□ मुलाच्या विवाहाचा बस्ता बांधायला आले होते सोलापूरला
सोलापूर : लातूर येथील अतिरिक्त मुख्य कार्यकारी प्रभू जाधव यांच्या पत्नी स्नेहलता प्रभू जाधव यांनी आत्महत्या केली आहे. सोलापुरातील हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यांनी हॉटेलच्या रुममध्ये साडीने गळफास घेतला आहे. Latur officer’s wife commits suicide in Solapur hotel Jadhav
स्नेहलता यांच्या मुलाचे 18 डिसेंबर रोजी लग्न आहे. यासाठी ते दोघे नवरा-बायको कर्नाटकातील चडचण येथे खरेदीसाठी गेले होते. दरम्यान सोलापूर येथील हॉटेलमध्ये आल्यावर सकाळी त्यांनी आत्महहत्या केली आहे. सोलापूरच्या निशा हॉटेलमध्ये हा प्रकार घडला.
या दरम्यान स्नेहलता जाधव यांनी त्यांच्या नातेवाईकाला फोन करून आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. स्नेहलता यांचा फोन येताच त्यांचे नातेवाई वीस ते पंचवीस मिनिटात हॉटेलच्या रुमवर पोहोचले मात्र, तोवर स्नेहलता यांनी गळफास घेत आत्महत्या केली होती. नातेवाईकांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, पोलिसांनी त्यांना मृत घोषित केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मुलाच्या विवाहाचा बस्ता बांधायला लातूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव हे पत्नीसोबत शनिवारी सोलापुरात आले होते. ते चडचण (कर्नाटक) येथे कपडे खरेदीसाठी जाणार होते. पण रविवारी (ता. 27) दुपारी अडीचच्या सुमारास जाधव यांची पत्नी स्नेहलता (सुनीता) जाधव (वय-४५) यांनी अचानक विजयपूर रोडवरील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले.
दरम्यान,प्रभू जाधव यांच्या मुलाचा ११ डिसेंबर रोजी विवाह होता.त्यासाठी चडचण येथून ते कपडे खरेदी करायला सोलापुरात आले होते.जाधव यांच्या पत्नीचे माहेर सोलापूरच आहे. कपडे खरेदी करून काहीवेळात जाण्याच्या नियोजनात त्यांनी विजयपूर रोडवरील सोरेगाव परिसरातील निशा हॉटेलमध्ये स्वतंत्र रूम भाड्याने घेतली होती.
दरम्यान, कामानिमित्त जाधव हे अचानक लातूरला परतले. त्यांची पत्नी स्नेहलता (सुनीता) एकट्याच त्या हॉटेलमध्ये होत्या.आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी भावाला कॉल करून आपण गळफास घेऊन आत्महत्या करतेय,असे सांगितले होते.भाऊ समजावून सांगत असताना सुनीता यांनी कॉल बंद केला. त्यानंतर त्यांच्या भावाने नातेवाइकांना सांगून त्या ठिकाणी जायला सांगितले.
पण, नातेवाईक येईपर्यंत त्यांनी गळफास घेतला होता. हॉटेलमध्ये गेल्यानंतर नातेवाइकांनी बंद दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी गळफास घेतलेल्या सुनीता यांना बेशुद्धावस्थेत दवाखान्यात नेले. मात्र,उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यासंदर्भातील माहिती विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे-पाटील यांनी दिली. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून,पोलिस तपास करीत आहेत.