नवी दिल्ली : श्रद्धा वालकरच्या हत्ये प्रकरणी अटकेत असलेला आरोपी आफताबने धक्कादायक विधान केले आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आफताबने आनंदाने फाशी जाईल स्वर्गात अप्सरा मिळेल, असे म्हटले आहे. तसेच त्याने 20 पेक्षा अधिक हिंदू मुलींसोबत संबंध ठेवले होते. आफताब हिंदू मुलींना बंबल अॅपवर शोधून आपल्या जाळ्यात अडकवायचा, माहिती त्याने पोलिस जबानीत दिल्याची माहिती आहे. Shraddha Walker murder case: Aftab Poonawa will get a nymph in heaven if hanged
श्रद्धा आणि आफताब हे दोघेही काही महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. एका डेटिंग अँपवरून दोघांची ओळख झाली होती. श्रद्धा घरच्यांच्या विरोधात जाऊन आफताबसोबत राहत होती. श्रद्धाने लग्नाचा आग्रह केल्याने आफताबने तिचे ३५ तुकडे करून निघृण पद्धतीने हत्या केली. तब्बल सहा महिन्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती.
आफताब अमीन पूनावाला याने पॉलीग्राफ चाचणीदरम्यान धक्कादायक खुलासे केले आहेत. आफताबची धर्मांध मानसिकताही चौकशीदरम्यान समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चौकशीदरम्यान आफताबने सांगितले की, श्रद्धाच्या हत्येप्रकरणी त्याला फाशी झाली तरी त्याला पश्चाताप होणार नाही कारण स्वर्गात गेल्यावर त्याला अप्सरा मिळतील. त्याचवेळी, त्याने हे देखील उघड केले आहे की श्रद्धासोबतच्या नात्यादरम्यान त्याचे 20 हून अधिक हिंदू मुलींसोबत अफेअर होते.
हिंदू मुलींना बळी बनवायचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आफताबने खुलासा केला की, तो बंबल ॲपवर हिंदू मुलींची शिकार करत असे. श्रद्धाला मारल्यानंतर त्याने एका मानसशास्त्रज्ञाला त्याच्या खोलीत आणले होते, तीही हिंदू होती. तिला श्रद्धाची अंगठी त्याने दिल्याचे समोर आले आहे. दरम्यान इतर अनेक हिंदू मुलींशीही तो संपर्कात होता. आफताबला श्रद्धाला मारल्याचा कोणताही पश्चाताप नाही. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करून फेकून दिल्याबद्दल त्याला दु:ख नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
जोपर्यंत मारेकरी आफताब रिमांडवर होता तोपर्यंत तो पोलिसांची सतत दिशाभूल करत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्याही नव्हती. चौकशी संपली की तो शांत झोपायचा. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आफताबने पॉलीग्राफ टेस्टमध्ये अशी काही सत्ये सांगितली आहेत, जी अतिशय धक्कादायक आहेत. आता पोलिसांनाही आफताबची नार्को टेस्ट करायची आहे. आफताबच्या घरातून पोलिसांनी 5 चाकू जप्त केले होते.
थक्क करणारी बाब म्हणजे श्रद्धा वालकर हिची हत्या केल्यानंतर आरोपी आफताबने तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. हे तुकडे त्याने काही दिवस फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर ठराविक अंतराने त्याने तुकड्यांची विल्हेवाट लावली. पोलिसांत त्याने हत्येची कबूली दिली असली तरी, त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही पश्चापात दिसत नाहीये. श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही, असं देखील त्याने म्हटलं असल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
आरोपी आफताब पुनावाला याच्यावर दिल्लीत तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आफताबची पॉलीग्राफ चाचणी झाल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात नेलं जात होतं. त्यावेळी हा तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हल्ला करणाऱ्या दोघांनी ते हिंदू सेनेचे सदस्य असल्याचं सांगितलं आहे. आफताबला तुरुंगात नेत असताना झालेल्या या हल्ल्यानंतर पोलिसांची मोठी तारांबळ झाली. आता आफताबची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आरोपी आफताबची येत्या १ डिसेंबरला नार्को टेस्ट होणार आहे.