मुंबई : महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. यावेळेस त्यांना कार्यमुक्त होण्याचे आदेश दिले असून पुढील आदेशाची वाट पाहा असे म्हटले आहे. Tukaram Mundhe… be relieved of duty… Shinde government’s fatwa; Wait for the next command
राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली होती. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांना कार्यमुक्त होण्याचे आदेश दिले आहेत. तुकाराम मुंढे यांच्यासह आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईचा कार्यभार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे तर, महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण सोसायटीचा कार्यभार देखील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे सोपवून कार्यमुक्त होण्याचे आदेश काढले आहेत. कार्यमुक्त होऊन पुढील आदेशाची वाट पाहा, असं राज्य सरकारनं काढलेल्या आदेशात म्हटलं आहे.
तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक कामाची काही अधिकाऱ्यांनी राज्याच्या एका मंत्र्याकडे तक्रार केल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर तुकाराम मुंढे यांना कार्यमुक्त करण्याच्या हालचाली झाल्याच्या चर्चा आहेत. तुकाराम मुंढे यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी राज्यात ठिकठिकाणी दौरे केले होते. या दौऱ्यांच्या काळात जे अधिकारी आणि कर्मचारी बेजबाबदारपणे वागतील त्यांना मुंढे यांनी त्यांच्या खास शैलीत इशारा दिला होता.
तुकाराम मुंढे यांच्या आक्रमक भूमिकेमुळं काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. यातूनच काही अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्यासंदर्भात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे तक्रारी केल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आरोग्यमंत्र्यांनी या संदर्भात तुकाराम मुंढे यांना सूचना देखील केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या सर्व बाबी समोर येऊन आठवडा होत असतानाच तुकाराम मुंढे यांना कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विनय मून यांची भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून परभणीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाली आहे. सुनील चव्हाण यांची कृषी विभाग पुणेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एस.एम.कुरकोटी यांच्याकडे भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.
सौम्या शर्मा यांची नांदेड जिल्ह्यातील देगलूर उपविभागातील सहायक जिल्हाधिकारी पदावरून नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.
□ या अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या
डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांची एमएमआरडीए मुंबईच्या अतिरिक्त आयुक्त पदावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. भाग्यश्री बानायतची साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीच्या मुख्य कार्यकारी पदावरुन विदर्भ स्थायी विकास महामंडळ नागपूरच्या सचिवपदी बदली करण्यात आली.
》 पोलीस उपायुक्त डॉ. कडुकर यांची बदली, नवे पोलीस उपायुक्त म्हणून अजित बोऱ्हाडे यांची नियुक्ती
सोलापूर : राज्याच्या गृह विभागाने पोलीस अधीक्षक दर्जाच्या भापोसे – रापोसे १९ अधिकाऱ्यांच्या बदली व पदस्थापना दिल्या. सोलापूर पोलीस आयुक्तालयात गेल्या ४ वर्षापासून कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांची अखेर बदली झाली.
मंगळवारी (ता. 29) सायंकाळी शासनाने काढलेल्या आदेशानुसार डॉ. वैशाली कडूकर यांची सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य पदावर बदली करण्यात आली आहे. पंधरा दिवसांपूर्वी राज्यातील पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी डॉ. कडुकर यांचे नाव आले नसल्याने त्या सोलापूर परिसरातील किंवा महत्त्वाच्या पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा होती. अखेर डॉ. वैशाली कडुकर यांची केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी बदली करण्यात आली आहे.
सोलापूरला पोलीस उपायुक्त म्हणून अजित बोऱ्हाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त पदावर काम करताना डॉ. वैशाली कडूकर यांनी अतिशय चांगल्या पध्दतीने सोलापुरात काम केले आहे. कोरोना काळात त्यांचे कामकाज अतिशय नावाजले गेले होते.