□ स्पेंटवॉशपासून पोटॅश निर्मितीमुळे कारखाना प्रदूषणमुक्त
श्रीपूर : देशातील सहकारी साखर उद्योगामध्ये पांडुरंग कारखान्याने बॉयलरमधुन निघणाऱ्या गरम वाफेवर स्पिन फ्लॅश ड्रायर हा आधुनिक प्रकल्प उभारुन स्पेंटवॉश पासून पोटॅशयुक्त खताची निर्मिती करणारा पांडुरंग सहकारी साखर कारखाना देशातील पहिला कारखाना ठरला आहे. जमिनीचा कस वाढविणे, शेतकऱ्यांचे हित तसेच प्रदूषणमुक्त कारखाना अशी त्रिसूत्री यातून साधली जाणार आहे. अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी दिली. ‘Pandurang Sugar Factory’ of Solapur became the first potash fertilizer manufacturing factory in the country Malshiras
दिवसेंदिवस रासायनिक खताचा अतिरिक्त वापर होत असल्याने जमीनीची सुपीकता कमी होत आहे. त्याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांना सेंद्रीय खतांचा वापर करण्यासाठी सुपंत पोटॅश निर्मिती कारखान्याची उभारणी करण्यात आली आहे.
माळशिरस तालुक्यातील श्रीपुर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या अटी व शर्तीनुसार झिरो लिक्विड डिस्चार्ज करण्यासाठी रॉ स्पेंटवॉश वरती चालणारा स्पिन फ्लॅश ड्रायर प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. यामध्ये ९० लाख क्षमता असलेल्या डिस्टलरीज मधून निघणाऱ्या स्पेंटवॉशला ड्रायर केले जाते. त्या स्पेंटवॉशमध्ये चुना सल्फ्युरिक ऍसिड, अमोनिया व बॉयलरची राख योग्य प्रमाणात मिश्रण करून स्पिन फ्लॅश ड्रायर मधे प्रोसेस केले जाते.
यामध्ये ४ ते ५ % इतकी पोटॅशची मात्रा आढळून आली असुन, त्याची विक्री पोटॅशयुक्त खत म्हणून शेतकऱ्यांना करीत आहोत. हा प्रकल्प बॉयलरमधून निघणाऱ्या हॉट फ्लु गॅसेसवरती चालत असल्याने अतिरीक्त स्टीम किंवा बगॅसची आवश्यकता नाही. त्यामुळे उत्पादन खर्चामध्ये बचत होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● ‘पांडुरंग’ने साखर निर्मितीबरोबर शेतकऱ्यांच्या हिताचे प्रकल्पाची उभारणी
श्री पांडुरंग कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी गेले आठ वर्षात साखर उद्योगा बरोबर पोटॅश खत निर्मिती, कंपोस्ट खत, सॅनिटायझर, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, सौरऊर्जा, सीपीओ टेक्नॉलॉजी मधून पाणी शुध्दीकरण, रेन हार्वेस्टिंग, सुपंत द्रवरूप जिवाणू खते प्रकल्प, माती परीक्षण, सुपंत ऍग्रो फार्म मार्फत ऊस बेनी मळा, ऊस पिक दिनदर्शिका, शेतकरी प्रशिक्षण असे १२ पेक्षा जास्त प्रकल्प उभा करून उत्तम व्यवस्थापन केले आहे.
“देशाच्या गरजेच्या ९८ टक्के पोटॅश बाहेर देशातून आयात करावी लागते. भारतात दोन टक्के पोटॅश निर्मिती होते. पांडुरंग कारखान्याने शेतकऱ्यांना पोटॅशियुक्त खते उपलब्ध व्हावे म्हणून १० कोटी रुपये गुंतवणूक करून सुपंत पोटॅश निर्मिती प्रकल्पाची उभारणी केलीय”
डॉ. यशवंत कुलकर्णी – कार्यकारी संचालक, श्री पांडुरंग कारखाना
》 सोलापूर । लम्पी आठवड्यात हहपार होणार: जिल्हा पशुसंवर्धन विभागाचा दावा
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लम्पीचा संसर्ग वाढला आहे. सर्व अकरा तालुक्यात या रोगाची व्याप्ती पसरली आहे. या रोगामुळे आता पर्यंत ३१५ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. मात्र पशुसंवर्धन विभागाने केलेल्या लसीकरणाच्या मोहिमेमुळे आठवड्यात सर्व तालुक्यातून लम्पी जिल्ह्यातून हद्दपार होणार असल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाने केला आहे.
कोरोनानंतर लम्पीची मोठी लाट सोलापूर जिल्ह्यामध्ये आली होती. याचा मोठा फटका जिल्ह्यातील ७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांच्या पशुधनास बसला होता. या रोगाने जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील ७१६ गावातील तब्बल सहा हजार ३८ जनावरे बाधित झाली होती. त्यामध्ये पाच हजार ७५ गायी, ९९३ बैलांचा समावेश आहे.
पशुसंवर्धन विभागाने मोठ्या प्रमाणात राबवलेल्या लसीकरणामुळे २ हजार २४५ जनावरे बरी झाली आहेत. त्यामध्ये १ हजार ८४५ गायी आणि ४०० बैलांचा समावेश आहे. तर ३१३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये गायी १७१, बैल २७ आणि ११५ वासरांचा समावेश आहे. सध्यस्थितीला ३ हजार ५१० जनावरे बाधित आहे. त्यामध्ये २ हजार ९२७ गायी, ५३३ बैलांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यासाठी ७ लाख ४५ हजार ५०० लसींचे डोस प्राप्त झाले होते.
लसीचे वाटप १७२ टीमच्या माध्यमातून लसीकरण केले आहे तर बाधित १०१२ गोठ्यांची फवारणी केली आहे. लम्पीसाठी जिल्ह्यामध्ये ९५८ ठिकाणी जनजागृती केली आहे. यामुळे आठवड्यात हा लम्पी जिल्ह्यातून हद्दपार होणार असल्याचे सांगण्यात आले.
□ २० लाख वाटप ; ६८ लाखांचा प्रस्ताव
मृत्यू झालेल्या ३१३ जनावरांच्या मालकांना २० लाख ३५ हजारांचे वाटप केले आहे. यामध्ये ४१ गायी, १३ बैल आणि ३० वासरांचा समावेश आहे. दुधाळ जनावरांसाठी ३० हजार, बैलांसाठी २५ हजार आणि वासरांसाठी १५ हजार नुकसान भरपाई दिली जाते. दुसऱ्या टप्प्यातील १३५ मृत पशुधनाच्या आर्थिक मदतीचा ६८ लाखांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. दोन दिवसात याला मान्यता मिळणार आहे.
□ तालुकानिहाय बाधित आणि मृत पशुधन
अक्कलकोट (एक मृत, ८७ बाधित), बार्शी (एक मृत, १८ बाधित), करमाळा (९३ मृत, ९८८ बाधित), माढा (२५ मृत, १७७ बाधित), माळशिरस (१०० मृत, ११०८ बाधित), मंगळवेढा (६ मृत, ४५ बाधित), मोहोळ (३ मृत, ३४ बाधित), उत्तर सोलापूर (१६ मृत, २५ बाधित), पंढरपूर (२० मृत, २०५ बाधित), सांगोला (२९ मृत ५९८ बाधित). दक्षिण सोलापुरात (३ मृत, ३२ बाधित )
● मृत्यूचे प्रमाण होतंय कमी
> पशुसंवर्धन विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि लसीकरण मोहीम घेतली आहे. लसीकरणामुळे बाधितांचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. बाधित पशुधन पाहता आठवड्यात लम्पी आटोक्यात येईल. मृत पशुधनाच्या मालकांना २० लाखांचे वाटप झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील ६८ लाखांच्या प्रस्तावास दोन दिवसात मान्यता मिळणार आहे. त्यानंतर तत्काळ वाटप केले जाईल.
– डॉ. एन. एल. नरळे (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी)