मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत त्यांना अटक करु नका, असे न्यायालयाने पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान आव्हाडांनी या आरोपांनंतर राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. परंतू राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आव्हाडांची समजूत घातली आहे. Do not arrest Jitendra Awha till the hearing, Awha’s wife raised the question of molestation
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या गुन्ह्याची चौकशी पोलिस करतील. त्यामध्ये जे काय समोर येईल त्यावर पोलिस कारवाई करतील. आमचे सरकार कोणत्याही राजकीय सूड भावने पोटी कोणतीही कारवाई करत नाही. हे राज्य कायद्याचं आहे, आणि कायद्याने चालतं, असे शिंदे म्हणाले आहेत. दरम्यान आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आव्हाड यांच्या सोबत पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये आव्हाड यांनी राजीनामा दिला असल्याचे पाटील यांनी सांगितेल. “आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांची समजूत काढण्यासाठी सांगलीहून आलो, असल्याचे म्हटले.
72 तासात दोन गुन्हे दाखल झाले. त्यानंतर माझ्यावर लावलेले आरोप आणि गुन्हे खोटे आहेत, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून राजीनाम्याची घोषणा केली. दरम्यान जयंत पाटील म्हणाले, “जितेंद्र आव्हाडांची समजूत काढण्यासाठी सांगलीहून आलो. मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ जाण्याचा प्रयत्न त्या महिलेने केला होता. गर्दीतून वाट काढत होते. गर्दीत न जाता तुम्ही दुसरीकडे जा, असे आव्हाड यांनी सांगितले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, हे दुर्दैव आहे. आव्हाड यांच्यावर लावलेली कलमे चुकीची आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला तरी मी घाबरणारा नाही. पण विनयभंगाचा गुन्हा दाखल होणं, माझ्या तत्वात बसत नाही. माझा स्वभाव अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे हा गुन्हा दाखल होणं माझ्या मनाला वेदना देणारा आहे, असं आव्हाड म्हणाले. ठाण्याच्या पोलिसांनी ३५४ मध्ये हे प्रकरण कसे बसवले? असा सवाल करत जयंत पाटील यांनी विनयभंगाची व्याख्या वाचून दाखवली. राज्यातील कायदा आणि सुव्यस्था बघावी. राज्याचे उपमुख्यमंत्र्यांकडे गृहखाते आहे. त्यामुळे त्यांनी याची दखल घ्यावी, असे जयंत पाटील म्हणाले.
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याकडे व्यथित होऊन राजीनामा सोपवल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. एक वेळ खुनाचा गुन्हा मान्य करेन, पण विनयभंगाचे कलम ३५४ दाखल करणे आपल्या मनाला लागलंय. इतक्या खालच्या पातळीवरील राजकारण महाराष्ट्रात होऊ नये, घरे उद्ध्वस्त होतील, माझ्यावर खुनाचा गुन्हा दाखल केलात तरी चालेल, पण विनयभंगाचा गुन्हा मला अमान्य आहे, असे आव्हाड म्हणाले. या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीकडून संबंधित प्रकरणाचा व्हिडिओ दाखवण्यात आला.
माझ्या मुलीला तिच्या मैत्रिणी विचारणार, ‘युअर डॅड हॅज मॉलेस्टेड समबडी’. इतक्या खालच्या स्तराला राजकारण गेले आहे, मी ३५ वर्ष साहेबांसोबत फिरतोय , पण इतके घाणेरडे राजकारण नाही पाहिले, अशा राजकारणात न राहिलेलेच बरे. समाजाामध्ये माझी मान खाली गेली, असे सांगताना जितेंद्र आव्हाड भावूक झाले होते.
याविरोधात जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे. खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांना मला सांगायचंय, मर्द असाल तर कामातून उत्तर द्या, नामर्दासारखं बाईला पुढे करुन लढाई लढू नका. तसेच कोणत्या दृष्टीने तो विनयभंग वाटतो? मग एवढीच जर काळजी होती तर गर्दीत यायचं नव्हतं, असे त्या म्हणाल्या आहेत. तक्रारदार महिलेविरोधात गुन्हे दाखल असून त्या जामिनावर असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. आव्हाडांविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचा विशिष्ट हेतू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कारवाईविरोधात जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे, त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या आहेत.
रीदा रशिद ह्या राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात.आणि काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अॅट्रोसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडलं ती spontaneous reaction होती. त्याला विनयभंग म्हणतां येत नाही.
— Ruta Samant (@RutaSamant) November 14, 2022
अंगावर धडकणाऱ्या व्यक्तीला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेन मध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील, असेही त्यांनी म्हटले. त्या महिला राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात आणि काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अॅट्रोसिटी चा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडलं ती spontaneous reaction होती. त्याला विनयभंग म्हणतां येत नाही असेही त्यांनी म्हटले.
● राज्यात राष्ट्रपती राजवट लावा – सुप्रिया सुळे
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी राजकीय सुड उगवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आता त्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूकडे केली आहे. दरम्यान, सुनावणी होईपर्यंत आव्हाडांना अटक न करण्याचे न्यायालयाने पोलीसांना निर्देश दिले आहेत.