सोलापूर : आमचा जन्म काँग्रेसमध्ये झाला आणि शेवटही कॉंग्रेसमध्ये होणार आहे. भाजपचे लोक अफवा पसरवण्यात माहीर आहे. त्यांच्याकडे सोलापुरात चांगले नेतृत्व नसल्यामुळे शिंदे कुटुंबीय भाजपमध्ये येणार अशी अफवा पसरत असल्याचे सांगत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. BJP will enter Lok Sabha and contest; MLA Praniti Shinde himself put a stop to the discussion
मध्यंतरी काही दिवसांपूर्वी आमदार प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाऊन लोकसभा लढवणार अशी चर्चा होती. याबाबत पत्रकारांनी विचारले असता आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की , शिंदे कुटुंबिय भाजपमध्ये जाणार ही अफवा भाजपचीच लोक पसरवत आहेत पण आमची सुरुवात काँग्रेसमध्ये झाली आणि शेवटही काँग्रेसमध्ये होणार आहे हे आमच्या पक्षातील लोकांनाही माहिती आणि सर्वसामान्य जनतेला ही माहिती आहे. त्यामुळे मला काहीही प्रूफ करण्याची गरज नाही असे सांगत त्यांनी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
सोलापूर शहरात भाजपचे दोन आमदार आणि एक खासदार आहेत. पालिकेत भाजपची सत्ता आहे मात्र त्यांना काहीही शहराचा विकास करता आला नाही. गेल्या निवडणुकीच्या दरम्यान रोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्यापही चार ते पाच दिवस पाणीपुरवठा होत आहे.
शहर आणि जिल्ह्यात कोणतेही नवीन व्यवसाय आले नाहीत त्यामुळेच आगामी काळात कोण उमेदवार लोकसभेला द्यायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळेच शिंदे कुटुंबीय भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा अफवा त्यांच्याकडून पसरवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
□ भिडे यांच्यावर केली टीका
संभाजी भिडे यांची संस्कृती भाजप पुरस्कृत आहे भाजपच्या मनात काय आहे तेच भिडे बोलतात त्यांना त्या महिला पत्रकारांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही महिलेचे कर्तुत्व न बघता तिच्या चेहऱ्यावर बघून बोलणारे भिडे यांचा निषेध आहे असे म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● एकीकडे आरोग्यभर्तीचा सपाटा तर दुसरीकडे ११ डॉक्टरांनी दिले राजीनामे; आरोग्य विभागात खळबळ
सोलापूर : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या एनएचएमने नौकर भर्तीचा सपाटा लावून धरला आहे तर याच विभागातील ११ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (डॉक्टरांनी) राजीनामे सादर केल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.
राजीनामा दिलेल्या अकरा वैद्यकीय अधिकाऱ्यात तीन वैद्यकीय अधिकारी हे कायमसेवेतील तर आठ वैद्यकीय अधिकारी हे बंद पत्रित आहेत. जिल्ह्यात ७८ प्राथमिक आरोग्य केंद्र तर ५७८ उपकेंद्र कार्यरत आहेत. बंदपत्रीत वैधकीय अधिकाऱ्यांनी पदवीधर अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेसाठी अभ्यासाला वेळ मिळावा यासाठी राजीनामा दिल्याचे स्पष्टीकरण राजीनामा पत्रात दिले आहे. तर कायमसेवेत असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचे नेमके कारण राजीनामा पत्रात नमुद केलेले नाही.
राज्याच्या आरोग्य आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी ग्रामीण आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला आहे. आरोग्य
सेवेची तुकाराम मुंढे यांनी प्रत्यक्ष तपासणी सुरू केली आहे. त्याचे पडसाद सोलापूर जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या राजीनामा सत्राने उमटत असल्याचे बोलले जात आहे.
आरोग्य विभागामधील डॉक्टरांनी जरी राजीनामे दिले असले तरी वेटिंग वर असणारे बीएएमएस झालेले डॉक्टर कामावर येण्यास तयार असून गरज भासल्यास त्यांना तातडीने आपण सेवेत घेणार आहोत त्याप्रमाणे शासनाची माहिती आरोग्य विभागाला उपलब्ध झाली आहे.
□ १५० वैद्यकीय अधिकाऱ्यांवर जिल्ह्याची जबाबदारी
आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात एकूण १६१ वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. यापैकी ९६ वैद्यकीय अधिकारी हे कायम, ३५ वैद्यकीय अधिकारी हे बंदपत्रित आहेत. तर ३० कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी कायम असणाऱ्या ९६ वैद्यकीय अधिकाऱ्यापैकी तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तर बंदपत्रीत ३५ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी आठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता केवळ १५० वैद्यकीय अधिकाऱ्यावर संपूर्ण ग्रामीण जनतेच्या आरोग्याची जबाबदारी आहे.