सोलापूर : शहरातील टेक्स्टाईल उद्योगाला अत्यंत उपयुक्त मनुष्यबळ पुरवणारा शासकीय तंत्रनिकेतनचा टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग हा पदविका अभ्यासक्रम बंद केला आहे. यामुळे भविष्यात स्थानिक यंत्रमाग उद्योगाला आणखी अडचणीत येणार आहे. याचा विचार करून अभ्यासक्रम चालू करण्याची गरज आहे. Closure of diploma course in textile manufacturing will put Solapur’s ‘textile hub’ in trouble
हा अभ्यासक्रम चालू करण्यासाठी माजी विद्यार्थी एक चळवळ उभा करीत आहेत. अक्कलकोट रोडवरील सोलापूच्या शासकीय तंत्रनिकेतन मधील टेक्सटाईल डिप्लोमा कोर्स महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येत असणाऱ्या विभागाने बंद केले आहे सदर कोर्स पुन्हा सुरु व्हावे म्हणून आम्ही आमच्या परीने सगळे माजी विद्यार्थी मिळून करत असल्याचे विवेक चिलवेरी (माजी विद्यार्थी ) यांनी माध्यमांना सांगितले.
माजी विद्यार्थ्याच्या मागणीसह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
प्रत्यक्षात टेक्स्टाईल विषयावर एकापेक्षा अधिक अभ्यासक्रम सुरू करणे गरजेचे असताना, सुरू असलेला एकमेव अभ्यासक्रमही बंद केल्याने या क्षेत्रातील केंद्र व राज्य सरकारच्या विकासाच्या धोरणाला विसंगत भूमिका समोर आली आहे.
राज्य शासनाने महाराष्ट्रात दोन ठिकाणी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग पदविका अभ्यासक्रम सुरू केला होता. त्यामध्ये नागपूर व सोलापूरचा समावेश होता. त्यापैकी सोलापूर शहरातील टेक्स्टाईल उद्योग हा टेरी टॉवेल उत्पादनातून सर्वाधिक निर्यात मिळवून देणारा ठरतो. तसेच सोलापुरी चादर देश-विदेशात लोकप्रिय आहे. त्यामुळे या पदविकेला सोलापुरात मोठी मागणी व रोजगाराची संधी उपलब्ध होती.
यातून सोलापूरच्या स्थानिक कुशल मनुष्यबळाची गरज भागवली जाते. राज्यातील टेक्स्टाईल उद्योगाचे केंद्र असलेल्या इचलकरंजी टेक्स्टाईल हबमध्ये खासगी संस्थांकडून हाच पदविका अभ्यासक्रम चालवला जातो. एवढेच नव्हे, तर पदविका अभ्यासक्रमासोबत फॅशन डिझायनिंग व टेक्स्टाईल प्रोसेसिंग हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. सोलापूरला पदविका घेतलेले काही विद्यार्थी इचलकरंजीत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.
मध्यंतरी एआयसीटीई या केंद्र सरकारच्या तंत्रशिक्षण संस्थेने पदविकेस प्रवेश मिळत नसल्याच्या कारणावरून पदविका अभ्यासक्रमच रद्द ठरवला. प्रत्यक्षात राज्यात केवळ दोनच ठिकाणी म्हणजे नागपूर व सोलापूर येथे असलेली टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग पदविका शिक्षण स्थानिक गरज न पाहता रद्द केली. आता सोलापुरातील टेक्स्टाईल हबसाठी पूरक अभ्यासक्रमच शिल्लक राहिलेला नाही.
काही दिवसांपूर्वी या पदविकेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. या सर्व विद्यार्थ्यांनी या पदविकेचे शिक्षण घेतल्यानंतर देश व विदेशात उत्तम करिअरच्या संधी मिळवल्या आहेत. आम्हाला उत्तम करिअर मिळाले आहे तर ती संधी सोलापूरच्या स्थानिक विद्यार्थ्यांना पुढेही मिळावी, अशी रास्त मागणी विद्यार्थ्यांनी केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
प्रवेश कमी झाले म्हणून अभ्यासक्रम बंद केल्याचे कारण दिले जात आहे. प्रत्यक्षात प्राध्यापकांची पदे मंजूर झाली आहेत. १९७६ पासून यशस्वी अभ्यासक्रमाचा शेकडो विद्यार्थ्यांना लाभ झालाय. विद्यार्थ्यांनी यापूर्वी तत्कालीन उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे पदविका सुरू ठेवण्याची विनंती केली होती.
अभ्यासक्रमासाठी जकार्ट, डॉबी, टेरी टॉवेल तयार करण्याचे यंत्र, स्पिनिंग रिंग फ्रेम, डबलर मशिन फ्रेम, मिनिएचर कार्ड, रॅपिअर मशिन, इलेक्ट्रॉनिक डॉबी, एअरजेट मशिन, साइजिंग मशिन अशा अनेक यंत्रसामग्री उपलब्ध आहेत.
शासनाने महाराष्ट्रात दोन ठिकाणी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग पदविका अभ्यासक्रम सुरू केला होता. त्यामध्ये नागपूर व सोलापूरचा समावेश होता. त्यापैकी सोलापूर शहरातील टेक्स्टाईल उद्योग हा टेरी टॉवेल उत्पादनातून सर्वाधिक निर्यात मिळवून देणारा ठरतो. तसेच, सोलापुरी चादर देश-विदेशात लोकप्रिय आहे.
त्यामुळे या पदविकेला सोलापुरात मोठी मागणी व रोजगाराची संधी उपलब्ध होती. यातून सोलापूरच्या स्थानिक कुशल मनुष्यबळाची गरज भागवली जाते. राज्यातील टेक्स्टाईल उद्योगाचे केंद्र असलेल्या इचलकरंजी टेक्स्टाईल हबमध्ये खासगी संस्थांकडून हाच पदविका अभ्यासक्रम चालवला जातो.
एवढेच नव्हे, तर पदविका अभ्यासक्रमासोबत फॅशन डिझायनिंग व टेक्स्टाईल प्रोसेसिंग हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. सोलापूरला पदविका घेतलेले काही विद्यार्थी इचलकरंजीत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.
“वर्ष 2020-21 ची शेवटच्या तिसऱ्या वर्षाची बॅच संपल्यानंतर टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंगचा पदविका अभ्यासक्रम बंद करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार पदविका अभ्यासक्रम बंद झाला आहे. वरिष्ठांच्या सूचनेनंतरच कार्यकाही होऊ शकते.”
– सोमनाथ हुनसिमरद, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर.