मोहोळ : स्थापत्य अभियंता सहायकाने अज्ञात कारणावरून राहत्या घरी खोलीत असलेल्या पंख्याला वायरने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी (ता.5) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. Mohol Construction assistant engineer committed suicide without hanging himself
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास रमेश काटकर (रा. विडी घरकुल, एमएससीबी कंम्पाउंडचे समोर, ता. उत्तर सोलापूर , जि. सोलापूर) हे बांधकाम विभागात गेल्या वर्षापासून नोकरीस आहे. ते सध्या स्थापत्य अभियंता सहाय्यक पदावर जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, मोहोळ येथील कार्यालयात कार्यरत होते. ते पत्नी व लहान मुलासह मोहोळ येथे वास्तव्यास होते.
दरम्यान त्यांची पत्नी माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे घरी सुहास काटकर हे एकटेच होते. आज शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान त्यांनी अज्ञात कारणावरून मोहोळ येथील भाड्याचे राहात्या घरी खोलीत असलेल्या पंख्याला वायरच्या सहायाने गळफास घेवून आत्महत्या केली.
याप्रकरणी रमेश श्रीधर काटकर यांनी दिलेल्या खबरीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मालती नागरे करीत आहेत. मृत सुहास काटकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन विवाहित बहीण, व एक मुलगा असा परिवार आहे. दरम्यान त्यांच्या आत्महत्येची बातमी समजताच मोहोळ येथील बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी, व त्यांच्या मित्र परिवाराने शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
■ सहाय्यक फौजदाराकडून तरुणास बेदम मारहाण ; चौघांवर गुन्हा
सोलापूर : तू माझ्या जावयासोबत का फिरतो या कारणावरून एका सहाय्यक फौजदारासह चौघानी मिळून तरुणास शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी ( दि.२ नोव्हेंबर ) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास रिलायन्स स्मार्ट पाँईट,म्हेत्रे टॉवर जुळे सोलापूर येथे घडली.
याप्रकरणी प्रदिप विकास पाटील (वय-२७,रा. मिनानगर,बॉम्बे पार्क जवळ, जुळे सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सहाय्यक फौजदार महेश शेजेराव, हर्षवर्धन शेजेराव,श्रीकांत कोळी व संतोष कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी व सहाय्यक फौजदार महेश शेजेराव यांचे जावई नितीन अनिल पतंगराव हे दोघे रिलायन्स स्मार्ट पॉईंट येथे मिळून काम करतात. प्रदीप आणि नितीन हे रिलायन्स स्मार्ट पॉईंट येथील मालाचे डिलिव्हरी करण्यासाठी एकत्र फिरत असतात. फिर्यादीच्या स्टाफमधील एका कर्मचाऱ्यांच्या वाढदिवस असल्याने सगळेजण रिलायन्स स्मार्ट पॉईंट येथे थांबले होते.
त्यावेळी तेथे महेश शेजेराव यांनी फिर्यादीस बाहेर बोलावून शिवीगाळ करून तु माझ्या जावई नितीन याच्यासोबत का फिरतोस असे म्हणून महेश शेजेराव यांच्यासोबत आलेले हर्षवर्धन शेजेराव,श्रीकांत कोळी,संतोष कोळी या चौघांनी मिळून फिर्यादीस लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतर हर्षवर्धन याने गाडीला लावलेली काठी काढून काठीने मारहाण केली. तू जर तक्रार देण्यासाठी चौकीला गेलास तर तुला जीव मारतो अशी धमकी हर्षवर्धन याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा पुढील तपास पोसई मुलाणी हे करित आहे.