● सिटी बस अपघातातील नुकसान भरपाईसाठी आयुक्तांचे वाहन, कार्यालय जप्ती तूर्त टळली !
● १५ दिवसाची घेतली लेखी मुदत !
सोलापूर : महापालिका नूतन आयुक्त पदाचा पदभार घेतल्याच्या काही क्षणातच आयुक्त शितल तेली- उगले यांनी यांच्यासमोर परिवहनचे संकट ओढावले होते. मात्र आयुक्तांनी धीरोदात्तपणे घेतलेल्या निर्णयामुळे सिटी बस अपघातातील मृताच्या नुकसान भरपाईसाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार जप्ती कारवाईसाठी आलेले पथक लेखी पत्र घेऊन महापालिकेतून परत फिरले. मात्र याची जोरदार चर्चा महापालिकेच्या वर्तुळात सुरू होती. Office confiscation averted for the time being: Crisis averted due to courageous decision Municipal Commissioner Sheetal Teli Ugle
निमित्त होते नुकसान भरपाई मिळण्यासाठी महापालिका आयुक्तांचे वाहन आणि कार्यालयातील साहित्य जप्तीचे…! सोलापूर महापालिकेत नूतन आयुक्तांच्या स्वागतानंतर अधिकाऱ्यांच्या बैठकांची लगबग सुरू असतानाच दुपारी न्यायालयातील बेलिफांसह कर्मचाऱ्यांचे पथक महापालिकेत दाखल झाले. मृताचे वडील भाऊ आणि कुटुंबीय हे नुकसान भरपाई द्या अन्यथा जप्ती व्हावी अशी भूमिका घेतलेली. पण या गोंधळाला शांत करत नूतन आयुक्त शितल तेली- उगले यांनी यांनी बेलीफ आणि मृताच्या कुटुंबीयांना समजावून सांगत धीर दिला. न्यायालयाच्या निर्देशानुसार आपली सर्व नुकसान भरपाई मिळून जाईल, असे आश्वासन देऊन पंधरा दिवसाची मुदत घेऊन त्यांना पाठवून दिले. यामुळे जप्तीची ही कारवाई तूर्त टळली आहे.
महापालिकेच्या परिवहन उपक्रमाची आर्थिक स्थिती सध्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्चाने बिकट बनली आहे. अशात परिवहन उपक्रमाच्या विविध न्यायालयीन प्रकरणामुळे प्रशासन मोठ्या अडचणीत सापडले आहेत. दि. ८ सप्टेंबर २०१३ रोजी रेल्वे स्टेशन समोरील महात्मा गांधी चौक येथे परिवहन उपक्रमाच्या सिटी बस धडकेने २३ वर्षीय शिवलिंगय्या आनंदय्या हिरेमठ (रा.रामलाल चौक, वारद चाळ, सोलापूर) या मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला होता. तो महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याबरोबरच कुटुंबकर्ता म्हणून एका ठिकाणी कामही करत होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबीयांसमोर आर्थिक संकट ओढवले होते. यामुळे त्रस्त झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
सोलापूर न्यायालय आणि उच्च न्यायालयातील त्यांच्या बाजूने निकाल लागला होता. न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने मृताच्या कुटुंबीयांना ८ लाख ५८ हजार रुपये द्यावे असे आदेश केले होते. वारंवार परिवहन उपक्रमाच्या मागे लागून ही गेल्या ९ वर्षात एक रुपयाचीही भरपाई मिळाली नव्हती.
यामुळे कुटुंबीयांनी पुन्हा न्यायालयात धाव घेऊन दाद मागितल्याने न्यायालयाने पुन्हा आदेश दिले होते. यानंतरही भरपाई मिळत नसल्याने नुकतेच महापालिका आयुक्तांचे वाहन आणि इतर साहित्य जप्तीचे निर्देश मोटार अपघात दावे प्राधिकरणाचे न्यायाधीश एम. ए. भोसले यांनी दिले होते. यानुसार जप्तीसाठी न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांचे पथक दाखल झाले होते. या प्रकरणी तक्रारदाराच्यावतीने एड. लक्ष्मण मारडकर यांनी काम पाहिले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ पहिल्याच दिवशी नूतन आयुक्तांनी केली ड्रेनेज समस्येची ऑन दी स्पॉट पाहणी !
सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या नूतन आयुक्त शीतल तेली – उगले यांनी पदभार घेताच तातडीने ड्रेनेज समस्या संदर्भातल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी थेट बाळे येथील संतोष नगरात ऑन द स्पॉट पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले.
महापालिकेच्या नूतन आयुक्त शीतल तेली-उगले यांनी आज सकाळीच पदभार घेतला त्यानंतर त्यांनी नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्याला प्राधान्य देण्यास प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान बाळे येथील संतोष नगरातील प्रलंबित ड्रेनेज प्रश्न संदर्भात नागरिकांनी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने आज नूतन आयुक्त शीतल तेली – उगले यांनी थेट बाळे येथील संतोष नगर येथील त्या ड्रेनेज स्थळाची ऑन द स्पॉट जाऊन पाहणी केली.
तेथील ड्रेनेज लाईन गेल्या काही महिन्यापासून तुंबत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. या ठिकाणी आवश्यक तेवढी ड्रेनेज लाईन बदलून संक्शन मशीनद्वारे तुंबलेले ड्रेनेज स्वच्छ करण्यात यावी. तातडीने हा प्रश्न सोडविण्याची कार्यवाही करण्यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी व इतर अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिले.
यावेळी महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी, झोन अधिकारी व्यंकटेश चौबे आदींसह अधिकारी उपस्थित होते.