विरवडे बु : मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन विरोधकांना विद्यमान अध्यक्ष तथा खासदार धनंजय महाडिक यांनी केले होते. मात्र, माजी आमदार प्रशांत परिचारक आणि माजी आमदार राजन पाटील यांनी महाडिकांनी धुडकावून लावत भीमा बचाव परिवर्तन आघाडीच्या नावाखाली आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे भीमा कारखाना बिनविरोध न होता त्याची निवडणूक लागली आहे. Finally, the election of Bhima Cooperative Sugar Factory took place, Dhananjay Mahadika’s request was rejected by Patil paricharak
भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी आता भीमा शेतकरी विकास आघाडी विरुद्ध भीमा बचाव परिवर्तन आघाडी अशी दुरंगी लढत होत आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. भीमा कारखान्यासाठी येत्या १३ तारखेला मतदान होणार असून १४ तारखेला मतमोजणी होणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी भीमा कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन विरोधकांना केले होते.
मात्र, विरोधकांनी ते अमान्य करीत निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. महाडिक यांनी निवडणुकीत आपल्या पॅनेलमधून सहा नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे तर उर्वरित जुने आहेत. त्यामुळे जुन्या नव्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न खा. धनंजय महाडिक यांनी केला आहे.
दरम्यान, भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार महाडिक यांचे सुपुत्र विश्वराज महाडिक हे पुळूज गटातून उभे आहेत, तर त्यांच्या विरोधात भीमा बचाव’चे कारखान्याचे उपाध्यक्ष राहिलेले कल्याणराव पाटील उभे आहेत.
कारखान्याचे सध्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण हे टाकळी सिकंदर गटातून उभे आहेत. संस्था प्रतिनिधी गटातून खासदार धनंजय महाडिक हे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्या विरोधात भीमा बचावचे राजेंद्र आदिनाथ चव्हाण उभा आहेत.
सर्वांचे लक्ष असलेल्या कोन्हेरी गटातून सध्याचे संचालक राजेंद्र टेकळे यांना भीमा विकास आघाडीने पुन्हा संधी दिली आहे, तर त्यांच्या विरोधात जनहित शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष कुमार गोडसे उभा आहेत. भीमा बचाव आघाडीकडून पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांच्या पत्नी अर्चना घाडगे यांना संधी देण्यात आली आहे, तर त्याच गटातून भीमा विकास आघाडीतून सिंधू चंद्रसेन जाधव यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार महाडिक यांचे सुपुत्र विश्वराज महाडिक यांनी गेल्या आठवड्यापासून ‘होम टू होम’ जाऊन सर्व वातावरण ढवळून काढले आहे. या निवडणुकीत काय होणार, हे येत्या १४ तारखेलाच समजणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● भीमा शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार पुढीलप्रमाणे
पुळूज गट : विश्वराज धनंजय महाडिक, बीभिषण बाबा वाघ
टाकळी सिकंदर गट : सुनील रावसाहेब चव्हाण, संभाजी नामदेव कोकाटे सुस्ते गट : संतोष चंद्रकांत सावंत, तात्यासाहेब चंद्रकांत नागटिळक
अंकोली गट : सतीश नरसिंग जगताप, गणपत महादेव पुढे कोन्हेरी गट : राजेंद्र गोरख टेकळे,
महिला राखीव गट : सिंधू चंद्रसेन जाधव, प्रतीक्षा बाबूराव शिंदे इतर
मागासवर्गीय गट : अनिल आगतराव गवळी,
भटक्या विमुक्त जाती जमाती गट : सिद्राम ज्ञानोबा मदने अनुसूचित जाती जमाती गट : बाळासाहेब बापू गवळी संस्था प्रतिनिधी गट : खा धनंजय भीमराव महाडिक
● भीमा बचाव परिवर्तन आघाडीचे उमेदवार
पुळुज गट : कल्याणराव आप्पाराव पाटील, देवानंद रावसाहेब गुंड
टाकळी सिकंदर गट : राजाराम दगडू माने, शिवाजी संदिपान भोसले
सुस्ते गट : पंकज मच्छिंद्र नायगुडे, विठ्ठल दत्तात्रेय रणदिवे
अंकोली गट : भारत गोविंद पवार, रघुनाथ नेमिनाथ सुरवसे
कोन्हेरी गट : कुमार महादेव गोडसे
महिला राखीव गट : सुहासिनी शिवाजी चव्हाण, अर्चना दिलीप घाडगे
अनुसूचित जाती जमाती गट : भारत सुदाम सुतकर
इतर मागास प्रवर्ग : राजाभाऊ कुंडलिक भंडारे
भटक्या विमुक्त जाती जमाती गट : राजू विठ्ठल गावडे
संस्था गट : राजेंद्र आदिनाथ चव्हाण