११ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (डॉक्टरांनी) राजीनामे सादर केल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. On the one hand, the level of health recruitment, on the other hand, 11 doctors resigned; Excitement in Health Department Solapur Zilla Parishad
राजीनामा दिलेल्या अकरा वैद्यकीय अधिकाऱ्यात तीन वैद्यकीय अधिकारी हे कायमसेवेतील तर आठ वैद्यकीय अधिकारी हे बंद पत्रित आहेत. जिल्ह्यात ७८ प्राथमिक आरोग्य केंद्र तर ५७८ उपकेंद्र कार्यरत आहेत. बंदपत्रीत वैधकीय अधिकाऱ्यांनी पदवीधर अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेसाठी अभ्यासाला वेळ मिळावा यासाठी राजीनामा दिल्याचे स्पष्टीकरण राजीनामा पत्रात दिले आहे. तर कायमसेवेत असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचे नेमके कारण राजीनामा पत्रात नमुद केलेले नाही.
राज्याच्या आरोग्य आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी ग्रामीण आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला आहे. आरोग्य सेवेची तुकाराम मुंढे यांनी प्रत्यक्ष तपासणी सुरू केली आहे. त्याचे पडसाद सोलापूर जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या राजीनामा सत्राने उमटत असल्याचे बोलले जात आहे.
आरोग्य विभागामधील डॉक्टरांनी जरी राजीनामे दिले असले तरी वेटिंग वर असणारे बीएएमएस झालेले डॉक्टर कामावर येण्यास तयार असून गरज भासल्यास त्यांना तातडीने आपण सेवेत घेणार आहोत त्याप्रमाणे शासनाची माहिती आरोग्य विभागाला उपलब्ध झाली आहे.
□ १५० वैद्यकीय अधिकाऱ्यांवर जिल्ह्याची जबाबदारी
आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात एकूण १६१ वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. यापैकी ९६ वैद्यकीय अधिकारी हे कायम, ३५ वैद्यकीय अधिकारी हे बंदपत्रित आहेत. तर ३० कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी कायम असणाऱ्या ९६ वैद्यकीय अधिकाऱ्यापैकी तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तर बंदपत्रीत ३५ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी आठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता केवळ १५० वैद्यकीय अधिकाऱ्यावर संपूर्ण ग्रामीण जनतेच्या आरोग्याची जबाबदारी आहे.
□ सोलापूर । रस्त्यात कार बंद पडल्याने अत्याचाराला फुटली वाचा; तिघांना सक्तमजुरीची शिक्षा
सोलापूर : गावातील अल्पवयीन मुलीला फसवून गाडीत घालून तिचे अपहरण केले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तिघांना ३ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी ३ हजार रूपये दंडाची शिक्षा जिल्हा विशेष न्यायाधीश व्ही पी आव्हाड यांनी सुनावली.
महादेव मल्लेशा बिराजदार (वय ३०), राजशेखर पुंडलिक कोकरे (वय २६), रमेश मल्लेशा बिराजदार (वय ३८, सर्व रा. तेलगांव, ता. उत्तर सोलापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनी मिळून दि. ३ फेब्रुवारी २०१७ रोजी सैफुल चौकातून एका अल्पवयीन मुलीला घरी सोडतो म्हणून कार मध्ये बसवून घराकडे न नेता दुसरीकडेच नेले.
तिला मारहाण करून दमदाटी केली आणि गळ्याला विळा लावून मंद्रुपच्या दिशेने कर्नाटकातील चडचण, त्यानंतर सांगलीतील जत मुचंडी येथे नेवून गाडीमध्येच तिचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार केला त्याचवेळी त्यांची कार बंद पडल्याने एका शेतात लावलेली असताना स्थानिकांनी पोलीसांना याबाबत माहिती दिली. ‘त्यावेळी स्थानिक पोलीस पाटलाने मुलीला विश्वासात घेवून चौकशी केली.
चौकशी केली असता मुलीचे अपहरण आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले त्यांनी तातडीने सोलापूरमधील विजापूर नाका पोलीसांना माहिती देवून आरोपींना पोलीसांच्या हवाली केले. या प्रकरणाची विजापूर नाका पोलीस ठाण्यात मुलीच्या काकाने फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलीसांनी तपास करून आरोपी विरूध्द न्यायालयात दोषारोप दाखल केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
न्यायालयात सरकारच्या वतीने एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिचे अपहरण केले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला म्हणून आरोपींना ३ वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी ३ हजार रूपये दंड तसेच आरोपी महादेव याला बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये ३ वर्ष सक्तमजुरी आणि १ हजार रूपये दंड तसेच दंडामधील ६ हजार रूपये पिडीतेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
या प्रकरणी सरकारच्या वतीने ॲड. शितल डोके, आरोपीच्या वतीने अँड व्हि डी फताटे यांनी तर या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजीव भोसले यांनी केले कोर्ट पैरवी म्हणून पोलीस शिपाई कोकणे यांनी मदत केली.
》 सोलापूर । ऊसतोड ड्रायव्हरचा खून; महिलांसह पाच जणांना पोलीस कोठडी
सोलापूर – मुकादमच्या पत्नीला वाईट बोलण्याच्या कारणावरून लाकडी दांडक्याने मारून ट्रॅक्टर चालकाचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात अटकेत असलेल्या पाचजणांना आज कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यात दोन महिलांचा समावेश आहे.
अभिमान बाजीराव साबळे (वय ४५) त्याची पत्नी मनीषा साबळे (वय ४०) अशोक भागिनाथ गिरी (वय ४३) त्याची पत्नी अंजना गिरी (वय ३९) आणि मल्लप्पा मलसिद्ध कांबळे (वय ५१ सर्व रा. मालकाची वाडी ता.शिरूर जि.बीड) अशी कोठडी सुनावलेल्याची नावे आहेत. त्यांना ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज बुधवारी दिला. या घटनेची फिर्याद बाळू भानुदास पवार यांनी पोलिसांत दिली.
सोमवारी (ता. 31 ऑक्टोबर) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मंद्रुप येथील सीतामाई तलावाजवळ रमेश केसव मिसाळ (वय ३४ रा.खोकरमोहा ता. शिरूर जि.बीड) या ट्रॅक्टर चालकाचा पाच जणांनी मिळून लाथाबुक्क्या आणि काठीने मारून खून केला होता. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मिसाळ याचा मृतदेह पोत्यात भरून तो अभिमान साबळे याच्या खोलीत लपवून ठेवला होता.
या प्रकरणात मंद्रूपच्या पोलिसांनी मंगळवारी ५ जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध खून करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ५ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पुढील तपास फौजदार अमितकुमार करपे करीत आहेत.
□ सोमवारी काय झाले
सोमवारी (31 ऑक्टोबर) रात्री अकरा वाजता मुकादमच्या झोपडीजवळ रमेश मिसाळ यांच्यात वाद चालू होता. यावेळी अभिमान बाजीराव साबळे, अशोक बगीनाथ गिरी (दोघे रा.मलकाचीवाडी, ता. शिरूर , कासार) हे त्याला लाकडाने मारहाण करू लागले. पाठोपाठ मलप्पा मळसिद्ध कांबळे (रा. सादेपूर, ता.द.सोलापूर), मनीषा अभिमान साबळे, अंजना अशोक गिरी (दोघी रा. मलकाचीवाडी) हेसुद्धा भांडणादरम्यान मिसाळ यास मारहाण करु लागले. त्यावेळी साबळे याने काठीने रमेशच्या पाठीवर, दोन्ही पायांवर, दोन्ही हातांवर मारहाण केली. या जबर मारहाणीत मिसाळ याचा मृत्यू झाला.
रमेश मिसाळ ठार झाल्याची खात्री झाल्यावर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत पोत्यात भरून मुकादम साबळे याच्या झोपडीत ठेवले. पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतल्यावर मृत मिसाळ याचा मृतदेह पोत्यात सापडला. पोलिसांनी या घटनेतील सर्व आरोपींना अटक केली असून आज पोलीस कोठडी सुनावली आहे.