□ फसवणुकीचे तब्बल आठ गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला अटक
सोलापूर : दोन वर्षांपासून फसवणुकीच्या तब्बल आठ गुन्ह्यातील आरोपीला शहर गुन्हे शाखेला अटक करण्यात यश आले आहे. कमी किमतीत वाहन देण्याचे आमीष दाखवून फसवल्याचे असे आठ गुन्हे या आरोपीवर दाखल आहेत. Concealing fraudulent identity in Solapur including Gulbarga, Mumbai by luring vehicles at low prices
शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील ई-स्क्वेअर जुनी मिल कंपाऊंड आवारातील ऑटो ए वन नावाच्या ऑफिसचा मालक महमद खाजापाशा महमद खासीम मुल्ला याने शोरूम किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये दुचाकी व चार चाकी वाहने विक्री करतो, असे नागरिकांना सांगून त्यांच्याकडून पैसे घेऊन नागरिकांना वाहने व घेतलेले पैसे परत न देता फसवणूक केली होती.
याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर वरील संशयित आरोपी हा मिळून येत नसल्याने तो गुलबर्गा व मुंबई येथे स्वतःचे अस्तित्व लपवून राहत होता. त्याच्याविरुद्ध फौजदार चावडी व सदर बाजार पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान गुन्हे शाखेकडे नियुक्त पथकातील अधिकारी व अंमलदार हे शोध घेत असताना गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकातील अंमलदार यांना मुल्ला हा सोलापूर रेल्वे परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पथकातील पोलिसांनी सापळा लावून रेल्वे स्टेशन पोर्टल चाळ येथून मुल्ला याला ताब्यात घेतले.
त्यावेळी त्याच्या कब्जात एक एप्पल कंपनीचा लॅपटॉप मिळून आला. तसे पोलिसांनी त्याच्याकडे अधिक तपास केले असता त्याने आपले नाव महमद खाजा पाशा महमद कासीम मुल्ला (वय-३२,रा. सध्या- आनंद सर्कल जोगेश्वरी वेस्ट मुंबई) असे सांगितले. मुल्ला याच्याकडून शोरूम पेक्षा कमी किमतीत वाहने विक्री करतो म्हणून प्राथमिक तपासात ३९ लाख २७ हजाराची फसवणूक केल्याचे त्याने सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
ही फसवणूक पुणे, मुंबई, बिदर, हुबळी, गुलबर्गा येथील नागरिकांची विविध कारणाने फसवणूक केली असल्याचे तपासात सांगितले आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असल्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.
□ स्वतःची ओळख लपवून मुंबईत राहायचा मुल्ला
कमी किंमतीत गाड्या देतो असे म्हणून लोकांना फसवणारा व फसवणुकीचे तब्बल आठ गुन्हे दाखल असणारा महमद खाजापाशा महमद कासीम मुल्ला हा स्वतःची ओळख लपवून मुंबई येथे मुद्यसर शेख या नावाने राहत होता. त्याने सोलापूर शहरात १५० गाड्या विकल्या असल्याचे सांगितले. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र अशा तीन राज्यात देखील मुल्ला याच्यावर गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो बहिणीच्या बँकेचा अकाउंट व लोकांचे सिम कार्डचा वापर करत होता.