पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारचे कौतुक केले आहे. केंद्र सरकारच्या विरोधात मी लिहीत नाही. ते काही चांगल्या गोष्टी देखील करत आहेत. नरेंद्र मोदी माझे आवडते पंतप्रधान आहेत, असे त्या म्हणाल्या आहेत. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजकारणात आपल्याला मराठी संस्कृती देखील जपायची आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्या पिंपरी येथे एका कार्यक्रमात बोलत होत्या. MP Supriya Sule said; Narendra Modi My Favorite Prime Minister Pune Pimpri Session
सुप्रिया सुळे यांनी आज पिंपरी येथील मराठी पत्रकार परिषदेच्या 43 व्या अधिवेशनात उपस्थित राहिले. तेव्हा त्या बोलत होत्या. हल्ली विरोधकांनी सरकारचं कौतुक करणं ही खरंतर दुर्मिळ बाब मानली जाते. पण खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या कामांचं कौतुक केलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे आवडते पंतप्रधान आहेत. असा उल्लेख खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
विशेष म्हणजे राजकारणात आपल्याला मराठी संस्कृती देखील जपायची असल्याचं विधान देखील त्यांनी केलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देखील दिली. आमच्या छत्रपतींच्या विरोधात बोलणार असाल तर आम्ही खपवून घेणार नाही. चूक एकदा होऊ शकते. मात्र वारंवार करणे म्हणजे ती त्यांची चॉईस असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आमच्या छत्रपतींच्या विरोधात बोलणार असाल तर आम्ही खपवून घेणार नाही. चूक एकदा होऊ शकते. मात्र वारंवार करणे म्हंजे ती त्यांची चॉईस”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हर हर महादेव चित्रपटामध्ये चुकीच्या गोष्टी दाखवल्या गेल्या. भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी जे बोलले असा इतिहास कोणी वाचला का? यांना कोणी इतिहास कसा सांगत नाही. “जर हे छत्रपती यांच्या विरोधात बोलले तर हे काहीही करू शकतात? छत्रपतींच्या विरोधात कोणीही बोलला तर आम्ही खपवून घेणार नाही. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार”, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
उत्तर प्रदेशच्या जाहिराती महारष्ट्रामध्ये का देता? लढेंगे और जितेंगे. आम्ही कायमच सत्तेत राहायला काय मक्तेदारी घेतलीय? खोक्यांबद्दल मी बोलत नाही. नाहीतर पुन्हा काहीतरी व्हायचं. खोक्यांचं राजकारण मी करत नाही. असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचंदेखील कौतुक केलं. “भारत जोडो यात्रा मला आवडते. आम्ही एका विचारांचे आहोत. काँग्रेस नेते राहुल गांधी चांगला प्रयोग करत आहेत. भारत जोडो एक वेगळा प्रयत्न आहे. “भारत जोडो यात्रा ही फक्त राहुल गांधींची यात्रा नाही तर सर्व भारतीयांची आहे”, असं त्या. म्हणाल्या.
□ महाराष्ट्र तुमच्यावर : थुंकतोय राऊत खासदार
संजय राऊतांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर टीका केली. ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी व त्यांच्या मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला हवा होता. राज्यपालांनी अधिकृतपणे शिवरायांचा अपमान केला आहे. शिवाजी महाराजांना माफीवीर म्हटलंय. तरीही तुम्ही सत्तेला चिटकून बसलेले आहात. महाराष्ट्र तुमच्यावर थुंकतोय’, असे राऊत म्हणाले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यावर आता राज्यात तिव्र आंदोलने सुरु आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे औरंगाबादमधील क्रांती चौकात तर मुंबईत विमान तळावर आंदोलन सुरु आहे. राज्यपालांना पदावरून हटवा अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली.