रायगड : ‘शिवसेना’ हा पक्ष एका वेगळ्याच कारणासाठी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता यावरून कोर्ट कचे-या चालू होऊ शकते. रायगडमध्ये एका शिवसैनिकाच्या स्वप्नात चक्क बाळासाहेब ठाकरे आले. आणि त्यांच्या सूचनेनुसार मुलीचे नाव शिवसेना ठेवल्याचे म्हटले जात आहे. Balasaheb Thackeray came in a dream; Then what Shiv Sainik named the girl ‘Shiv Sena’ Raigad Mahad
राज्यात खरी शिवसेना कोणाची यावरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरू आहे. आता त्यातच रायगडच्या महाड येथील दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या एका कट्टर शिवसैनिकाने मुलीचे नाव शिवसेना ठेवले आहे. पांडुरंग वाडकर असे या व्यक्तीचे नाव आहे. माझी मुलगी जन्माला यायच्या आदल्या रात्री स्वतः बाळासाहेब ठाकरे माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला हे नाव सुचवले, असे वाडकरांनी म्हटले. या शिवसैनिकाने बाळासाहेबांप्रती एक प्रकारे कृतज्ञताच व्यक्त केली आहे.
महाड येथील किये-गोठवली गावात असलेल्या पांडुरंग वाडकर हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांच्या पत्नीला नुकतीच मुलगी झाली आहे. त्यांची त्यांच्या मुलीचा १७ नोव्हेंबर रोजी शिवसेनेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी आपल्या मुलीच्या नामकरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात त्यांनी आपल्या मुलीचे नाव चक्क आपल्या लाडक्या पक्षाच्या नावावरून शिवसेना ठेवले आहे.
या सोहळ्यासाठी पांडुरंग वाडकर यांनी सर्वांना बोलावले होते. त्यांचे नातेवाईक देखील त्या ठिकाणी आले होते. मुलीचा पाळणा देखील सजवण्यात आला होता. यावेळी बाळाला पाळण्यात ठेवण्यात आले. यावेळी नामकरण सोहण्याच्या पारंपरिक प्रथा पार पाडण्यात आल्या. सुवासिंनी बाळाचा कानात कुर्रर्र केले आणि याच वेळी वाडकर दांपत्यांनी स्टेजवरील नावापुढे लावलेला पडदा बाजूला केला. आणि स्टेजवरील नाव पाहून सर्वांना धक्काच बसला. कुतूहल आणि आनंदाने सर्वांनी टाळ्या वाजवल्या. सर्वांनी वाडकर यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्या बाबत पांडुरंग वाडकर म्हणाले, मी कट्टर शिवसैनिक आहे. त्यामुळेच मी माझ्या मुलीचे नाव शिवसेना ठेवले आहे. माझ्या मुलीला घेऊन मी लवकरच उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नामकरणविधी सोहळ्याला आलेले कार्यकर्ते आणि पाहुण्यांनी देखील मुलीच्या या नावाचं स्वागत केलं आहे. तसेच महाराष्ट्रात अशी पहिलीच घटना असेल की कोणी आपल्या मुलीचं नाव शिवसेना ठेवलं असेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》’महात्मा गांधींना मारण्यासाठी सावरकरांनी गोडसेंना बंदूक पुरवली’
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या विधानावरून राज्यात राजकारण तापले आहे. आता तुषार गांधींनी सावरकरांबद्दल खळबळजनक ट्वीट केले आहे. सावरकरांनी महात्मा गांधींना मारण्यासाठी नथुराम गोडसेला बंदूक मिळवून देण्यासाठी सुद्धा मदत केली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधीपर्यंत नथुराम गोडसेकडे कुठलंही शस्त्र नव्हते, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी सावरकरांसंबंधी एक ट्विट केले आहे. या ट्वीटमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महात्मा गांधींची हत्या करण्यासाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवली होती असा आरोप तुषार गांधी यांनी केला आहे. “सावरकरांनी फक्त ब्रिटिशांनाच मदत केली नाही, तर बापूंची हत्या करण्यासाठी नथुराम गोडसेला एक चांगली बंदूक मिळवून देण्यात मदत केली,” असा आरोप करणारे एक ट्विट तुषार गांधी यांनी केले आहे.
तुषार गांधी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. “मी आरोप करत नाही आहे. मी जे इतिहासात नमूद आहे तेच सांगितलं आहे. पोलिसांच्या एफआयआरमध्ये नोंद आहे त्यानुसार २६,२७ जानेवारी १९४८ च्या सुमारास नथुराम गोडसे आणि विनायक आपटे सावरकरांना भेटले होते. त्या दिवसापर्यंत नथुराम गोडसेकडे बंदूक नव्हती. बंदुकीच्या शोधात तो संपूर्ण मुंबईत फिरत होता. मात्र या भेटीनंतर ते थेट दिल्लीला आणि तेथून ग्वाल्हेरला गेले.
ग्वाल्हेरला त्यांनी सावरकवादी असणाऱ्या परचुरेंची भेट घेतली. यानंतर त्यांना सर्वात चांगली पिस्तूल मिळवून दिली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधी हे सर्व घडलं. हेच मी सांगितलं असून, नवीन काही आरोप केलेला नाही,” असे तुषार गांधी म्हणाले आहेत. आता तुषार गांधी यांनी केलेल्या या दाव्यावर आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तुषार गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, “1930 मध्ये बापूंना मारण्याचे अनेक प्रयत्न झाले. प्रबोधनकार ठाकरे यांनी बापूंच्या साथीदारांना अकोला, विदर्भात बापूंच्या हत्येचा कट रचल्याची पूर्वसूचना दिली आणि बापूंचे प्राण वाचवले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील सनातनी हिंदू संघटना आणि त्यांच्या नेतृत्वाला बापूंवर हल्ला न करण्याचा जाहीर इशारा दिला. सावरकर आणि हेडगेवार हे सनातनी हिंदूंचे नेते होते. म्हणून प्रबोधनकारांचा इशारा त्यांना उद्देशून होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या या इतिहासाची आठवण करून दिली पाहिजे.