□ सोलापूर – तळजापूर- उस्मानाबाद रेल्वेसाठी ४५२ कोटींचा निधी मंजूर
उस्मानाबाद : राज्य मंत्रीमंडळाच्या मंगळवारी (ता. 29 ) झालेल्या बैठकीत सोलापूर तुळजापूर – उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने ४५२ कोटी ४६ लाख रुपये मंजूर केले. यामुळे तुळजापूर तीर्थक्षेत्र हे रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे स्थानिकांमध्ये आणि भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. Tuljapur pilgrimage will now be visible on the railway map; 452 Crore Fund Sanctioned Osmanabad Dharashiv Solapur
तुळजापूर तीर्थक्षेत्र हे रेल्वेने जोडले जावे ही मागणी गेल्या ४ दशकांपासूनची होती. ती आता सत्यात उतरताना दिसतेय. यापूर्वी सोलापूर तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वे मार्ग मंजूर झाला होता. त्याचे सर्वेक्षणही करण्यात आले होते. या रेल्वेसाठी तुळजापूर तालुक्यातील काही गावातील जमिनींचे अधिग्रहण करण्याचे काम सुरू होते. फक्त निधीमुळे या रेल्वे मार्गाचे काम संथ गतीने सुरू होते. आता मंत्रीमंडळाच्या बैठकीत ४५२ कोटी ४६ लाख रुपये निधी मंजूर केल्यामुळे या रेल्वे मार्गाला आता गती येणार आहे.
भविष्यात भाविक तुळजा भवानीच्या दर्शनाला रेल्वेने दाखल होतील. तसेच या रेल्वे मार्गामुळे व्यापार आणि उद्योग व्यवसाय वाढण्यास मदत होईल. सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद हा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकवर आणण्यासाठी राज्य शासनाने आपल्या वाट्याचे ४५२ कोटी ४६ लाख रुपये आर्थिक सहभाग देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या प्रकल्पासाठी ९०४ कोटी ९२ लाख इतका खर्च येणार असून ५० टक्के सहभाग राज्य शासनाचा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे स्थानिक व इतर राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. मात्र रेल्वेची सुविधा नसल्याने त्यांची गैरसोय होते म्हणून विविध लोकप्रतिनिधींनी अनेक वर्षांपासून ही मागणी केलेली होती. या रेल्वे मार्गाची लांबी ८४.४४ किमी असून यावर १० रेल्वे स्थानके असतील तसेच ४ वर्षात हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद या ८४ किमीच्या रेल्वे मार्गाच्या कामास गती मिळाली आहे. १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी बजेट सादर केले. यामध्ये सोलापूर – उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी १० कोटी रुपये मिळाल्याने रेल्वेच्या कामास गती मिळत आहे.
उस्मानाबाद येथून जमीन मोजणीचे कामास सुरूवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण भारत अशा तीन शहरांना जोडला जाणारा महत्त्वपूर्ण मार्ग म्हणून सोलापूर – उस्मानाबाद मार्ग ओळखला जाणार आहे.