● जिल्हा प्रशासन हतबल; केवायसीला प्रतिसाद मिळेना
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी करण्यात येणाऱ्या केवायसीला प्रतिसाद मिळेना झाला आहे. मुदतवाढ देऊन ही अद्याप केवायसी पासून तब्बल पावने दोन लाख शेतकरी वंचित आहेत. यामुळे जिल्हा प्रशासन हतबल झाले आहे. Two lakh farmers did not do KYC in Solapur PM Kisan Vanchit district administration desperate
३१ डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्यावी अन्यथा पीएम किसन योजनेपासून वंचित राहाल, असे आवाहन जिल्हाकृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे. सोलापूर जिल्हा केवायसी मध्ये खूप मागे होता. फक्त ४२ टक्के काम झाले होते. जिल्हा कृषी विभागाच्या वतीने जनजागृती करत तीन वेळा शेककऱ्यांना मुदतवाढ दिली.
दिलेल्या मुदतवाढी मध्ये ४२ टक्केचे काम ७२ टक्के पर्यंत गेले आहे. मात्र शंभर टक्के काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या योजनेला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देणे बंद केले आहे. त्याशिवाय जे मोबाईल नंबर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे दिले त्यानुसार केवायसी करण्याचा प्रयत्न केल्यास सदरचा मोबाईन नंबर बंद अथवा दुसऱ्यांच्या नावावर दाखवत असल्याने प्रशासनाची मोठी अडचण झाली आहे.
शेतकरी स्वत: हून केवायसीसाठी पुढे येत नसल्याने प्रशासन देखील हतबल झाले आहे. आता पर्यंत एक लाख ७० हजार केवायसी केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. ६ लाख ९ हजार ७०४ शेतकरी आहेत त्यापैकी आतापर्यंत ४ लाख ३८ हजार ९६१ शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली आहे. शेतकऱ्यांनी अद्यापही आपली केवायसी पूर्ण केलेली नाही. हे शेतकरी आता ‘पीएम किसान’ योजनेतून मिळणाऱ्या अनुदानापासून वंचित राहणार आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ पंढरपूर तालुका आघाडीवर
केवायसी न केलेल्यामध्ये पंढरपूर तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यातील तब्बल २३ हजार ६६४ शेतकऱ्यांनी केवायसी केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर सांगोला तालुका आहे. तब्बल २१ हजार १३ शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही. त्यानंतर माढा आणि माळशिरस तालुक्याचा समावेश होतो. दोन्ही तालुक्यातील अनुक्रमे १८ हजार ३१ तर १८ हजार ७९५ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
अक्कलकोट ( १७१७६ ), बार्शी (१३६५ ९), करमाळा (१५१५०), मंगळवेढा (१३३७३), मोहोळ (११५४०) दक्षिण सोलापूर (१३०८८) उत्तर सोलापूर (५२५१) अशी आकडेवारी समोर आली आहे. अद्याप एक महिना शिल्लक आहे. ३१ डिसेंबर शेवटची मुदत आहे. या कालावधीत केवायसीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी केवायसी करण्याचे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.