मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसंबंधी भाष्य केले आहे. मला अद्याप भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण मिळालेले नाही. आमच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना राहुल गांधींच्या शेगाव सभेला आमंत्रित केले असेल, तर ते त्यासाठी जाऊ शकतात, असे ते म्हणाले आहेत. याआधी सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे यात्रेत सहभागी झाले होते. I didn’t get invitation for Bharat Jodo Yatra: Ajit Pawar Maharashtra Opposition Leader
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज मुंबई पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीस-शिंदे सरकारमध्ये वाचाळवीर मोठ्या प्रमाणात मंत्री आहेत. सरकारमधील मंत्र्यांची वागणूक चुकीची आहे. सरकारने वाचाळवीरांना आवरले पाहिजे, त्यांना सुचना द्या अशी टिका पवारांनी केली. अधिकारी हे तणावात आहे. त्यांना काम करताना अडथळा निर्माण होत आहे. पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कणखर भूमिका घ्यावी, असेही ते म्हणाले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राज्यात सुरू आहे. या यात्रेत राष्ट्रवादीसह शिवसेनेचे नेते सुद्धा सामील झाले होते. पण, काँग्रेसला चक्क विरोधी पक्षनेते अजित पवार यांचाच विसर पडल्याची बाब समोर अजित पवारांच्या वक्तव्यावरून समोर आली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं अजितदादांना निमंत्रणच दिलं नसल्याची बाब समोर आली आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेचा राज्यात नववा दिवस आहे. वाशिममध्ये ही यात्रा मुक्कामी आहे. पण भारत जोडो यात्रेचं निमंत्रण अजित पवारला मिळाले नाही. विरोधी पक्षनेते असताना सुद्धा निमंत्रणचं दिलं नसल्यामुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना निमंत्रण दिले होते पण अजित पवार यांना निमंत्रणच दिले नसल्याचे समोर आले आहे.
सत्ताधाऱ्यांमुळे पोलीस विभाग आणि मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी तणावाखाली काम करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. तसंच मंत्रालयातील अधिकाऱ्यांन थेट सीएमओमधून आदेश येत असल्याचं त्यांनी म्हटलं. ते म्हणाले की, “शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून प्रशासनात म्हणावं तसं काम होताना दिसत नाही. प्रशासन पूर्णपणे ठप्प झालं आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर संपूर्ण राज्याचा लोड होता. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करुन 18 लोकांना मंत्रिमंडळात घेतलं.
महाराष्ट्रातील पोलीस आणि प्रशासन देशातील सर्वोत्तम असल्याचं म्हटलं जातं. परंतु सरकार आल्यापासून पोलीस विभाग प्रचंड दबावाखाली काम करत आहे. पोलिसांना वरिष्ठ पातळीवरुन आदेश येतात आणि अन्याय होत असला तरी पोलीस बोलून दाखवतात की आमचा नाईलाज आहे, आमच्यावर प्रेशर आहे. हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही.
पोलीस विभाग आणि मंत्रलयातील सचिव दर्जाचे आणि इतर कर्मचारी तणावात काम करतात. त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून थेट आदेश येतात. जनतेचा आजही पोलीस आणि प्रशासनावर विश्वास आहे. गेल्या चार महिन्यांपासून सुरु झालेली परिस्थिती अशीच राहिली तर राज्याचं चित्र गंभीर व्हायला वेळ लागणार नाही.”
राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही, असे पवार यांनी सांगितले. सध्याच्या सरकारकडे १४५ आमदारांचा पाठिंबा आहे, तो कमी होईल असे चित्र दिसत नाही. महाविकास आघाडीचे सरकार असताना आमच्याकडेही १४५ आमदारांचे संख्याबळ होते. मात्र एक गट बाहेर पडल्याने सरकार कोसळले. परंतु संजय राऊत यांनी मध्यावधी निवडणुकीचे भाकीत कसे केले, याची माहिती मी त्यांच्याशी चर्चा करून घेईन, असे पवार म्हणाले.
अजित पवारांनी मंत्री, आमदार तसंच नगरसेवकांना मिळणाऱ्या सुरक्षेवरही बोट ठेवय म्हणाले की, अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीदरम्यान दिवसाढवळ्या गोळीबार होतो तर सरकार काय करत होतं, पोलीस यंत्रणा काय करते? ठाण्यात शिंदे-ठाकरे गटात राडा झाला. असा राडा चालणार नाही. यामुळे पोलिसांना या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागलं. मी माहिती मागवली आहे की किती जणांना वाय प्लस दर्जा आहे. त्यांना खरंच गरज आहे का? सरकारमधील काही जणांच्या ताफ्यात तीस तीस गाड्या देण्यात आल्या आहेत. पण हा टॅक्सच्या रुपाने जमा झालेला सरकारचा पैसा आहे. सरसकट सगळ्यांना सुरक्षा देण्याची काय गरज? काही माजी नगरसेवकांना देखील सुरक्षा दिली आहे.