मुंबई : काँग्रेसने उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. सत्तेत असून ज्यांना आपला पक्ष सांभाळता आला नाही. त्यांनी दुसऱ्यांच्या पक्षाची काळजी करण्याचे कारण नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. भाजपने काँग्रेसचे 22 आमदार फोडले आहे. 16 आमदार बाद झाले तर ते भाजपमध्ये तयार बसले आहेत, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. Couldn’t manage his own party; Chandrakant Khaire responds to Uddhav Thackeray of Congress
शिंदे- फडणवीस सरकार लवकरच कोसळणार, असे विरोधकांकडून वारंवार सांगितले जात आहे. त्यातच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. 16 आमदार अपात्र ठरल्यावर सरकार पडेल म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले आहेत, असा दावा त्यांनी केला. जर सरकार कोसळले तर भाजपचा कसा मुख्यमंत्री होईल, याचाही प्लॅन त्यांनी तयार केल्याचे त्यांनी सांगितले. या वक्तव्यामुळेच काँग्रेस नाराज झाली आहे. त्यामुळेच नाना पटोले यांनी हे विधान केले आहै.
नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “ज्यांना आपालच पक्ष सत्तेमध्ये असुनही सांभाळता आला नाही, त्यांनी दुसऱ्या पक्षाची काळजी करु नये, अशा शब्दात नाना पटोले यांनी पलटवार केला आहे. चंद्रकांत खैरे यांच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना नाना पटोले यांनी पलटवार केला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
गिरीश महाजन यांच्या फडणवीसांनी महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला या विधानाचाही नाना पटोले यांनी समाचार घेतला. माझ्या मित्राचाच करेक्ट कार्यक्रम झालाय. खरं तर माझा मित्र मुख्यमंत्री असायला पाहिजे होता, परंतु त्यांचे डिमोशन झाले. त्याचे सर्वात जास्त दुःख मला आहे, अशा शब्दात नाना पटोले यांनी फडणवीस यांना डिवचले.
राज्यामध्ये हुकूमशाहीचे सरकार आहे. लोकशाहीला न मानणारे सरकार आहे. त्यामुळे भारत तोडो सरकारला हे कळणार नाही. भारत जोडो यात्रेचा उलटा परिणाम पाहायला मिळत आहे, असंही ते म्हणाले. तोडोवाल्यांचा जोडोशी काय संबंध? त्यांच्याबद्दल फारसे बोलणे योग्य नाही. गिरीश महाजन यांनी भारत जोडो यात्रेचा परिणाम उलटा पाहायला मिळत असल्याची टीका केली होती, त्यावर पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं.
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आहे. लवकरच ही यात्रा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेते आता जय्यत तयारी करताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील या यात्रेचा शेवट बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या सहकाऱ्यांसह शेगावात सकाळी उठून मॉर्निंग करताना पाहायला मिळत आहेत. यावेळी राहुल गांधींची यात्रा राजकीय नसून ती फक्त भारत जोडो साठी निघालेली असल्याचे भाष्य करत त्यांनी राजकीय विधान करणं टाळलं आहे.