□ फेब्रुवारीत निघणार जाहिरात
मुंबई : राज्यातील विविध जिल्हा परिषदांमधील सुमारे सहा हजारांहून अधिक रिक्त पदे भरण्यासाठी जानेवारी ते मे दरम्यान भरती मोहीम राबविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतल्याची आनंदाची बातमी आहे. कालच भरतीवरील स्थगिती उठवण्यात आली आहे. The moratorium has been lifted, more than six thousand vacancies in the Zilla Parishad in the state will be filled
त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील गट ‘क’मधील सर्व संवर्गातील रिक्त पदांच्या ८० टक्के पदे जिल्हा निवड मंडळाच्या माध्यमातून भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोनामुळे मे २०२० मध्ये सरकारी नोकर भरतीवर बंदी घालण्यात आली होती. कालांतराने भरतीवरील ही बंदी मे महिन्यात उठविण्यात आल्यानंतर जिल्हा परिषदामधील गट ‘क’मधील सर्व रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आता पुढील महिन्यातील सप्टेंबरमध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागाशी सबंधित आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक अशी पदे भरण्यासाठी जिल्हा निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र शिंदे-फडणवीस सरकारे काही दिवसांपूर्वीच या प्रक्रियेला स्थगिती दिली होती.
काल मंगळवारी (ता. 15) या भरतीवरील स्थगिती उठविली. गट क मधील सर्व संवर्गातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार वाहन चालक आणि शिपाई ही पदे वगळता अन्य सर्व पदे ८० टक्क्यांपर्यँत भरण्याची परवानगी जिल्हा परिषदांना देण्यात आली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
ही भरती प्रक्रिया जिल्हा परिषदेला जिल्हा निवड मंडळामार्फत राबविण्यास परवानगी देताना ग्रामविकास विभागाने भरतीचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. त्यानुसार १ ते ७ फेब्रुवारी २०२३ मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. एप्रिलमध्ये लेखी परीक्षा होणार आहे. संपूर्ण निवड प्रक्रिया मे अखेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत.
१५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ही भरती करणे बंधनकारक आहे. भरतीचा ३१ मेपर्यंतचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. ही भरती जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत करण्यासही सांगण्यात आले आहे.
या भरतीसाठी संभाव्य वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. जिल्हा परिषद यांनी ३१ जानेवारी अखेर बिंदू नामावली अंतिम करणे, संवर्गामधील आरक्षण निश्चित करणे, तसेच कंपनीची निवड ही कामे येत्या अडीच महिन्यात पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर १ ते ७ फेब्रुवारीपर्यंत पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.
८ ते २२ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांचे अर्ज मागवून १ मार्चपर्यंत अर्जांची छाननी करून ५ मार्चपर्यंत पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजनासंदर्भात जिल्हा परिषद व जिल्हा निवड समितीने ५ एप्रिलपर्यंत कार्यवाही करायची असून प्रत्यक्ष परीक्षा १४ ते ३० एप्रिलपर्यंत घ्यावी लागणार आहे. तर ३१ मेपर्यंत निकाल जाहीर करून पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश द्यावे लागणार आहेत.