कुर्डुवाडी : कुर्डुवाडी येथील रेल्वे सुरक्षा बदलांमध्ये कार्यरत असणाऱ्या आरपीएफ जवानाने सरकारी ९ एम एम पिस्टलमधून स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केली. या आत्महत्येवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. An unanswered question is the suicide of an RPF policeman in Kurduwadi
ही घटना गुरुवारी ( दि. १७) दुपारी २.१५ च्यासुमारास कुर्डुवाडी रेल्वे सुरक्षा बलाच्या ड्युटीरुम ए बीट मध्ये पडली. प्रधान आरक्षक पो. कॉ. हुसेन दावल पिंजार (वय ५२ रा. सोलापुर) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव’ आहे. त्यांच्या पश्चात्त त्यांची पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.
‘ही याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मयत जवान हुसेन दावल पिंजार (वय ५२) गेल्या पाच वर्षापासून कुर्डुवाडी येथे कार्यरत होते. प्रथम रेल्वे काराखाना येथे काही काळ त्यांनी सेवा केल्यानंतर कुर्डुवाडी येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या ए बीट मध्ये कार्यरत होते. त्यांच्याकडे सरकारी शस्त्रागार संभाळण्याची जबाबदारी होती.
त्यांनी त्याच शस्त्रागारातील सरकारी ९ एम एम पिस्टल मधून स्वतःला डाव्या छातीवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. यावेळी घटनास्थळावर त्यांच्याशिवाय कोणीच नव्हते अशी माहिती तेथील सहकाऱ्यांकडून मिळाली. याबरोबरच त्यांनी काही महिन्यांपूर्वी राजीनामा देत असल्याचे प्रशासनाला कळवले होते. पण मुदतीतच त्यांनी राजीनामा मागे घेत असल्याचे लेखी प्रशासनाला पुन्हा कळवले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या राजीनामा नाट्याबाबत तसेच घटना स्थळी कोणी इतर कर्मचारी कसे नव्हते, कामाच्या ठिकाणी त्यांना काही त्रास होता का याबाबत पो. निरीक्षक संदीप हुड्डा यांना विचारले असता त्यांनी कामाच्या ठिकाणी तो जवान ठिक होता काही अडचण नव्हती. राजीनामा हे त्यांचे वैयक्तीक कारण होते. शिवाय त्यांनी स्वतः राजीनामा माघारी येत असल्याचे लिहूनही दिले होते. काही. दिवसात त्यांच्या बेसीकमध्ये फरक पडणार होता. त्यामुळे पेन्शनही चांगली मिळेल म्हणून त्यांनी राजीनामा माघारी घेतला असे ही सांगितले.
कुर्डुवाडी येथे आज कोर्ट कॅम्प असल्याने आम्ही कोर्ट कॅम्प साठी स्टेशनवर होतो. बाकी सर्व कर्मचारी रेल्वे ‘स्टेशन व त्यांच्या कर्तव्यावर होते. पिंजार यांनी गोळी झाडून घेतल्याचे प्रथम पो.कॉ. खाडे यांनी आम्हाला कळवले. त्यानंतर आम्ही घटना स्थळी आलो असता ही घटना आमच्या निदर्शनास आली. याबाबत तात्काळ ग्रामीण पोलिसांना कळवून त्यांना शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. यावेळी कुर्डुवाडी शहर पोलिस ठाण्याचे सहा.पो.निरीक्षक विक्रांत बोधे यांच्यासह उपविभागीय पो. अधिकारी विशाल हिरे यांनी घटना स्थळाला भेट दिली. मात्र आत्महत्येचे नेमले कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत रेल्वे सुरक्षा बलाचे पो.नि. संदीप हुड्डा यांनी कुर्डुवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत बोधे करीत आहे.
● अनुत्तरीत प्रश्न
> आरपीएफने आत्महत्या केली असेलतर पिस्तूल टेबलावर कशी आली?
> स्वतः गोळी मारुन घेतली त्याचे रक्त पाठीमागील भितीवर पडले, तर तो टेबलावर कसा पडला? आत्महत्या करणारी व्यक्ती अनेकदा डोक्यात गोळी मारते. या घटनेत छातीत गोळी लागली आहे.
→ या पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही असतील तर त्यातून सत्य समोर येईल ?
→ छातीत गोळी मारून घेऊन आत्महत्या केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने संशय व्यक्त होत आहे.
→ दोन आरपीएफ मधील भांडणात हत्या झाल्याची कुजबुज ऐकू येत आहे.