मुंबई : – मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झाले आहे. निवडुंग, मधुचंद्राची रात्र, जसा बाप तशी पोर, अशा चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. सरफरोश, गांधी, वास्तव अशा अनेक हिंदी चित्रपटात सुनील यांनी अभिनय केला. रात्री 1 वाजता त्यांनी विले पार्ले पूर्व येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. पारशीवाडा इथल्या हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले. Veteran actor Sunil Shende passed away due to accident in Kalyan Kurle
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी मध्ये अनेक भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सुनील शेंडे यांचे आज वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले.
आज मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी पारशीवाडा येथील स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. सुनील शेंडे यांच्या पश्चात त्यांच्या परिवारामध्ये त्यांची पत्नी ज्योती आणि दोन मुले ऋषिकेश आणि ओंकार आहेत. सुनील शेंडे हे सरफरोश, गांधी, वास्तव इत्यादी बॉलीवूड चित्रांमध्ये दिसले होते.
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या टीव्ही शो ‘सर्कस’ मध्ये देखील सुनील शेंडे दिसले होते. त्यांनी अनेक बॉलीवूड चित्रपटांसह अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्यामधील त्यांची अनेक पात्रे आजही स्मरणात आहे.
सुनील शिंदे यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. त्याचबरोबर त्यांच्या निधनाने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. त्यांचे चाहते आणि बॉलीवूड कलाकार त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांच्या एका जवळच्या मित्राने पोस्ट शेअर करत लिहिले आहे की,”हिंदी आणि मराठीतील अभिनय प्रसिद्ध करणारे अभिनेते सुनील शिंदे यांचे आज निधन झाले.
काल रात्री त्यांच्या राहत्या घरी त्यांना अचानक फिट येऊन ते पडले आणि त्यांना ताबडतोब नानावटी इस्पितळांमध्ये दाखल करण्यात आले. तेथे गेल्यावर त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आज दुपारी बारा वाजता त्यांचे शव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या पार्ले येथील घरी आणले. आज अंधेरी येथील पारशी वाडा स्मशानभूमीत त्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळेस अनेक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आता त्यांचा मुलगा, स्नुषा व नातवंडे असा परिवार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 अभिनेत्री कल्याणी कुरळेचा अपघाती मृत्यू, गुन्हे दाखल
● अभिनेत्रीची वाढदिवसाची पोस्ट ठरली शेवटची
मुंबई : मराठी अभिनेत्री कल्याणी कुरळेच्या अपघाती मृत्यू प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. कल्याणी कुरळेचा 12 नोव्हेंबर रोजी रात्री 11 च्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातील हालोंडी गावाजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ती दुचाकीवरून घरी जात असताना एका ट्रॅक्टरने तिला धडक दिली. याप्रकरणी आयपीसी आणि मोटार वाहन कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती कोल्हापूर पोलीसांनी दिली आहे.
अभिनेत्री कल्याणी कुरळे जाधवचा अपघातात मृत्यू झाला. तिने नुकतेच ‘प्रेमाची भाकरी’ नावाचे हॉटेल सुरु केले होते. यामध्ये तिने 7 दिवसांपूर्वीच वाढदिवस घालवला होता. ‘मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली हे फक्त स्वामींनी माझ्याकडून करून घेतले आहे. असेच प्रत्येक वाढदिवसाला होऊदे.. स्वामी मला हे सगळ करण्यासाठी शक्ती द्या…’ अशी तिने पोस्ट केली होती.
कुरळे – जाधवचा अपघातात मृत्यू झाला आहे. कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडीनजीक डंपरने धडक दिल्याने हा अपघात झाला. कल्याणीने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसह अनेक मालिकांमध्ये अभिनय केले होते. कल्याणीने काही दिवसांपूर्वीच ‘प्रेमाची भाकरी’ नावाचे हॉटेल सुरु केले होते. हॉटेल मधून जात असतानाच डंपरने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला.
अभिनेत्री कल्याणी कुरळे यांनी काही दिवसांपूर्वी हालोंडी फाटा येथे ‘प्रेमाची भाकरी’ या नावाने हॉटेल सुरू केले होते. शनिवारी (ता. 12) रात्री 11 च्या सुमारास हॉटेल बंद करून मोपेडवरून त्या कोल्हापूरकडे जात असताना कोल्हापूर – सांगली महामार्गावरील हालोंडीजवळ ट्रक्टर ट्रेलरला जोडलेल्या काँक्रीट मिक्सरची धडक लागून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारांसाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.