मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापले असतानाच शिवसेना उद्भव ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी आज या प्रकरणी नाराजी व्यक्त करत राहुल गांधीच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतही फूट पडू शकते असा इशारा दिला आहे. Mahavikas Aghadi on the brink of footy over the issue of Savarkar; MNS opposition to the meeting, blocked Shegaon trains
काँग्रेस नेते राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा आज शेगावमध्ये आहे. त्यांची आज इथे भव्य सभा होणार आहे. त्याआधी गांधींनी शेगावमधील गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते देखील उपस्थित होते. मंदिर समितीकडून राहुल गांधींचे खास पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. दरम्यान सावरकरांवरील विधानामुळे मनसेने गांधींची सभा उधळण्याचा इशारा दिला आहे.
कालच उद्धव ठाकरेंनी आम्ही राहुल गांधी यांच्या विधानाशी सहमत नाही. मात्र भाजपा विरोधी सर्वपक्षीय आघाडीच्या बाजूने आहोत असं सांगितलं असताना आज खा. राऊत यांनी त्याच्या उलट सुतोवाच केले. यामुळे खरच महाविकास आघाडी फूटीच्या उंबरठ्यावर आली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खा. राऊत म्हणाले, यात्रा चांगली चालली असताना राहुल गांधींनी सावरकरांचा विषय काढण्याची कांही गरज नव्हती. त्यांच्या या विषयामुळे फक्त शिवसेनेलाच नाही तर काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. राहुल गांधी यांनी इतिहास चिवडत बसण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा या मताचे आम्ही आहोत.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे भाजप आणि आरएसएसचे श्रद्धास्थान कधीच नव्हते, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. जे लोकं स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्रेमी स्वतःला म्हणवून घेत आहेत, ते बनाव करत आहे. राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केल्यामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांनाही अडचणीत आणले आहे. सावरकरांबाबत कोणतीही उलटसुलट वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत, ही शिवसेनेची भूमिका आहे, असे राऊतांनी स्पष्ट केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याप्रकरणी सध्या वातावरण पेटले आहे. सावरकरांच्या गावी म्हणजे नाशिकच्या भगूर येथे आज कडकडीत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. आज सकाळपासून बंदला सुरुवात झाली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा बंद आहे. आतापर्यंत कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. तसेच, मनसेच्या वतीने राहुल गांधींविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. त्यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वक्तव्य केलं. या वक्तव्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राहुल गांधी यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. दरम्यान, भाजप, मनसे आणि शिंदे गटाने राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
□ मनसेचा राहुल गांधींच्या सभेला विरोध, गाड्या अडवल्या
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राहुल गांधींच्या शेगावमधील सभेला विरोध केला आहे. युवक काँग्रेसने मनसे कार्यकर्त्यांना जशास तसे उत्तर देऊ अशी भूमिका घेतली आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात विरोध होत आहे.
मनसेने भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवण्याचे आदेश दिले आहे. यापार्श्वभूमीवर मनसैनिक हे विविध भागातून शेगावकडे येत आहेत. चिखली येथे पोलिसांनी मनसैनिकांच्या गाड्या अडवल्या आहे. याठिकाणी पोलिसांनी तगडा बंदोबस्त केला आहे. तेथे आलेले मनसैनिक आंदोलन करत असून राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत. राहुल गांधी यांची आज शेगाव येथे सभा होणार आहे. याठिकाणी मनसैनिक काळे झेंडे दाखवणार आहेत.
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी विधान केले होते. यावर मनसेने राहुल गांधींच्या सभेला काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी मनसैनिक शेगावकडे जात होते. यावेळी बुलढाण्यातील चिखली येथे पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतले आहे. यात मनसे नेते अविनाश जाधव, संदीप देशपांडे, प्रकाश महाजन यांना ताब्यात घेतले आहे. तर अविनाश जाधव यांनी 100 टक्के सभेत गोंधळ होणार असा इशारा दिला आहे.