मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याच्या प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना आज जामीन मिळाला आहे. त्यामुळे आज संजय राऊत यांची जेलमधून सुटका झाली आहे. तब्बल 102 दिवसानंतर राऊत जेलमधून बाहेर आले आहेत. त्यामुळे सर्वत्र शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष सुरू केला आहे. Sanjay Raut out of jail; Court observation, action taken illegal Shiv Sena leader MP
संजय राऊत आज अखेर तीन महिन्यांनी जेलमधून बाहेर आले आहेत. पत्राचाळ घोटाळ्यांच्या आरोपाप्रकरणी ईडीने त्यांना अटक केली होती. अखेर 102 दिवस जेलमध्ये मुक्काम केल्यानंतर त्यांची आज सुटका झाली. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “आनंद आहे, न्यायालयावर विश्वास वाढला. तब्येत जरा बरी नाहीये. मला बरं वाटलं की नक्की बोलेल, असं ते म्हणाले.
राऊतांची सुटका होणार, यावर त्यांची पत्नी वर्षा राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वर्षा राऊत म्हणाल्या, “आम्हाला खूप आनंद झाला आहे. साहेब कधी येणार याची वाट पाहतोय. खूप लोकांचे फोन आले. त्यांची अभिनंदन व्यक्त केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील संजय राऊत यांची आई यांना फोन करून अभिनंदन केले आहे.” अशी माहिती त्यांनी दिली.
शेकडो कार्यकर्ते संजय राऊतांच्या स्वागतासाठी आर्थर रोड कारागृहाच्या बाहेर जमले आहेत. संजय राऊत यांची प्रकृती बरी नसल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येईल, अशी माहिती त्यांचे भाऊ सुनील राऊत यांनी दिली.
आर्थर रोड कारागृहाबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली. इथून मोठी रॅली काढण्यात आली. संजय राऊत सर्वात आधी सिद्धीविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन वंदन करुन ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी जाण्याची शक्यता आहे.
”एक आनंद आहे. न्यायालयावरचा विश्वास वाढला. न्यायालयाचं जे निरीक्षण आहे ते आम्ही सांगत होतो’, अशी पहिली प्रतिक्रिया संजय राऊतांनी जेलमधून बाहेर पडल्यानंतर दिली. ‘माझी तब्येत जरा बरी नाही. मी नक्की माध्यमांशी बोलेन. पण मला बरं वाटलं की बोलेन. लढाई सुरु राहील.”
– संजय राऊत
● राऊत यांचा जामीन मंजूर करताना न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे
* संपूर्ण खटला पाहाता यावरून स्पष्ट होतं की दोन्ही आरोपींना अवैध पद्धतीने अटक करण्यात आली होती.
* अटकेच्या कारवाई गरज असताना ती करायची असतेच पण ईडीने PMLA कायद्याच्या कलम 19 अंतर्गत केलेली कारवाई अवैध आहे.
* या प्रकरणी म्हाडाच्या अधिकाऱ्यांचा रोल संशयित होता. ईडीने तसं मान्य केलं. पण म्हाडा अधिकाऱ्यांना आरोपी केलं नाही.
* सारंग आणि राकेश वाधवान प्रमुख आरोपी असूनही त्यांना अटक करण्यात आली नाही. पण त्याचवेळी प्रवीण राऊत यांना नागरी वादासाठी आणि संजय राऊत यांना विनाकारण अटक केली. हे ईडीचं सोयीस्कर वागणं दर्शवतं.
* कोर्टाने ईडीचं म्हणणं मान्य करून जामीन रद्द केला तर ईडीच्या सोयीच्या वागण्याला मदत केल्यासारखं होईल. असं झालं तर सामान्य माणसाचा कोर्टावरील विश्वास उडेल.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 अखेर दीपाली सय्यद शिंदे गटात जाणार, रश्मी ठाकरेंवर केली सडकून टीका
मुंबई : मुंबई महानगर पालिकेतून ‘मातोश्री’वर खोके येणे बंद झाल्याची खंत रश्मी ठाकरेंना असल्याचे अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी म्हटले आहे. नीलम गोऱ्हे, सुषमा अंधारे चिल्लर आहेत, सगळ्याच्या सूत्रधार रश्मी ठाकरे आहेत. संजय राऊत यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळत आहे. तोंडाने पक्ष फोडून त्यांनी पाप केले. हे दोन गट त्यामुळेच झाले आहेत, असेही दीपाली सय्यद म्हणाल्या आहेत.
ठाकरे गटाला दुपारी पाठींबा देऊन रात्री शिंदे गटात सामिल झाल्याच्या अनेक घटना घडल्या. त्यातच आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार आहे. दीपाली सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना सूचक वक्तव्ये केल्याने त्या कोणत्या नवीन गटात सामील होणार यावर उठलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळत आहे. त्या शिंदे गटात सामील होणार आहेत. आपण लवकरच आपली राजकीय भूमिका जाहीर करू असं दीपाली सय्यद म्हणाल्या होत्या.
दीपाली सय्यद यांनी मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केला होता. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दीपाली सय्यद यांच्याकडून शिवसेनेच्या कार्यक्रमात हजेरी लावण्यात येत होती. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणणार असून त्यांची बैठक आयोजित करणार असल्याची घोषणा दीपाली सय्यद यांनी केली होती.
काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर पक्ष प्रवेशाबाबत चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. मला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत आणले होते. त्यामुळे आता त्यांना साथ देणार असल्याचे सय्यद यांनी सांगितले. मागील विधानसभा निवडणुकीत दीपाली सय्यद यांनी मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी दीपाली सय्यद यांना 33,644 मते मिळाली होती. तर, जितेंद्र आव्हाड यांना 1,09,283 मते मिळाली होती.
दीपाली सय्यदनी बाळासाहेबांची शिवसेना अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा दर्शवला आहे. शनिवारी (ता. १२) दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत आणि रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मातोश्रीवर खोके येणं बंद झाल्याने रश्मी वैहिनींना दुःख झालं, असा गौप्यस्फोट सय्यद यांनी केला आहे. खोके खोके सरकार जे भाष्य केलं जातं आहे. त्या खोक्यांचं खरं राजकारण लोकांना कळलं पाहिजे, असंही दीपाली सय्यद म्हणाल्या आहेत.