● काय आहे वादाची पार्श्वभूमी ?
सोलापूर : श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक दिवसांपासून आंदोलन चालूय. पण कारखान्याचे धर्मराज काडादी यांनी रात्री आंदोलनस्थळी येऊन केतन शहांना थेट गोळ्या घालण्याची धमकी दिलीय. You will be shot if you act wisely; Background of Dharmaraj Kadadi’s threat to Ketan Shah controversy
‘तू जर काय शहाणपणा केला…. माझ्याबाबतीत…… वैयक्तिक…. तुला गोळ्याच घालतो’ हे वाक्य आहे सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धर्मराज काडादी यांचे. यावर प्रतिक्रिया आली, ‘तुम्ही आम्हाला गोळ्या घालतो म्हणालात… धन्यवाद.’ यावर पुढे काडादी म्हणतात, ‘ तशी वेळ आली तर ते पण करतो.’ इथेच गोंधळ उडाला. आवाज वाढला. तावातावाने बोलणे सुरू झाले. अशातच काडादींनी खिशातून बंदूक काढून दाखवली. त्यामुळे वातावरण तापले, एकीकडचा आवाज खाली येऊ लागला तर दुसरीकडचा आवाज वाढू लागला. अशातच उपस्थित इतरांनी काडादींनी ढकलत नेले आणि ही बातमी क्षणार्धात संपूर्ण सोलापुरात पसरली आणि ‘असे घडलेच कसे?’ असा प्रश्न जो तो उपस्थित करू लागला.
हा प्रकार घडला आहे शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या पुनमगेटजवळ. त्याठिकाणी गेल्या २१ दिवसांपासून सोलापूर विकास मंचचे चक्री उपोषण सुरू आहे. होटगी रोड विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू करावी, ही मंचची मागणी आहे. काडादी संचालक असलेल्या श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचा विमान उड्डाणाला अडथळा ठरत आहे. ती पाडल्याशिवाय विमान उडू शकत नाही. चिमणी पाडण्याचा आदेश न्यायालयाने यापूर्वीच दिला आहे. कारखाना चिमणी पाडू देत नाही, त्यामुळे होटगीरोड विमानतळावरून विमान उडू शकत नाही. या पार्श्वभूमीवर ‘सिध्देश्वर’ची चिमणी पाडून विमानसेवा तात्काळ सुरू करावी, ही आंदोलनकर्त्या सोलापूर विकास मंचची मागणी आहे.
● नेमके घडले काय ?
सायंकाळी सहा वाजता सोलापूर विकास मंचने शनिवारचे चक्रीय उपोषण संपवले. त्यानंतर मंचचे सदस्य केतन शहा व इतर मंडळी आंदोलनस्थळीच बोलत उभी होती. त्यावेळी धर्मराज काडादी आणि अन्य एकजण गाडीतून आंदोलनस्थळी आले. त्यावेळी समोरच आंदोलनकर्ते केतन शहा, विजय जाधव आणि अन्य सदस्य थांबले होते. त्याचवेळी काडादी यांनी केतन शहा यांना उद्देशून ‘तू जर काय शहाणपणा केला….. माझ्याबाबतीत वैयक्तिक …. तुला गोळ्याच घालतो’ अशी धमकी दिली.
● वकिलांच्या सल्ल्याने पुढील कार्यवाही : शहा
आंदोलन संपवून आम्ही बोलत उभे असताना काडादी त्याठिकाणी आले. मी त्यांना नमस्कार केला. त्यावेळी त्यांनी मला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. शिवाय खिशातील रिव्हॉल्वर काढून दाखवले. यासंदर्भात आम्ही वकिलांशी चर्चा करून पुढील कार्यवाही करणार आहोत.
• केतन शहा
– (सोलापूर विकास मंचचे सदस्य)
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● सिध्देश्वरचे उपाध्यक्ष शहांच्या भेटीला
गोळ्या घालण्याचे धमकी नाट्य संपल्यानंतर काही वेळात केतन शहा पार्क चौकातील त्यांच्या दुकानी आले. त्यानंतर काही वेळातच सिध्देश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील, बरूरचे डॉ. चन्नगोंडा हविनाळे हे शहांच्या दुकानी दाखल झाले. ‘काडादी रागात होते… त्यातूनच ते बोलले… ते काही मनावर घेऊ नका… आम्ही काडादींशी बोलतो…. असे सांगत मिटवामिटवीचा प्रयत्न केला. यावेळी शहांसह मंचचे सदस्य विजय जाधव, मिलिंद भोसले व अन्य उपस्थित होते.
● काय आहे वादाची पार्श्वभूमी ?
नव्यानेच महापालिका आयुक्तपदी रुजू झालेल्या शीतल तेली-उगले या सिध्देश्वर मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी मंदिर समितीचे प्रमुख या नात्याने धर्मराज काडादी यांनी आयुक्तांचे स्वागत करून सत्कार केला होता. त्या सत्काराचे फोटो वर्तमानपत्रात प्रसिध्द झाले होते. मंदिरातून आल्यानंतर आयुक्तांनी विमातळसंदर्भातील सुनावणीसुध्दा घेतली होती.
दुसऱ्या दिवशी सोलापूर विकास मंचचे सदस्य पालिका आयुक्तांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी ‘गुन्हेगाराकडून सत्कार कसा स्वीकारला?’ अशी विचारणा विकास मंचच्या सदस्यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती. मंचच्या सदस्यांनी आपल्यालाच ‘गुन्हेगार’ म्हटले आहे, असे काडादी यांचे म्हणणे आहे. यावरूनच हा वाद झाला.
● कोण कोणास काय म्हणाले ?
काडादी : तू गुन्हेगार कोणाला म्हणतो?
→ शहा : मी तुमचं नाव घेतलं का ?
तुम्ही आत्तापण घालू शकता
→ काडादी : अरे येडाबिडा आहे का..? किती दिवस
→ काडादी : मॅडमबरोबर पेपरमध्ये कोण होतं ? सहन करायचं ?
→ शहा : त्याचं कसंय … तुम्ही ऐकून घ्या…..
→ दुसरी व्यक्ती : अरे कसं बोलतो? आरोपीसारखं.
काडादी : मी एवढंच सांगतो तुला… तू जर काय गुन्हेगार आहे का ? र शहाणपणा केला…. माझ्याबाबतीत…. वैयक्तिक …. तुला गोळ्याच घालतो.
→ काडादी : मूर्ख आहे का ?
तिसरी व्यक्ती : त्या दिवशी तुमचं नाव घेतलं नाही.
→ काडादी : घे रे… नाव घे ना..?
→ तिसरी व्यक्ती एवढ्या खालच्या पातळीवर बोललंय का कधी यांना? तुझी आहे ना लढाई… लढू लागलात ना?
→ काडादी : तूर वेळ तशी आणला तर ते पण करतो. इथे सोडवासोडवी सुरू होते. ‘शांततेने घ्या’ असे सांगितले जाते. एक अनोळखी व्यक्ती काडादी यांना ढकलत पुढे घेऊन जातो. आंदोलक जागेवरच उभे राहतात.
→ शहा : नाही नाही. तुम्ही गोळ्या घाला तुम्ही, तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. तुमच्याकडं बंदुकीचं लायसन आहे… आम्हाला माहिती आहे… तुम्ही आत्तापण घालू शकता…
→ काडादी : बंदूकपण आहे
→ शहा : आहे ना बंदूक ? :
→ काडादी : बघायचंय का?
→ शहा : बंदूकपण आहे तुमच्याकडं, मान्य आहे.
¤ मी उद्या बोलेन
दरम्यान घडल्या प्रकाराबाबत जाणून घेण्यासाठी ‘सुराज्य’ ने धर्मराज काडादी यांना संपर्क केला. त्यावेळी त्यांनी काल याप्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला. ‘जे बोलायचे आहे; ते उद्या बोलतो, उद्या सविस्तर बोलतो,’ असे सांगितले.