पंढरपूर : कार्तिकी एकादशी आज (4 नोव्हेंबर) आहे. त्यानिमित्त पंढरपुरात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रूक्मिणीची शासकीय पुजा पार पडली आहे. या पुजेसाठी मानाचे वारकरी हे औरंगाबादचे माधवराव साळुंके ठरले आहेत. तसेच विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. Official Mahapuja of Vitthal Rukmini at the hands of Deputy Chief Minister; Aurangabad Devendra Fadnavis is also crowded with the darshan queue
पुंडलिक दृष्टी देखिलिया ।।
तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक ।
विठ्ठलची एक देखिलिया ।।
या संतोक्तीप्रमाणे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनाची आस ठेवून राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आज वारकरी पंढरीत दाखल होत असून, टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी भक्तिरसाने भारून गेली आहे. आतापर्यंत सुमारे तीन लाख वारकऱ्यांची मांदियाळी पंढरीत दाखल झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी पहाटे अडीच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा होणार आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनरांगेसह मुखदर्शनाच्या रांगेतही मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. दर्शनाची रांग दोन दिवसाआधीच गोपाळपूर रस्त्याच्या चार नंबर पत्राशेडच्याही पुढे गेली आहे. आजही तीच परिस्थिती राहिली. दर्शनरांगेतून दर्शनासाठी साधारण १३ ते १५ तासांचा कालावधी लागतो आहे. तर एका मिनिटाला ४० ते ५० वारकरी दर्शन करून बाहेर पडत आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सौ अमृता फडणवीस, मानाचे वारकरी उत्तमराव साळुंखे व सौ कलावती साळुंखे यांच्या हस्ते कार्तिकी एकादशी मुख्य शासकीय महापूजा संपन्न. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत उपस्थित होते. प्रबोथिनी एकादशी (कार्तिकी यात्रा) निमित्त श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री. नामदेव पायरी श्री. विठ्ठल सभामंडप श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात सुंदर व आकर्षक अशी फुलाची आरास करण्यात आली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
महापूजेसह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी म्हणून उत्तमराव माधवराव साळुंखे (वय ५८) व कलावती उत्तमराव साळुंखे (वय ५५, रा.शिरोडी खुर्द, फुलंबी जि. औरंगाबाद) या दापत्याची निवड करण्यात आली. यामुळे साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विठ्ठलाची शासकिय महापूजा करण्याचा मान मिळाला.
कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवेळी मानाच्या वारकरी म्हणून दर्शन रांगेतून माळकरी भाविकाची निवड केली जाते. यंदाच्या वर्षी हा उत्तमराव माधवराव साळुंखे (वय. ५८) व कलावती उत्तमराव साळुंखे (वय ५५, रा.शिरोडी खुर्द, फुलंबी जि. औरंगाबाद) यांना हा मान मिळाला असून, हे पती-पत्नी मागील ५० वर्षापासून विठुरायाची यात्रा करीत आहेत. त्यांना दोन मुले, २ मुली व नातवंडे असा परिवार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात विविध देशी आणि विदेशी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. सजावटीसाठी मोगरा, जरबेरा, आष्टर, झेंडू, गुलाब,कॉनवर अशा विविध देशी विदेशी 30 प्रकारच्या पाच टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. विठ्ठल रूक्मिणीचा गाभारा, सोळखांबी, प्रवेशद्वार, सभामंडप आदी ठिकाणी फुलांची सजावट करण्यात आली आहे. पुणे येथील भाविक राम जाभुळकर यांनी ही मोफत सजावट केली आहे. फुलांच्या सजावटीने देवाचे रूप खुलले आहे.
आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही वाऱ्यांना वारकरी परंपरेत विशेष महत्त्व आहे. कोरोनामुळे शतकानुशतकांच्या वारी परंपरेत गेली दोन वर्षे खंड पडला होता. गेल्या वर्षीही तशी जेमतेम वारी झाली. पण यंदा परिस्थिती पूर्वपदावर असल्याने पूर्वीप्रमाणेच वारीचा उत्साह अवघ्या पंढरीत दाटलेला दिसतो.
राज्याच्या विविध भागांसह कर्नाटक आणि तेलंगणामधूनही वारकरी येत आहेत. शहरातील विविध देवदेवतांची मंदिरे, धर्मशाळा, मठांमधून भजन-भारुडे सुरू आहेत. अनेक ठिकाणी प्रवचने आणि कीर्तने रंगली आहेत. चंद्रभागा नदीच्या किनारीही ज्ञानोबा – तुकारामांसह माऊली, माउली असा जप सुरू आहे. चंद्रभागेतील दशमीच्या स्नानाला विशेष महत्त्व असल्याने गुरुवारी भल्या पहाटेपासूनच नदीवर वारकऱ्यांची स्नानासाठी दिवसभर झुंबड उडाल्याचे चित्र होते.
विशेषतः नदी परिसर, नगरप्रदक्षिणा मार्गा, चौफाळा, एस.टी. स्थानक, रेल्वे स्थानक परिसरात वारकऱ्यांची मोठी गर्दी आहे. नगरप्रदक्षिणा मार्गासह मंदिराकडील प्रमुख मार्गावर अरगजा, गुलाल – बुक्क्यासह प्रासादिक वास्तूंची दुकाने, गृहोपयोगी साहित्य, लहान मुलांची खेळणी यांसह विविध प्रकारची दुकाने थाटल्याने खरेदीसाठी इथे गर्दी दिसत आहे. या वारीसाठी एसटी, रेल्वेसह खासगी वाहनांनीही वारकरी पंढरीत दाखल होत आहेत. त्यामुळे क्षणाक्षणाला गर्दीत वाढ होते आहे.