सोलापूर : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी मनपाचे माजी सभागृहनेता सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. माजी नगरसेवक सुरेश पाटील यांना विषबाधा झाली होती अशी माहिती मिळताच भिडे गुरुजींनी पाटील यांच्या सदा ईश्वर निवासस्थानी येऊन पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. Sambhaji Bhide Guruji visited the poisoned Patals of Solapur Rahul Gandhi Bharat Jodo Yatra
यावेळी गुरुजींनी बेळगाव येथील प्रसिद्ध डॉक्टरांना फोनद्वारे पाटील यांच्या प्रकृतीची माहिती दिली व सल्लामसलत केली. तसेच पाटील यांना आरोग्याची काळजी घेण्याचा भिडे गुरुजींनी सल्ला दिला.
□ राहुल गांधींनी घेतला सोलापुरी कडक भाकरी, धपाटे शेंगा चटणीचा आस्वाद
सोलापूर : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ यात्रा सुरू असून या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांसमवेत सोलापुरी जेवणाचा आस्वाद घेतला.
सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या संकल्पनेतून भारत जोडो यात्रेमध्ये पातूर ते बाळापूर, अकोला या मार्गावरील श्री गजानन रोप वाटीका येथे राहूल गांधी व भारत जोडो यात्रींकरिता सोलापूरी खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते. यावेळी राहुल गांधी यांनी सोलापुरी जेवळणाचा अस्वाद घेतला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
स्टॉलमध्ये आंध्रा भजी बनवित असलेले पाहून राहुल गांधी यांनी महिलांना विचारले की मी पण हे बनवू शकतो का, अशी परवानगी घेत स्वतः भजी तळली. या स्टॉलवर कडक ज्वारीची भाकरी, कडक बाजरीची भाकरी, धपाटे, आंध्रा भजी, शेंगा चटणी, दही, खिर (हुग्गी) चा समावेश होता. या खाद्यपदार्थांचा आस्वाद राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेमध्ये घेतला व आ. प्रणिती शिंदे आणि याकरिता राबलेल्या सर्व टीमचे कौतुक केले.
बहुभाषिक सोलापूरचे असे काही खाद्यपदार्थ आहेत की, जे पाहताच कोणताही खवय्य्या स्वतःला खाण्यापासून थांबवू शकणार नाही असे विविध पदार्थ या जेवणाच्या मेजवानीत केले होते. त्यामध्ये मिरची चिरुन चिंच आणि इतर पदार्थ भरून केलेली खमंग गरमागरम आंध्र भजी, खुशखुशीत चटपटीत धपाटे, दह्यासोबत झणझणीत शेंगा चटणी, सोलापुरची खासियत असलेली ज्वारीची आणि बाजरीची कडक भाकरी, पौष्टिक गव्हाची हुग्गी यासारखे स्वादिष्ट पदार्थ मेजवानीत होते. राहुल गांधी आणि उपस्थित नेतेमंडळींनी मनसोक्त जेवणाचा आस्वाद घेतला आणि अतिशय चविष्ट पदार्थ होते.
खाद्यपदार्थ खूप सुंदर होते, अशी भावना व्यक्त केली. सोलापुरी खाद्यपदार्थ बनविण्यासाठी यल्लप्पा तुपदोळकर, शांतकुमार बलगेरी, महानंदा रामपुरे, लक्ष्मी यादगिरी, पद्मिणी शेट्टीवार व समाधान हाके यांनी परिश्रम घेतले.