मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर ठाकरे गटाने आनंद व्यक्त केला आहे. तसेच वाघ परत आला, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते प्रतिक्रिया देत आहेत. ‘टायगर इज बॅक’, असे ट्विट ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे. हा क्षण आमच्यासाठी दिवाळी सणासारखा आहे, असेही अंधारे यांनी म्हटले आहे. Bail to Sanjay Raut. ‘Tiger is back!’; The tiger came out, Pawar posted the video
शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज जेलबाहेर येणार का? यावर दुपारी तीन वाजता मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्ट निर्णय देणार आहे. राऊत यांना आज कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मात्र या जामिनाला स्थगिती मिळावी, अशी मागणी ईडीने केली आहे. या जामिनाला ईडी मुंबई हायकोर्टात आव्हान देणार आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी सत्यमेव जयते असे लिहून एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक वाघ पिंजऱ्यातून बाहेर पडताना दिसत आहे.
गेल्या 100 दिवसांपासून कारागृहात असलेल्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं मंजूर केला आहे.ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.शिवसेना भवनात सेलिब्रेशन होणार आहे. आज बुधवारी सायंकाळी सेलिब्रेशन होणार असल्याची माहिती आहे. यावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हे कुठल्याही कारवाईला घाबरले नाहीत. त्यांचे कौतूक आहेत. ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ते खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. त्यांनी गद्दारी केलेली नाही, अशी प्रतिक्रीया त्यांनी यावर दिली आहे.
#सत्यमेवजयते!@rautsanjay61@ShivSena@ShivsenaComms pic.twitter.com/MBnD5gnWsl
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 9, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावरून आता अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येत आहे. तर यावरच शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून, हा सत्याचा विजय असल्याचं म्हटलं आहे. सोबतच आता आमचा ढाण्या वाघ येणार आहेत असेही खैरे म्हणाले.
पुढे बोलतांना खैरे म्हणाले की, किरीट सोमय्या सारखा माणूस काहीतरी बोलत असतात. त्यामुळे याचे काय,त्याच काय हे काढत बसतात. लोकांनी सेवा करण्यासाठी पाठवले असतांना त्यांना ते दिसत नाही. शिंदे गटाचे विजय शिवतारे पन्नास खोकेच्या आरोपांवरून आमच्या विरोधात न्यायालयात जाणार आहे. त्यांना आमचे म्हणणे आहे की, तुम्ही न्यायालयात जाचं, तुमचच भांडे उघडे पडतील असेही खैरे म्हणाले.
□ यामुळे झाली होती अटक
खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 31 जुलै रोजी ईडीने अटक केली होती. त्यानंतर संजय राऊतांना सर्वात आधी ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात होते. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीकरुन करण्यात आला आहे.
संजय राऊत यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले होते. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. याच पैशातून अलिबाग येथे जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे.
या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती, ते प्रविण राऊत हे फक्त नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊतच आहेत, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. तसेच, संजय राऊतच संपूर्ण घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप ईडीने केला आहे.