पुणे : अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खूप चिंताजनक आहे. गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे. अनेक अवयव निकामी झाले आहेत. पण डॉक्टरांचे प्रयत्न सुरु आहेत. आज सकाळी मेडिकल बुलेटिनमध्ये डॉक्टरांनी ही माहिती दिली. विक्रम गोखले यांच्यावर गेल्या 15 दिवसांपासून पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहेत. ते बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली जात आहे. Veteran actor Vikram Gokhale’s condition is critical, Kamal Haasan fakes death news
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाल्याचे ट्विट अभिनेता अजय देवगनने केले आहे. त्यावरुन अनेक माध्यमांनी बातम्याही दिल्या. यानंतर बऱ्याच वेळेनी विक्रम गोखले यांच्या मुलीने स्पष्टीकरण दिले की, ‘विक्रम यांची प्रकृती अजूनही अत्यंत गंभीर आहेत आणि लाइफ सपोर्टवर आहेत, त्यांचे निधन झालेले नाही’. दरम्यान, विक्रम गोखले यांच्यावर गेली 16 दिवस पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू आहे.
‘ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे, ते व्हेंटिलेटरवर असून अद्याप त्यांचे निधन झालेले नाही. त्यांच्यासाठी प्रार्थना करत रहा,’ अशी माहितीत्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. तसेच कृपया त्यांच्या निधनाबाबत अफवा पसरवू नये, असं आवाहन देखील गोखले यांच्या कुटुंबीयांनी केलं आहे.
विक्रम गोखले यांच्या निधनाची अफवा काल रात्री पसरली होती. मात्र त्यांच्यावर अजूनही उपचार सुरु आहेत, अशी माहिती त्यांची पत्नी वृषाली यांनी दिली आहे. तसेच गोखले काल सायंकाळी कोमामध्ये गेले. ते स्पर्शालाही प्रतिसाद देत नसून त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे, यासंदर्भात सविस्तर माहिती डॉक्टरांकडून सकाळी दिली जाईल, असेही वृषाली यांनी सांगितले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रचंड खालावली आहे. त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यासोबतच मागच्या 15 दिवसापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विक्रम गोखले रुग्णालयात अत्यंत गंभीर स्थितीत असल्याची माहिती आहे.
सध्या विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवू नये, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे. काही माध्यमांमधील वृत्त आणि बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या ट्विटमुळे सोशल मीडियावर गोखले यांच्या प्रकृतीबाबत उलटसूलट चर्चा सुरू झाली होती.
गेल्या काही दिवसांपासून विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवत आहे. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती.
रात्री उशीरा त्यांची तब्येत खालवली असल्याचं वृत्तही आलं. काही बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या ट्विटवरून प्रसारमाध्यमांनी त्यांचे निधन झाल्याचं वृत्त दिलं. दरम्यान, सोशल मीडियावरील चर्चेनंतर अखेर कुटुंबीयांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, विक्रम गोखले यांच्या मुलीने त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती दिली आहे.
विक्रम गोखले यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४७ रोजी झाला. त्यांनी चित्रपट मालिका आणि नाटक या सर्व व्यासपीठावर काम केले आहे. गोखले यांना चित्रपटांबरोबरच नाटकांमध्येही अत्यंत नावाजलेले कलाकार म्हणून ओळखलं जातं. त्यांनी रंगभूमीवर फार मोठा काळ गाजवला. मराठी सिनेसृष्टीबरोबरच अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली.
□ कमल हासन यांना डिस्चार्ज
सुपरस्टार अभिनेते कमल हासन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना बुधवारी चेन्नईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 68 वर्षीय कमल हासन यांना ताप आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना दोन दिवस विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच काळजी करण्याचे काहीही कारण नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.