● कोवळ्या वयात सागराला गवसणी घालून केला विश्वविक्रम
सोलापूर / पुरुषोत्तम कुलकर्णी
सोलापूरची सुकन्या कीर्ती नंदकिशोर भराडिया हिने सागरी लाटांचे आव्हान झेलत समुद्रात नॉनस्टॉप ३८ किलो मीटर पोहण्याचा गुरूवारी (ता. 24) वर्ल्ड रेकॉर्ड करून सोलापूरची मान उभ्या जगात उंचावली आहे. कोवळ्या वयात सागराला गवसणी घालून केला विश्वविक्रम केलाय. Solapur’s ‘Kirti Bharadia made world fame; Sagar Gavasni world record praised by Mumbaikars
मुंबईतील वरळी ते गेट वे ऑफ इंडियापर्यंतच्या अरबी समुद्रात अवाढव्य अंतरापर्यंत पोहण्याचा विक्रम अत्यंत धाडसाने तिने करून दाखवला. अवघ्या सोळाव्या वर्षीच जागतिक विक्रम केल्याने तिच्याविषयी सोलापूरकरांमध्ये अप्रूप निर्माण झाले आहे. कीर्तीने इतक्या लहान वयात इतके विशाल सागरी अंतर पोहल्याने तिच्या नावाची नोंद केवळ सोलापुरातच नव्हे तर साऱ्या विश्वात सुवर्णाक्षराने होईल, याबद्दलही सोलापूरकरांना विशेष आनंद वाटत आहे. साऱ्या जगात जलतरणात हा विश्वविक्रम करणारी ती पहिली कन्या ठरली.
कीर्तीने सकाळी ११ वाजून मिनिटांनी वरळीजवळ वरळीजवळ ५५ समुद्रात उडी मारून पोहण्यास प्रारंभ केला. विश्वविक्रम करण्यासाठी सोलापूरहून आलेल्या या लहानगीला पाहण्यासाठी सागर किनारी असंख्य मुंबईकर जमले होते. इतकी लहान मुलगी हा विक्रम करणार काय? याची उत्सुकता तिथे जमलेल्यांना लागून होती मात्र, अत्यंत मोठे धाडस दाखवून तिने ३८ किलोमीटर सागरी अंतर सहज पार करून सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास आल्यानंतर गेट वे ऑफ इंडियाजवळ जमलेल्या क्रीडाप्रेमींमधून टाळ्यांचा कडकडाट झाला.
मुंबईकरांकडून झालेली ही प्रशंसा पाहून भराडिया कुटुंबीय व तिथे जमलेल्या सोलापूरकरांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. यशाचा आनंद गगनाला भिडल्यानंतर कीर्तीसह तिच्या कुटुंबीयांनी सागर किनारी तिरंगा ध्वज फडकावून एकच जल्लोष केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● मदतीसाठी तीन बोटींची सोय…
कीर्तीच्या संरक्षणासाठी तिच्या सोबत तीन बोटींची सोय होती. एका बोटीत सोलापूरचे डॉ. रोहित आमले हे होते. दुसऱ्या बोटीत अॅम्बुलन्सची सोय होती तर तिसऱ्या बोटीत वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे मुकूल सोनी, यशवंत राऊत, रूपाली रेपाळे व सुबोध सुळे हे अधिकारी तिच्या विक्रमावर लक्ष ठेवून होते तर दिलीप कोळी यांची पायलट म्हणून विशेष उपस्थिती होती.
७ तास २२ मिनिटात नॉन स्टापपणे तिने हा विक्रम केला. ती पोहत असताना एका ठिकाणी तिला ओमेटिंग झाली पण तिने हिम्मत सोडली नाही. कारण या विश्व विक्रमासाठी ती सोलापुरात जेव्हा जलतरणाचा सराव करत होती, तेव्हा तिला सातत्याने मीठाचे पाणी दिले गेले होते. त्यामुळे सागरातील खाऱ्या पाण्याचा तिला त्रास झाला नाही. सात तासात तिने प्रवास करतच तीनदा प्यायला पाणी घेतले आणि अधून मधून चॉकलेट व एक केळही खाल्ले.
सागरी लाटांवर स्वार होऊनी, केलीस तू खरेच स्वप्नपूर्ती, विश्वविक्रमी नगारे निनादत, आहेत गौरवाने सभोवती, हर्ष भरीत नगरी सारी कौतुक तुझे करती,
पराक्रमा पुढे नतमस्तक…..
सारे गाती तुझेच गौरव आणि आरती अशा शब्दात सोलापूकरांनी तिच्या यशाचा गौरव केला आहे. कीर्तीचे शुक्रवारी सोलापुरात आगमन होणार आहे. तिचा कौतुक सोहळा सोलापूरकरांना पहायला मिळणार आहे. सकाळी सात वाजता रेल्वे स्थानकापासून ते हुतात्मा चौकापर्यंत तिची भव्य मिरवूणक काढण्यात येणार आहे.
● हे तर मेहनतीचे फळ…
हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या कीर्तीला लहानपणापासूनच जलतरणाची आवड होती. तिने शालेय व महाविद्यालयीन स्तरावर आतापर्यंत विशेष कामगिरी बजावली आहे. तिने केलेले आजचे वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे तिच्या मेहनतीचे फळ आहे, अशा शब्दात तिचे कोच श्रीकांत शेटे यांनी आनंद व्यक्त केला. कीर्तीच्या या यशासाठी सोलापुरातील स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सरचिटणीस झुबिन अमारिया, रोटरी क्लबचे कालिदास जाजू यांचे प्रोत्साहन लाभले.
● आता श्रीलंका ते रामेश्वरकडे लक्ष…
कीर्ती एवढ्या यशावरच थांबणार नाही तर मार्च २०२३ मध्ये श्रीलंका ते रामेश्वर हे अंतर पार करण्याचा निर्धार तिने केला आहे. तिचे वडील नंदकिशोर हे सोलापुरात नामवंत कंपन्यांच्या साड्यांचे व्यापारी आहेत. तिला लहानपणापासूनच त्यांनी जलतरणासाठी पाठबळ दिले आहे. मुंबईतील यशाला गवसणी घालण्यासाठी तिने गेल्या सात ते आठ महिन्यांपासून अशोक चौकातील मार्कंडेय जलतरण तलाव येथे दररोज सहा ते सात तास सराव केला. विशेष म्हणजे मागील एक महिन्यापासून मुंबई येथील समुद्रातसुद्धा तिने पोहण्याचा सराव केला. काही महिन्यांपूर्वी विजापूर रोडवरील जलतरण तलावात ९ तास पोहून तिने एशियन रेकॉर्ड करून सोलापूरच्या मानात तुरा खोवला होता.