● ‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेत
● ‘गावडे’ ची भूमिका; संघर्षांतून अभिनय क्षेत्रात संधी
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील समाधानला लहानपणासून अभिनयाची आवड असल्याने विद्यार्थी दशेपासूनच फिल्मी दुनियेत काम करण्याची इच्छा, परंतू घरची परिस्थिती नसल्याने कोरोना काळात कुटुंबाच्या चरितार्थासाठी पानटपरी चालवून जगणारा युवक आज मुंबईतील फिल्मी दुनियेत नाव कमावित आहे. Pandharpur’s reached samadhan Vansale in Maharashtra’s famous, a Changbhal navan Balumama.
तुंगत (ता.पंढरपूर) येथील समाधान वनसाळे या युवकाने ‘कलर्स मराठी’ या खासगी वाहिनीवरील “बाळुमामाच्या नावानं चांगभलं” या मालिकेत ‘गावडे’ नावाच्या पात्रातून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहोचला आहे. अभिनय क्षेत्रातील कोणतीही डिग्री किंवा प्रशिक्षण नसताना सुध्दा अभिनयाच्या जोरावर फिल्मी दुनियेत नाव कमवित आहे.
घरात आठराविश्व दारिद्रय परंतु ध्येय मात्र फिल्मी दुनियेत अभिनय करुन नाव कमाविण्याचे उराशी बाळगले होते. सुरुवातीला दहावीत असताना आर्मी भरती करीत असताना फॉरेस्ट भरतीची सुध्दा तयारी केली. नंतर सदर भरती बारावीवरती करण्यात आली. यादरम्यान इतर विभागातील भरती सुरू होती. नंतर ती भरती बारावी विज्ञान शाखेवर करण्यात आली. कष्टाला नशिब साथ देत नसल्याने पोलीस भरती व राज्यसेवेचा अभ्यास चालू केला. यामध्ये जागा कमी असल्यामुळे यामध्येसुध्दा नशिबाने हुलकावणी दिल्याने समाधान हताश झाला होता. परंतु समाधानचा कष्टावर विश्वास असल्याने त्याने फिल्मी दुनियेत काम करण्याचे ठरविले.
अभिनयाचे गुण व आवड असल्याने समाधान फिल्मी दुनियेकडे वळला. काही वर्ष छोट्या – मोठ्या भूमिका केल्या. मुंबईमध्ये कॉर्नमीटर म्हणजे सप्लायर म्हणून समाधानने काम करण्यास सुरूवात केली. संजयलीला भन्साळीच्या गंगुबाई, साऊथचा अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या चित्रपट लाइजर अशा बर्याच चित्रपटात समाधानने सप्लायर म्हणून काम केले. मराठी सिरीयलमधून येणारा पैसा स्वतःसाठी आणि रूमसाठी खर्च व्हायचा. जबाबदारी असल्याने समाधानने वायफळ खर्च करणे टाळले. मुंबईत राहुनसुध्दा तो कधीही मुंबई मनसोक्तपणे फिरला सुध्दा नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अभिनय क्षेत्रात संघर्ष सुरू असताना कोरोनाचे सावट आले. यशाच्या शिखरापर्यंत पोहचल्यानंतर मुंबईतून परत तुंगतकडे माघारी फिरावे लागले. कोरोना काळात मित्राच्या संकल्पनेतून गावातच पानटपरी टाकली. यातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. त्यानंतर फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला. याच काळात मुंबईतून बोलावण आले. कलर्स मराठी वरील ‘बाळू मामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत ‘गावडे’ या नावाची भूमिका समाधानला मिळाली. सहकारी मित्र सूरज मते – नाम्या सोमनाथ वैष्णव – पाटील, आकाश खेडकर – बापू, गोविंद मरशिवणीकर – नाना, प्रवीण माकडे – रंगा, भूमिका करीत आहेत.
□ तुंगेश्वर हायस्कूल ते मुंबईचा प्रवास
पंढरपूर तालुक्यातील श्री तुंगेश्वर हायस्कूल ते मुंबईचा प्रवास हा संघर्षमय आहे. श्री तुंगेश्वर हायस्कूल तुंगतमध्ये असताना अभिनय करण्याची संधी मिळाली. शिक्षक, मित्र व हायस्कूलच्या साथीने अभिनयाची आवड वाढतच गेली. शॉर्ट फिल्म, वेब सिरीज, अल्बम सॉंग, चित्रपट, नाटक, जिवंत देखावे, युथ फेस्टिवल, मूकनाट्य, पथनाट्यातून कला सादर केली. पुणे, औरंगाबाद, नांदेड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पंढरपूर, बारामती, सातारा, मध्य प्रदेश, मुंबईतून अभिनय सादर केला. दाजी तुम्ही बुलेटवर (अल्बम सॉंग), पाचरूट (शॉर्ट फिल्म), भावी मेंबर (वेब सिरीज) देवराणी यातून अभिनय केला.
□ टीव्हीवर पाहून घरच्यांना अभिमान
सध्या ‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत मी गावडे ची भूमिका करीत आहे. रोज टीव्ही वरती दिसतोय. मला टिव्ही वरती पाहुन घरच्यांना अभिमान वाटत आहे. गावातील मित्र, वरिष्ठ पाठबळ देत आहेत. कुटुंबाचे आणि गावाचे नाव मोठे करणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. संघर्षांतून मला चांगलेच अनुभव प्राप्त झाले आहेत.
समाधान वनसाळे
कलाकार, तुंगत ता.पंढरपूर