सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी भीमा सहकारी साखर कारखाना निवडणूक मतमोजणी सुरु आहे. या भिमा कारखाना मतमोजणी महाडीक गट आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. Bhima Cooperative Sugar Factory Election: Mahadik group leading
मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भिमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकांची मतमोजणी आज सकाळी सोलापूरात श्री सिध्देश्वर मंगल कार्यालयात सुरु झाली आहे. आज दुपारी १ वाजता मिळालेल्या प्राथमिक कलानुसार महाडीक यांच्या भिमा शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार काही मतदारसंघात ३५०० मतांनी आघाडीवर आहेत.
खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे उमेश पाटील, प्रशांत परिचारक,अभिजित पाटील हे निवडणूक मैदानात आहेत. या निवडणूकसाठी 15 संचालकांसाठी 35 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. रविवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. भीमा सहकारी कारखान्यातील 78.86 टक्के सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
पहिल्या फेरीत मतदान बूथ क्रमांक १ ते २८ वरील मतांचे गठ्ठे एकत्र करुन मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीमध्ये सभासदांचा कल पुन्हा एकदा विद्यमान चेअरमन तथा भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भीमा शेतकरी विकास आघाडीच्या बाजूने साधारण कल असल्याची माहिती आहे. यामध्ये पहिल्या फेरीत अंदाजे ३५०० मतांचे लीड असल्याची प्राथमिक माहिती आहे. अधिकृत घोषणा लवकरच निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे करणार आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या निवडणूकीत एकूण १९४३० पैकी १५३२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणूकांची मतमोजणी सोलापूरात होटगी रस्त्यावर सिध्देश्वर मंगल कार्यालयात सकाळी सुरु झाली. मतमोजणीच्या दोन फेऱ्या होणार आहेत. प्रथम मतांच वर्गीकरण करण्यात आलं. पहिल्या फेरीत अंबेचिंचोली पुळूज, फुलचिंचोली, शंकरगांव, विटे, उचेठाण, ब्रम्हपुरी, औंढी, टाकळी सिकंदर, पेनूर, पाटकूळ, वरकुटे, तांबोळे, तारापूर, मगरवाडी, या भागातील मतमोजणी सुरु झाली आहे.
दुपारी १ च्या सुमारास पहिल्या टप्प्यातील मतमोजणी पूर्ण झाली असून यामध्ये खासदार धनंजय महाडीक यांच्या भिमा परिवार पॅनलचे उमेदवार जवळपास ३५०० मतांनी आघाडीवर आहेत. सायंकाळी ५ वाजता निकालाचं चित्र नक्की कोणाच्या बाजूनं हे स्पष्ट होणार आहे. अद्याप दोन्ही गट आम्हीच विजय होणार, असा दावा करत आहेत.
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे धनंजय महाडिक, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे उमेश पाटील, भाजप सहयोगी माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील,भाजप आमदार समाधान अवताडे, विठ्ठलचे कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके, माजी उपसभापती तानाजी माने, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस रमेश बारसकर, चंद्रभागा साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे,जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.