● पुढील 14 दिवस महाराष्ट्रातील जनतेचे दुःख समजून घेणार
नांदेड : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेडच्या देगलूर येथे दाखल झाली आहे. राहुल गांधी यांनी गुरुनानक जयंती निमित्त देगलूर येथील गुरुद्वारा ‘बाबा जोरावर सिंह बाबा फतेहजी सिंह येथे प्रार्थना केली. दरम्यान, यात्रेची काँग्रेसतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी खास महाराष्ट्रीयन भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. Rahul Gandhi in Maharashtra – Prayers at Gurudwara Nanded Bharat Jodo Yatra
यावेळी त्यांच्या स्वागतासाठी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेडच्या देगलूर येथे दाखल झाली आहे. राहुल गांधी यांनी गुरुनानक जयंती निमित्त देगलूर येथील गुरुद्वारा ‘बाबा जोरावर सिंह बाबा फतेहजी सिंह येथे प्रार्थना केली. दरम्यान, यात्रेची काँग्रेसतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी खास महाराष्ट्रीयन भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सोमवारी महाराष्ट्रात आली. नांदेड जिल्ह्यातला देगलूर येथे गांधींचे भाषण झाले. देशात सध्या द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. या भारत तोडोच्या विरोधात भारत जोडो यात्रा आहे. ही पदयात्रा काश्मीरपर्यंत कोणीही रोखू शकत नाही. या पदयात्रेदरम्यान पुढील 14 दिवस महाराष्ट्रातील जनतेचे दुःख समजून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे ते म्हणाले. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा 14 दिवस महाराष्ट्रभर फिरणार आहे. 15 विधानसभा आणि 6 लोकसभा क्षेत्रांतून ही यात्रा जाईल. यात्रेदरम्यान 10 नोव्हेंबरला नांदेड येथे आणि 18 नोव्हेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर टीका केली आहे. हे सरकार फक्त केवळ चार पाच भांडवलदारांसाठी हे सरकार काम करत आहे. नोटबंदीने देशातील छोटे व्यवसाय डबघाईला आले. 400 रुपयांचा गॅस सिलेंडर 1100 रुपये झाला, पेट्रोल, डिझेल 100 रुपये लिटर झालं, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर एक चकार शब्दही बोलत नाहीत, असे ते म्हणाले आहेत.
छत्रपति शिवाजी महाराज के साहस की प्रतीक, देश की एकता की ये मशालें, आने वाले भविष्य के लिए एक मिसाल बन जाएंगी।🇮🇳
नमस्कार महाराष्ट्र 🙏 pic.twitter.com/bYSA9Izmj1
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 7, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
महाराष्ट्र में यात्रा की शुरुआत, गुरपुरब के शुभ अवसर पर गुरुद्वारा यादगारी बाबा ज़ोरावर सिंह जी, फतेह सिंह जी में अरदास से की।
गुरु नानक जी के प्रेम, शांति और भाईचारे की सीख को दिल से लगाकर हम भारत जोड़ने का यह संकल्प पूरा करेंगे।
सभी देशवासियों को गुरपुरब की लाखों बधाइयां। pic.twitter.com/WgWKmeGiWr
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 8, 2022
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक दिग्गज नेते राहुल गांधींच्या दौऱ्याला उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे उद्या बुधवारी (दि. ९) राहुल गांधींसोबत दिसू शकतात. राहुल गांधी महाराष्ट्रात दोन जाहीर सभांना संबोधित करणार आहेत, ज्यामध्ये पहिली जाहीर सभा 10 नोव्हेंबरला नांदेडमध्ये आणि दुसरी 18 नोव्हेंबरला शेगावमध्ये होणार आहे. 10 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राहुल गांधी यांच्या जाहीर सभेलाही उद्धव ठाकरे उपस्थित राहू शकतात.
महाराष्ट्रात 14 दिवसांच्या प्रवासात ते 15 विधानसभा आणि 6 लोकसभा मतदारसंघात सुमारे 381 किमी अंतर कापतील. यादरम्यान तो दररोज 22 ते 23 किलोमीटर चालणार आहे. भारत जोडो यात्रा राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम आणि अकोला व बुलढाणा जिल्ह्यातून जाणार आहे. भारत जोडो यात्राला कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. यात्रा फक्त श्रीनगर, जम्मू-काश्मीरमध्ये थांबेल आणि आम्ही तिथे तिरंगा फडकावू. देशाला जोडणे हा यात्रेचा उद्देश आहे असे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे. भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये दाखल झाल्यावर ते तेथे बोलत होते.
भारत जोडो यात्रेचा 3500 किमीचा प्रवास हा काँग्रेस पक्षासाठी आणि संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक घटना आहे. 7 ते 11 नोव्हेंबर दरम्यान ती नांदेड जिल्ह्यात, 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान हिंगोली जिल्ह्यात, 15 ते 16 नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यात, 16 ते 18 नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यात आणि 18 ते 20 रोजी रोजी बुलढाणा जिल्ह्यात मार्गाक्रमण करणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी वाशीम शहरातील अजनखेड, बोराला फाटा येथे १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सहभागी होणार आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे यात्रेची जाबबादारी देण्यात आली आहे. या यात्रेसाठी नांदेड जिल्ह्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने 28 पदाधिकारी नियुक्त केले असून सगळे पदाधिकारी सध्या नांदेडला दाखल झाले आहेत . नांदेड जिल्ह्यातील यात्रा पूर्ण होईपर्यंत ते नांदेडलाच मुक्कामी राहणार आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी घटक पक्षातील उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांना या यात्रेसाठी काँग्रेस पक्षाकडून आमंत्रण देण्यात आले आहे. भारत जोडो यात्रेमध्ये महाविकास आघाडीमधील नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.