मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची मुंबईतील ‘राजगृह’ निवासस्थानी भेट घेतली आहे. ही राजकीय भेट नसून सदिच्छा भेट होती, असे शिंदे म्हणाले आहेत. परंतू या भेटीमुळे राजकीय चर्चा रंगल्या आहेत. उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर एकत्र येणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे व आंबेडकरांची ही भेट महत्त्वाची समजली जात आहे. Chief Minister Eknath Shinde met Balasaheb Ambedkar Rajgriha Vanchit Bahujan Aghadi
शिवसेना (ठाकरे गट ) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर येत्या २० तारखेला एकाच मंचावर येणार आहेत. पत्रकार, समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त येत्या २० नोव्हेंबरला मुंबईतील शिवाजी मंदिरमध्ये ‘प्रबोधन डॉट कॉम’ या संकेतस्थळाचं लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर येणार आहेत. दोन्ही मान्यवरांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठा डाव टाकत आजच आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानी भेट घेतली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या ठिकाणी संग्रहायल असल्यामुळे त्याची व्हीजीट देखील मुख्यमंत्री करणार आहेत. त्यानंतर इंदू मील येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची पाहणी करणार आहेत. परंतु ठाकरे – आंबेडकर येत्या २० नोव्हेंबरला एकत्र येणार असून आगामी काळात राजकीय समीकरणं बदलणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मागील दोन – तीन महिन्यांपासून प्रकाश आंबेडकर यांनी आपण शिवसेना आणि ठाकरे गटासोबत जायला तयार आहोत अशी वक्तव्यं केली होती. परंतु त्यांना त्यावेळी इतका प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघेही एकत्र येत असताना आज मुख्यमंत्र्यांनी आंबेडकरांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री नवी खेळी करणार का?, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
राजगृहाचा ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. राजगृहतील डॉ.बाबासाहेब आणि रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले. मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार भावना गवळी, आमदार डॉ बालाजी किणीकर, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर आदी उपस्थित होते.
राजगृहच्या पहिल्या मजल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आहे. यात बाबासाहेबांच्या वापरातील वस्तूंचा समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील विविध क्षण दर्शविणारी छायाचित्रे आणि त्यांनी सुरू केलेल्या ‘जनता’ वृत्तपत्राचा खास अंक, सभांना संबोधित करतानांची छायाचित्रे, पुस्तकांचा संग्रह पहिल्या मजल्यावरील चित्रदालनात ठेवण्यात आली आहे. याच मजल्यावर डॉ.बाबासाहेबांच्या अभ्यासाची खोली आहे. वस्तूसंग्रह, चित्रदालन आणि अभ्यास खोलीची पाहणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. राजगृहातील दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर वास्तव्यास असलेल्या आंबेडकर कुटुंबीयांची देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट घेतली.
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचं मोठे भूषण आहे. त्यांनी वास्तव्य केलेले राजगृह ही वास्तू ऐतिहासिक ठेवा आहे. डॉ. आंबेडकर यांच्या संकल्पनेतून राजगृहाची निर्मिती झाली आहे. या ऐतिहासिक वास्तूला भेट देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या काळातील वस्तू, छायाचित्रे आणि त्यांच्या अभ्यासाच्या खोलीची पाहणी केली. या खोलीतील वस्तू आजही त्याच स्थितीत आहेत. राजगृहाचा हा ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल”
एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री