जळगाव : भाजप नेते गिरीष महाजनांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एकनाथ खडसे यांनी अनेक कारनामे केले आहेत. त्यांनी आपल्यावर खोटा गुन्हाही दाखल केला असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांचे असे अनेक कारनामें लवकरच बाहेर येतील, असेही त्यांनी सांगितले आहे. जिल्हा दूध संघाचीही चौकशी सुरू आहे, तेथे खडसेंनी काय केले ते लवकर बाहेर येणार असल्याचेही ते म्हणाले. Eknath Khadse’s exploits will come out, Khadse is shocked, six people including Manoj Limay are arrested in Jalgaon
या प्रकरणातील मुख्य सुत्राधार मानले जाणारे सी.एम. पाटील यांना देखील शहर पोलीसांनी अयोध्या नगरातून बुधवारी १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत एकुण आरोपींची संख्या सहावर पोहचली आहे.
मंगळवारी रवी अग्रवाल यास अटक केली होती. त्यामुळे अपहार प्रकरणी अटक झालेल्यांची संख्या आता सहावर गेली आहे. दूध संघ अपहार प्रकरणातील पाचव्या पोलिसांनी काल रवी मदनलाल अग्रवाल (रा. अकोला) यास अटक केली होती. रवी अग्रवाल याचा चॉकलेट कारखाना असल्याचे समजते. यानंतर आज बुधवारी (दि. १६) मुख्य सुत्रधार दुध संघातील सी.एम.पाटील यांना अयोध्या नगरातून सकाळी ११ वाजता शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात कारवाई करण्याचे काम सुरू आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. जळगाव दूध संघ घोटाळाप्रकरणी संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या पाच वर्षांपासून एकनाथ खडसे समर्थक संचालक मंडळ हे दूध संघात कार्यरत होते. अध्यक्षपदी मंदाताई खडसे होत्या. लिमयेनंतर पुढे कोणाचा नंबर लागतो या विषयी आता तर्क वितर्क लावले जात आहेत.
लिमये यांच्या अटकेमुळे जळगावच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे समर्थक संचालक मंडळ हे दूध संघात कार्यरत होते. यावेळी कार्यकारी संचालक मनोज लिमये होते तर अध्यक्ष पदी मंदाताई खडसे या होत्या.
मुदत संपली असताना देखील संचालक मंडळ पदावर असल्याने भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी हरकत घेतल्याने शासनाने हे संचालक मंडळ बरखास्त करून शिंदे सरकारने प्रशासक मंडळ या संघावर बसवले होते. यामध्ये प्रशासक म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह इतरांचा देखील समावेश आहे. प्रशासक मंडळाने दूध भुकटीमध्ये आणि तुपामध्ये एक कोटीहून अधिक रुपयांच्या अपहार झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती.
सदर अपहार उघडीस आल्यावर हा अपहार नसून चोरी असल्याचं सांगत एकनाथ खडसे यांनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करीत चोरीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अगोदरच प्रशासक मंडळ हे बेकायदेशीर असल्याचं सांगत खडसे यांनी न्यायालयात दाद मागितली होती. यावेळी न्याल्यालयाने संचालक मंडळाच्या बाजूने निकाल देत प्रशासक मंडळ बरखास्त केले होते.
मात्र तरीही प्रशासक मंडळाने दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी तपास करत सोमवारी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना अटक केली आहे. एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. लिमये यांच्यानंतर पुढे कोणाचा नंबर लागतो या विषयी आता तर्क वितर्क लावले जात आहेत. मात्र या सर्व कारवाईवर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ संजय राऊतांवरील कारवाई चुकीची; किर्तीकरांचा शिंदे गटाला घरचा आहेर
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. प्रवेश करताच त्यांनी शिंदे गटाला घरचा आहेर दिला आहे. संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेली कारवाई चुकीची होती असे किर्तीकर यांनी म्हटले आहे. कोर्टाचा शंभर टक्के बरोबर असून कोर्ट चुकलेले नाही, राऊतांवरील आरोप फार किरकोळ होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या विधानाची चर्चा होत आहे.
खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान पत्रकार परिषदेत त्यांना ५० खोक्यांचा आरोपांबद्दल विचारलं असता उठाव करणारा नेता खर्च देत असतो, असं कीर्तिकर बोलून गेले. जुने सहकारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या का, असा प्रश्ना विचारला असता ते म्हणाले की, संजय राऊत यांना शुभेच्छा देण्यासाठी दोन ते तीन वेळा फोन केला. मात्र त्यांनी माझा फोन उचलला नाही. शेवटी मी त्यांना मेसेज केला.
गजानन किर्तीकर यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. यानंतर त्यांनी प्रथमच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकाराने तुम्ही निष्ठावान कसे असा प्रश्न विचारताच ते चांगलेच भडकले.
पुण्यात माध्यमांशी बोलताना किर्तीकर म्हणाले की, मी 11 नोव्हेंबरला शिंदे गटात सामील झालो. मी शिंदे गटात जाण्याचं कारण म्हणजे ठाकरे गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राजकीय प्रवास सुरू आहे तो घातक ठरणार आहे. त्यामुळेच शिंदे गटाने उठाव केला. बाळासाहेब ठाकरे गटात जे खासदार गेले त्याचंही तेच कारण आहे आणि मी सुद्धा शिंदे गटात गेलो त्याचंही तेच कारण आहे, असे कीर्तिकर यावेळी म्हणाले.
पूढे बोलताना ते म्हणाले की, अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. आम्हाला दुय्यम स्थान मिळत होतं. अधिकारी जुमानत नव्हते. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं प्रस्थ सुरू होतं. पडलेल्या पदाधिकाऱ्यांना निधी मिळत होता. हा सगळा प्रकार आम्ही उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवत होतो. त्यांना आवाज देत होतो. आम्ही एकमुखी मागणी केली की, राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जो प्रवास सुरुय तो थांबवा”, असं गजानन कीर्तीकरांनी सांगितले.
दरम्यान, उद्धव ठाकरेंवर टीका करताना आपलं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरेंनी माझं तिकीट कापून अरविंद सावंत यांना तिकीट दिलं, असं त्यांनी म्हटलं आहे. शिंदे साहेब, तुम्ही उत्तम काम करा. मी संघटना बांधण्याचं काम करेन. संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शिस्त आणण्याचं काम करेन, असंही किर्तीकर यावेळी म्हणाले.