□ महापालिका आयुक्तांची माहिती
सोलापूर : महानगरपालिका परिवहन उपक्रमासाठी यापूर्वी नेट कास्ट पद्धतीनेनुसार निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता ग्रॉस कास्ट(जीसीसी) पद्धतीने येत्या आठवड्यात निविदा काढण्यात येणार आहेत. यामुळे यानंतर शहरातील परिवहन बस सेवा पूर्ववत सुरू राहील, अशी माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. Solapur: Municipal Transport will issue tender administrative rule for 100 buses according to gross cast
सोलापूर शहरातील बस सेवा सुरळीत करण्यासाठी महापालिका परिवहन उपक्रमांकडून आता नव्याने ग्रॉस कास्ट पद्धतीने शंभर बसेससाठी निविदा काढण्यात येणार आहे. यापूर्वी नेट कास्टनुसार टेंडर काढण्यात आले होते, त्यास प्रतिसाद मिळाला नव्हता.
ग्रॉस कास्ट पद्धतीने नुसार तिकीट वसुलीची जबाबदारी पालिकेकडे राहणार आहे तर संबंधित मक्तेदार कंपनीकडे बसेस, डिझेल व मेंटेनन्स ही जबाबदारी राहणार आहे. 100 बसेस या माध्यमातून उपलब्ध होतील. पुढील आठवड्यात ग्रॉस कास्ट पद्धतीने नव्याने टेंडर काढण्यात येणार असल्याचेही महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी स्पष्ट केले आहे.
या निविदा प्रक्रियेनंतर सोलापूर शहरातील परिवहन बस सेवा पूर्ववत सुरळीत होण्यास मदत होईल, असेही महापालिका आयुक्तांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 प्रशासकीय राजवटीत आतापर्यंत 374 केले ठराव
□ विविध विकास कामांना मिळाली गती
सोलापूर : सोलापूर महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. दरम्यान या राजवटीत आतापर्यंत 374 एकूण ठराव करण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त शिवशंकर यांनी दिली.
सोलापूर महापालिकेत लोकप्रतिनिधींची मुदत मार्च महिन्यामध्ये संपली. त्यानंतर प्रशासकीय राजवट सुरू झाली. प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त पी शिवशंकर हेच जबाबदारी पार पाडत आहेत. मार्च ते आत्तापर्यंत झालेल्या प्रशासकीय उपसमितीच्या बैठकांमध्ये एकूण 374 ठराव करण्यात आले आहेत.
यामध्ये सर्वसाधारण विषयी 184 ठराव करण्यात आले. स्थायीचे – 141 , स्थापत्यचे – 18 आणि परिवहनचे – चार असे एकूण 374 ठराव करण्यात आले आहेत. प्रशासकीय कारकीर्दीत पाणी मीटर, बिलिंग, रिविजन यासह विविध वैशिष्ट्यपूर्ण कामांना गती देण्यात आली. मोठे 33 विकास कामांचा यामध्ये समावेश आहे, असेही महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी सांगितले.